AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local Update : Central Line : 10 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत; मुंबईकरांना मोठा दिलासा

Mumbai Local Update : Central Line : 10 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत; मुंबईकरांना मोठा दिलासा

| Updated on: Oct 27, 2026 | 8:11 AM
Share

काल रात्री कांजूरमार्ग येथे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या लोकल सेवा जवळपास १० तास ठप्प झाल्या होत्या. सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आज सकाळी मात्र लोकल सेवा पूर्णपणे सुरळीत झाली असून, सर्व गाड्या वेळेवर धावत आहेत.

मुंबईतील मध्य रेल्वेची लोकल सेवा आज सकाळपासून पूर्णपणे सुरळीत झाली आहे. काल रात्री कांजूरमार्ग स्टेशनजवळ झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकरांना जवळपास दहा तास मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते.

काल रात्री साडेदहा वाजता कांजूरमार्ग येथे तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे सिग्नल यंत्रणेवर मोठा ताण आला आणि सर्व सिग्नल यंत्रणा बंद पडल्या. याचा परिणाम म्हणून मध्य रेल्वेच्या सर्व लोकल सेवा ठप्प झाल्या होत्या. जवळपास दहा तास हा बिघाड कायम असल्याने अनेक रेल्वे गाड्या विलंबाने धावत होत्या. कामावरून घरी जाणाऱ्या आणि सकाळी कामावर येणाऱ्या नागरिकांना यामुळे प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. काही नागरिकांनी तर रेल्वे ट्रॅकवरून चालण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे दुर्दैवाने तीन अपघात देखील झाले.

आज सकाळी रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या लोकल सेवा वेळेत धावत आहेत. डाऊन टू अप मार्गावरील तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून बदलापूर आणि कर्जत दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या वेळेवर धावत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे लाखो मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Published on: Oct 27, 2026 08:11 AM

Follow Us