AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 झाडं म्हणजे एक कसाब, उज्ज्वल निकम यांनी अब्रुची लक्तरे… संजय राऊत यांचा घणाघाती हल्ला

कर्जत येथील वृक्षतोडीला पाठिंबा दिल्याबद्दल संजय राऊत यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. 'दहा झाडं म्हणजे एक कसाब' अशी टीका करत राऊत यांनी निकम यांच्या भाजप प्रवेशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पर्यावरणविरोधी प्रकल्पांना भाजप चांगल्या लोकांचा वापर करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.

10 झाडं म्हणजे एक कसाब, उज्ज्वल निकम यांनी अब्रुची लक्तरे... संजय राऊत यांचा घणाघाती हल्ला
ujjwal nikamImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2026 | 10:46 AM
Share

ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी कर्जत येथे होत असलेल्या वृक्षतोडीचं समर्थन केलं आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. आम्हाला उज्जवल निकम यांच्याबद्दल आदर आहे. ते आमचे मित्र आहेत. पण त्यांनी एका खासदारकीसाठी अब्रूची लक्तरे काढली आहेत. 10 झाड म्हणजे एक कसाब आहे. आम्ही झाडं आणि कसाब यांना एकात तागडीत तोलतो, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे. मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हा हल्ला चढवला.

उज्ज्वल निकम या सरकारच्या बाजूने उभे आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्राला किती पर्यावरण पूरक आहे, हे सांगण्यासाठी निकम उभं राहिले आहेत हे दुर्देव आहे. निकम भाजपमध्ये एका खासदारकीसाठी अब्रुची लक्तरे काढून घेत आहेत, हे दुर्देव आहे. ते आमचे मित्र आहेत. पण ते राक्षसी पक्षात गेले आहेत. कसाबच्या प्रकारणात ते मानवतावाद सांगत होते. 10 झाडं तोडणं म्हणजे एक कसाब आहे. कसाब आणि झाडांची हत्या आम्ही एकाच तागडीत तोडतो, असं संजय राऊत म्हणाले.

भाजप चांगल्या लोकांचा वापर करून घेतंय

हे सरकार चंद्रपूरमध्ये अदानीला खाणी देत आहे. छत्तीसगडमध्ये जंगलं नष्ट केली जात आहे. उज्ज्वल निकम यांच्यासारख्या ज्येष्ठ वकिलांनी राक्षसांची बाजू घेऊन लढू नये. पर्यावरण नष्ट करणाऱ्यांच्या बाजूने उभं राहणं म्हणजे कसाबची बाजू घेणं. बॉम्बस्फोटातील आरोपींची बाजू घेणं आहे. तुम्हाला नम्रपणे सांगतो. तोंड उघडायला जाऊ नका. तुम्हीच तुमची बेअब्रू करून घेत आहात. भाजप अशा चांगल्या लोकांचा वापर करून घेत आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

अदानी का जन्माला आले?

विदर्भ जंगल आणि व्याघ्र प्रकल्पासाठी ओळखला जातो. तुम्ही अदानीसाठी व्याघ्र प्रकल्पावर कुऱ्हाड चालवत आहात. विदर्भातील सुपुत्र असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी याला विरोध केला पाहिजे. सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलन करावं, आम्ही सोबत येतो. 5 हजार झाडं तोडत असतील तर असे अदानी नकोच. अदानी का जन्माला आले? आमच्याच देशात का जन्माला आले? महाराष्ट्रावर हा भार का? असे अदानी नकोत. आम्हाला टाटा, बिर्ला, किर्लोस्कर हवेत. आम्हाला उद्योगपती हवेत, पण ते महाराष्ट्र उभा करणारे हवेत. उद्योगपतींनी महाराष्ट्राचं वैभव वाढवलं आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

या आदिवासींना बळ द्या

आरेचं आंदोलन संपलं नाही. कर्जतचं आंदोलन सुरू झालंय. विदर्भातील आंदोलनाची ठिणगी टाकली जाईल. या सरकारच्या बापालाही झाडं तोडता येणार नाही. आदित्य ठाकरे या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. आम्ही इतरांनाही आवाहन करतोय, तुम्ही या आणि आदिवीसांना बळ द्या, असं आवाहन त्यांनी केलं.

Follow Us
छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा...
Sanjay Raut : छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा सरकारवर घणाघात
आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही...; मतपेटीत सापडली चिठ्ठी; नेमकं काय...
MLC Election 2026 Maharashtra : आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही...; मतपेटीत सापडली चिठ्ठी; नेमकं काय लिहिलंय?
25-25 मतांचे गठ्ठे, पसंतीक्रमाची मोजणी; विधानपरिषद निवडणुकीचा निकाल...
Maharashtra MLC Election 2026 Result : 25-25 मतांचे गठ्ठे, पसंतीक्रमाची मोजणी; विधानपरिषद निवडणुकीचा निकाल नेमका कधी लागणार?
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत गोंधळ; तब्बल ६ ते ८ मतपेट्यांवर....
Pune MLC Election 2026 : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत गोंधळ; तब्बल ६ ते ८ मतपेट्यांवर....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; राजेंद्र शिंदेंनंतर आता...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; राजेंद्र शिंदेंनंतर आता...
70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी
Maharashtra MLC Result 2026 Complete Overview : 70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी
टायगर श्रॉफ प्रकरणी आरोपींच्या मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरे समोर
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणी आरोपींच्या मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरे समोर
10 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत!
Mumbai Local Update : Central Line : 10 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत; मुंबईकरांना मोठा दिलासा
महायुती की महाविकास आघाडी? विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीचा फटका कुणाला
Maharashtra MLC Election Results 2026 : महायुती की महाविकास आघाडी? विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीचा फटका कुणाला? निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?