AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP आंदोलक मोहम्मद जुनैदचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप; मध्यरात्री अचानक उचललं, डोळ्यावर पट्टी बांधली अन्…

mohammad junaid : सीजेपी आंदोलक मोहम्मद जुनैदने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्याच्या कुटुंबीयांतील सदस्यांची चौकशी केल्याचेही त्याने सांगितले.

CJP आंदोलक मोहम्मद जुनैदचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप; मध्यरात्री अचानक उचललं, डोळ्यावर पट्टी बांधली अन्...
| Updated on: Jul 28, 2026 | 9:00 AM
Share

दिल्लीच्या जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधात आंदोलनात आंदोलकांना जेवणाची सोय उपलब्ध करून देणाऱ्या मोहम्मद जुनैदने पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर रात्रभर डोळ्यावर पट्टी बांधून आंदोलकांना जेवणाची व्यवस्था आणि फंडिगविषयी चौकशी केली. पोलिसांनी गाझियाबादमधील घरी पोहोचून कुटुंबातील सदस्यांची देखील चौकशी केल्याचा आरोप जुनैदच्या कुटुंबीयांनी केला आहे. परंतु गाझियाबाद पोलिसांनी आरोप फेटाळून लावले आहेत. जुनैदच्या वडिलांना नियमित चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशीनंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोहम्मद जुनैद हा आंदोलक चर्चेत आहे. जंतर-मंतरच्या आंदोलनात मोहम्मद जुनैद हा मोफत जेवण आणि पाणी वाटप करताना दिसत होता. परंतु आंदोलन संपल्यानंतर मोहम्मद जुनैद आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आल्याचे समोर आलं. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना एकच उधाण आलं.

मोहम्मद जुनैदचं म्हणणं आहे की, मला 24 जुलै रोजी रात्री दिल्ली पोलिसांनी अचानक रोखलं. मला 24 जुलैच्या रात्री 10.50 ते 10.55 वाजेदरम्यान एका कुत्र्‍याने चावलं. त्यामुळे मी राम मनोहर लोहिया रुग्णालयात पोहोचलो. रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर जवळपास रात्री 12.10 वाजता रिक्षा पकडत होतो. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर रिक्षाने निघालो. रिक्षा काही अंतरावर पोहोचल्यानंतर काहींनी माझी रिक्षा थांबवली. काही जण माझ्यावर हल्ला करायला आले होते. त्यांनी मला दिल्ली पोलीस असल्याचे सांगितले. त्यांनंतर मला ओळखपत्र दाखवायला सांगितले. परंतु त्यांनी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधून अज्ञातस्थळी नेलं. त्यांनी रात्रभर डोळ्यावर पट्टी काढली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चौकशी केली’.

‘आंदोलनात वाटण्यात येणाऱ्या जेवणाची व्यवस्था कुठून केली जात होती. त्यासाठी कोण पैसे देत होते? असे प्रश्न चौकशीत विचारल्याचे जुनैदने सांगितले. त्याने चौकशीत सांगितले की, ‘जेवणाची व्यवस्था वेगवेगळे आंदोलक करत होते. काही लोक ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे जेवण मागवत होते. तर काही जण स्वत:च्या घरातून जेवण आणि पाणी घेऊन येत होते. चौकशीनंतर त्यांना उत्तराखंडच्या मसुरी येथे सोडण्यात आलं. त्यानंतर मसुरीहून दिल्लीला टॅक्सीने पोहोचल्याचे त्याने सांगितले. या चौकशीनंतरही जुनैदने कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाचं समर्थन केलं. तर सीजेपीच्या आंदोलकांनीही वेळोवेळी मदत केल्याचं सांगितले. आता संघटनेची कायदेशीर टीम आता काम करत असल्याचे सांगितले. तर सीजेपीची प्रवक्ता रत्ना सिंह यांच्याशी एक ते दोन वेळा बोलणे झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी