AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती माझ्या मुलीपेक्षाही लहान.. 17 वर्षांच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना नसीरुद्दीन शाह झाले होते अस्वस्थ

अनेक वर्षांनंतरही या चित्रपटाशी संबंधित किस्से चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. राजीव राय यांनी सांगितलेल्या या आठवणीमुळे ‘त्रिदेव’च्या चित्रीकरणामागची एक वेगळीच बाजू पुन्हा चर्चेत आली आहे.

ती माझ्या मुलीपेक्षाही लहान.. 17 वर्षांच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना नसीरुद्दीन शाह झाले होते अस्वस्थ
Naseeruddin ShahImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 27, 2026 | 11:00 AM
Share

Naseeruddin Shah: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘त्रिदेव’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना एका गोष्टीमुळे संकोच वाटत होता. अभिनेत्री सोनम खानसोबत रोमँटिक गाण्याचं चित्रीकरण करताना ते अस्वस्थ झाले होते. यामागचं कारण होतं दोघांच्या वयातील मोठं अंतर. सोनम ही आपल्या मुलीपेक्षाही वयाने लहान असल्याचं नसीरुद्दीन शाह यांनी दिग्दर्शक राजीव राय यांना सांगितलं होतं. नुकत्याच एका मुलाखतीत राजीव राय यांनी हा जुना किस्सा सांगितला असून, त्याची सध्या मनोरंजनविश्वात चर्चा सुरू आहे.

‘त्रिदेव’ हा चित्रपट 1989 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि सोनम खान यांची जोडी पाहायला मिळाली होती. चित्रपटातील ‘तिरछी टोपीवाले’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मात्र, या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नसीरुद्दीन शाह यांना काहीसं अवघडल्यासारखं झालं होतं. दिग्दर्शक राजीव राय यांनी सांगितल्यानुसार, नसीरुद्दीन शाह यांनी सोनमसोबतच्या रोमँटिक दृश्यांबद्दल आपली चिंता व्यक्त केली होती. सोनम ही त्यांच्या मुलगी हीबा शाह हिच्यापेक्षाही वयाने लहान होती. त्यामुळे तिच्यासोबत अशा प्रकारची दृश्यं करणं त्यांना अस्वस्थ करणारं वाटत होतं. त्यांनी ही बाब राजीव राय यांच्यासमोर स्पष्टपणे मांडली होती.

केवळ वयातील अंतरच नव्हे, तर नृत्य करण्याबाबतही नसीरुद्दीन शाह यांना संकोच वाटत होता. आपल्या अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याला गाण्यातील नृत्याच्या हालचालींबद्दलही आत्मविश्वास वाटत नव्हता. ‘मी यापूर्वी असं गाणं केलेलं नाही,’ अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली होती. यावर राजीव राय यांनी त्यांना नृत्याच्या प्रत्येक स्टेपचा विचार करण्याऐवजी अभिनयावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. गाण्यातील हालचालींकडे अभिनयाचाच एक भाग म्हणून पाहण्यास त्यांनी सांगितलं. दिग्दर्शकाच्या या सल्ल्यामुळे नसीरुद्दीन शाह यांचा संकोच कमी झाला आणि गाण्याचं चित्रीकरण पूर्ण झालं.

नसीरुद्दीन शाह यांनी वयातील अंतराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राजीव राय यांनी सोनम खानचीही प्रतिक्रिया जाणून घेतली. मात्र, सोनमला नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत काम करण्याची खूप उत्सुकता होती. ती त्यांना देशातील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानत होती. त्यामुळे या चित्रपटातील जोडी बदलण्याची गरज नसल्याचं तिने स्पष्ट केलं होतं. ‘त्रिदेव’मध्ये नसीरुद्दीन शाह आणि सोनम खान यांच्यासह सनी देओल, जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित, संगीता बिजलानी, अनुपम खेर आणि अमरीश पुरी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. चित्रपटातील गाणी विशेष गाजली होती.

Follow Us
छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा...
Sanjay Raut : छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा सरकारवर घणाघात
आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही...; मतपेटीत सापडली चिठ्ठी; नेमकं काय...
MLC Election 2026 Maharashtra : आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही...; मतपेटीत सापडली चिठ्ठी; नेमकं काय लिहिलंय?
25-25 मतांचे गठ्ठे, पसंतीक्रमाची मोजणी; विधानपरिषद निवडणुकीचा निकाल...
Maharashtra MLC Election 2026 Result : 25-25 मतांचे गठ्ठे, पसंतीक्रमाची मोजणी; विधानपरिषद निवडणुकीचा निकाल नेमका कधी लागणार?
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत गोंधळ; तब्बल ६ ते ८ मतपेट्यांवर....
Pune MLC Election 2026 : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत गोंधळ; तब्बल ६ ते ८ मतपेट्यांवर....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; राजेंद्र शिंदेंनंतर आता...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; राजेंद्र शिंदेंनंतर आता...
70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी
Maharashtra MLC Result 2026 Complete Overview : 70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी
टायगर श्रॉफ प्रकरणी आरोपींच्या मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरे समोर
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणी आरोपींच्या मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरे समोर
10 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत!
Mumbai Local Update : Central Line : 10 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत; मुंबईकरांना मोठा दिलासा
महायुती की महाविकास आघाडी? विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीचा फटका कुणाला
Maharashtra MLC Election Results 2026 : महायुती की महाविकास आघाडी? विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीचा फटका कुणाला? निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?