Maharashtra News LIVE : महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत रसातळाला गेलाय – संजय राऊत
Maharashtra News LIVE : नाशिक शहर आणि परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं होतं. पण रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तर डोंबिवलीत निवृत्त नौदल अधिकाऱ्याची फसवणूक झाली आहे. एवढंच नाही तर, राजकारणात देखील मोठ्या घडामोडी घडत आहे. म्हणून राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

LIVE NEWS & UPDATES
-
डोंबिवलीतील 61 वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याची ऑनलाइन फसवणूक
डोंबिवलीतील 61 वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याची ऑनलाइन फसवणूक….. विशेष ओळखपत्राच्या आमिषाने ओटीपी घेत भामट्यांनी खात्यातून 5 लाख 98 हजार रुपये लंपास केले… पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू…
-
औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीनंतर मुंबई पोलिसांचं पथक नंदुरबारमध्ये दाखल
औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीनंतर मुंबई पोलिसांचं पथक नंदुरबारमध्ये दाखल…. मुंबई पोलिसांच्या CID पथकाकडून विविध ठिकाणी झाडाझडती…. कौटिल्य फाऊंडेशनसह विविध ठिकाणी झाडाझडती…. कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील फरार असल्याची माहिती…
-
-
मुंब् इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळला
मुंब्र्यात इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळला…. दुर्घटनेत 6 जण अडकले होते…13 वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू, 5 जण सुखरुप…. इमारतीमधील रहिवाशांना तात्पुरते ठाणे मनपा शाळेत हलवलं…
-
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक… वेलकम टू ट्राफिक सिटी आशयाचे बॅनर लावत स्वाक्षरी मोहीम… शहरातील प्रत्येक प्रभागात स्वाक्षरी मोहीम…
-
रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा आज ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा आज ऑरेंज अलर्ट…. पुढील काही तासात कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशारा…. पुढील 4 दिवस कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
-
-
कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळदीचे लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले
कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळदीचे लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले आहेत. हळदीला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी संतापले आहेत. हळद खरेदीत लूट होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
-
उजनी धरण १०० टक्के भरले; जलपूजनाने आनंदोत्सव
सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले उजनी (यशवंत सागर) धरण शंभर टक्के भरल्याने जिल्हाभर आनंदाचे वातावरण आहे. यानिमित्त युवा सेना माजी जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या हस्ते धरण परिसरात जलपूजन करण्यात आले. जिल्ह्यावर निसर्गाची कृपा कायम राहावी, शेतकऱ्यांना भरघोस पीक यावे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
-
-
पावसामुळे शाळेतील मैदानात साचले पाणी
नागपूरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे प्रतापनगर मधील सोमलवार शाळेतील मैदानात साचले पाणी. शाळा सुरू असून मैदानात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने पाणी साचल्याची शक्यता. सकाळ पासून नागपूरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू असून त्यामुळे सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
-
हेल्मेट सक्तीमुळे अमरावतीत हेल्मेट खरेदीला मोठा प्रतिसाद
अमरावती शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू होताच हेल्मेटच्या खरेदीला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. शहरातील हेल्मेट विक्रेत्यांच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी वाढली असून अनेक ठिकाणी विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं चित्र आहे. वाहतूक पोलिसांच्या कडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर नागरिक सुरक्षिततेला प्राधान्य देत हेल्मेट खरेदी करत आहेत.
-
कृष्णा नदीत पुन्हा मळी मिश्रित पाण्याचा कहर
पलूस तालुक्यात कृष्णा नदीत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडल्याने नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आमणापूर, धनगाव, औदुंबर, अंकलखोप आणि भिलवडी परिसरातील नदीकाठावर हजारो मृत मासे तरंगू लागल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
-
महत्वाचं विधेयक संसेदत पण मोदी-शाह सभागृहात नाहीत, काँग्रेसचा आक्षेप
परीक्षा सुधारणा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. त्यासाठी 6 तासाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. सकाळी विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृह तहकूब करण्यात आलं होतं. आता दुपारी 2 वाजता चर्चा सुरु झाली, तेव्हा महत्वाचं विधेयक संसेदत मांडलं जात असताना मोदी-शाह सभागृहात नाहीत म्हणून काँग्रेसने आक्षेप घेतला. पण राज्यमंत्री सभागृहात असल्याचं लोकसभा अध्यक्षांनी सांगितलं.
-
गोंदियाच्या पुजारीटोला धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढविला
गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे… धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आज धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धरणातून सध्या नदीपात्रात 3241 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुजारीटोला धरणाचा पाणीसाठा सध्या 82 टक्के झाला आहे… त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून पाण्याच्या विसर्ग सुरू असल्याने नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या इशारा गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
-
इराण-अमेरिका तणावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाची बैठक
इराण-अमेरिका तणावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाची बैठक. सायंकाळी मंंत्रलयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. युद्धानंतर निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीवर बैठक होणार आहे.
-
जपानमध्ये 7.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप
जपानमध्ये 7.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप. भूकंपाच्या धक्क्यानं जपानमधील अनेक भाग हादरले. भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामाचाही इशारा देण्यात आला आहे.
-
सीईटी पेपरफुटी प्रकरणावर रोहित पवार आक्रमक
रोहित पवार म्हणाले की, “सीईटी पेपरफुटी प्रकरणात अजूनही काही मुद्दे समोर येत आहेत विद्यार्थ्यांचा डेटा खाजगी कंपन्यांना आणि प्रमोशनसाठी दिला गेले असल्याची माहिती समोर येते आम्ही लवकरच मंत्रालयासंबंधी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत.”
-
पालघर मध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का
पालघर मध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का . दापचरी, वरखंडा धुंदलवाडी , तलासरी, परिसरात भूकंपाचा हादरा जाणवला . 1 वाजून 08 मिनिटांच्या दुपारच्या सुमारास भूकंपाचा हादरा . पालघर मध्ये भूकंपाच्या लहान मोठ्या धक्क्यांच सत्र सुरूच. मुसळधार पावसानंतर आता पुन्हा भूकंपाचे धक्के बसू लागल्याने नागरिकांमध्ये चिंता. अद्याप कुठे ही नुकसानीची माहिती नाही.
-
आदर्श घोटाळ्यातील मुख्य आरोपी अंबादास मानकापे याला जामीन
आदर्श घोटाळ्यातील मुख्य आरोपी अंबादास मानकापे याला जामीन. हायकोर्टच्या औरंगाबाद खंडपीठाकडून अटी-शर्तीसह जामीन मंजूर. 202 कोटींच्या आदर्श घोटाळाप्रकरणी मानकापे तुरुंगात होता.
-
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपन प्रक्रियेला अखेर मुहूर्त
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपन प्रक्रियेला अखेर मुहूर्त. ५ व ६ ऑगस्ट रोजी पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली होणार मूर्ती संवर्धन प्रक्रिया. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दोन दिवस भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद. मूर्तीतील सूक्ष्म छिद्रे, झिजलेले भाग दुरुस्त करून संरक्षक आवरण देणार; मूर्तीचे आयुष्यमान वाढविण्यावर भर. मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती.
-
पेपरफुटीबाबत फॉरेन्सिक ऑडिट करा -रोहित पवार
पेपर फुटी बद्दल जे काही सुरू ते दुर्दैवी आहे. गृहखातं माहिती सांगितली जात असेल तर अजून पण तुमच्याकडे माहिती आलेली नाही. एमपीएससीला पण यात चिंता वाटत आहे . त्यामुळे काल संध्याकाळी सगळं सांगितलं. तर लगेच कस कळलं की यात काही झालं नाही. तपास न करता का कळत की काहीच झालं नाही. कोणालातरी वाचवण्याची तयारी गृह खाते करत आहे. पुरावे आम्ही दिले पण फॉरेन्सिक ऑडिट होण गरजेच आहे असे रोहित पवार म्हणाले.
-
मेटाने फेसबुकवरुन चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा Video उडवला
मेटाने फेसबुकवरून पंतप्रधान मोदींची पोस्ट काढून टाकल्याबद्दल माफी मागितली आहे. मेटाने म्हटले आहे की, तांत्रिक त्रुटीमुळे पंतप्रधानांचा व्हिडिओ काढून टाकण्यात आला होता. ही त्रुटी नंतर दुरुस्त करण्यात आली आणि काढून टाकलेला व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्यात आला आहे.
-
वारणा धरण 84 टक्के इतका भरलं
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे.त्यामुळे धरणातून सोडत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे,5 हजार क्यूसेक विसर्ग वारणा नदीपात्रात करण्यात येत आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील झपाट्याने वाढ होत आहे,या पार्श्वभूमीवर वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.कालपासून धरणातून 3 हजार 400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता,मात्र पावसाची संततधार कायम असल्याने धरण जवळपास 84 टक्के इतका भरला आहे,29 टीएमसी इतका पाणीसाठा धरणा मध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून परीणामी वारणा नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने नदीकाठच्या गावांनी खबरदारी घ्यावी,असा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-
विलास घुले खूनप्रकरणी एसआयटीच्या तपासाचा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे
बीडमधील विलास घुले खून प्रकरणी दहा आरोपींना अटक केली असून पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांचे नाव घेण्यात आलेले आहे. मयत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी पोलीस अधीक्षकांची नुकतीच भेट घेतली होती. यादरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे चे दोन आरोपींशी मोबाइलवरून बोलणे झाल्याचे सीडीआरचे पुरावे सादर केले होते. सदर व्यक्ती खासदार सोनवणे यांच्या कारखान्याशी निगडीत आहेत यामुळे हे फोन कशासाठी झाले हे अद्याप स्पष्ट नाही.
-
विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत करणार- आदित्य ठाकरे
विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज कुणी करायला लावला हे समोर आलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घ्यायला लावावा अशी मागणी उद्धव सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. सरकारची विद्यार्थ्यांविरोधात भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले.
-
साईचरणी बंपर गुरूदक्षिणा
शिर्डी येथील साईबाबा मंदिरात 642 ग्राम वजनाचा सुंदर नक्षिकाम असेलेला सोनेरी मुकूट अर्पण केला. सोन्याच्या मुकुटाची किंमत तब्बल एक कोटी तीन लाख रुपये इतकी आहे. आंध्रपद्रेश राज्यातील वेल्लूर येथील श्रीनिवास राव यांचेकडून सोन्याचा मुकुट भेट दिला. गुरूपोर्मिणा उत्सवाच्या पहिल्याच दिवशी कोटयवधींचे सोन्याचे दान आले. नवग्रहाची छबी आणि अमेरिकन डायमंड असलेला सुंदर नक्षिकाम केलेला सोन्याचा मुकूट गुरूदक्षिणा स्वरूपात देण्यात आला. उद्या गुरूपोर्णिमेच्या मुख्य दिवशी साई मुर्तीला मुकुट परिधान केला जाणार आहे.
-
भिलाडा जवळ भरूच MEMU ट्रेन रुळावरून घसरली
विरार–भरूच MEMU ट्रेनचे इंजिन आणि पहिला डबा भिरड रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरले. मेमू ट्रेन रुळावरून घसरल्यानंतर ५० मीटरहून अधिक अंतर पुढे सरकली होती; मात्र, चालकाने वेळीच सिग्नल पाहून गाडी थांबवली.ही गाडी भिलाड येथे थांबणार होती. गाडीचा वेग कमी असल्यानेच आज मोठा अपघात टळला.चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. गाडी कमी वेगात असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे प्रशासन हायड्रॉलिक जॅकच्या मदतीने डबा व इंजिन पुन्हा रुळावर आणण्याचे काम करत असून, मुंबई–अहमदाबाद मार्गावरील पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या उशिराने धावण्याची शक्यता आहे.
-
CET पेपर फुटला हे पण दुर्दैवी – आमदार रोहित पवार
सीईटी सेलचा मुद्दा आमच्याकडे पण आला आहे. बऱ्याच जणांनी हा मुद्दा मांडायला सुरुवात केली आहे. काल प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा १५ विभाग दाखवले ज्यात पेपर फुटले. सीईटी पेपर फुटला हे पण दुर्दैवी आहे. दुसरीकडे कुठे आंदोलन करण्यापेक्षा महाराष्ट्रात सगळ्या देशातल्या नेत्यांनी एकत्र येऊन आंदोलन करण आवश्यक आहे, असे आमदार रोहित पवार म्हणाले.
-
सीईटी पेपरफुटीच्या आरोपाचं सीईटी सेलकडून खंडन
सीईटी पेपरफुटीच्या आरोपाचं सीईटी सेलकडून खंडन करण्यात आलं आहे. CET 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांचे गुण पारदर्शकपणे दाखवते.
सध्या आलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने अंतर्गत विश्लेषण केलं जाईल, अशी माहिती CET सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली. सोशल मीडियावरचे दावे दिशाभूल करणारे आहेत, असंही त्यांचं म्हणणं आहे.
-
जळगाव – वाळू माफियांची मुजोरी, तहसीलदारांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न…
जळगाव – बोदवडमध्ये वाळू माफियांची मुजोरी तहसीलदारांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न झाला. तहसील पथकावर आणि तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुक्ताईनगर ,बोदवड तालुक्यात सर्रासपणे वाळूचे अवैध उत्खनन सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगरमध्ये वाळूचे डंपर चिमुकल्यांच्या वारीत शिरले होते, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला होता.
-
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ सुरू
लोकसभेचं कामकाज सुरू होता विरोधकांचा गदारोळ सुरू आहे. दुपारी 2 वाजता पेपरफुटीबाबत विधेयकावर चर्चा करू, असं ओम बिर्ला म्हणाले. मात्र आधी पॅलेट गनच्या मुद्यावर चर्चा करा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
-
पुणे शहराच्या काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद
पुण्यात काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. येरवडा गावठाण गुंजन साळवे भाजी मार्केट गांधीनगर, काश्मीर कॉलनी, नवी खडकी, भोसले वस्ती, काळेपडळ, हडपसर गावठाण, रामनगर झोपडपट्टी, वैदुवाडी, भीम नगर, मुंढवा, वानवडी गावठाण, कोंढवा गावठाण, डेक्कन लाईन, कल्याणी नगर, खराडी गावठाण, चंदननगर, सुतार नगर, आनंद पार्क, , मिठा नगर, बी टी कवडे रोड, लक्ष्मी नगर, कॅम्प परिसर, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट, कोरेगाव पार्क ब्रिज परिसर या भागात गुरुवारी पाणी येणार नाही.
-
नाशिकमध्ये गोदावारीची पूर परिस्थिती कायम
नाशिकमध्ये सलग आठव्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर पाण्याखालीच आहे. तर दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत पुराचं पाणी आहे. गंगापूर धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पूर परिस्थिती कायम असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
अखेर शिर्डीत गुरुपोर्णिमा उत्सवाला सुरुवात, साईभक्तांची एकच गर्दी
शिर्डीत गुरुपोर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे. अनेक भाविक शिर्डी साईबाबांच्या चरणी येऊ लागली आहेत. यामुळे शिर्डीत भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यानिमित्त रात्रभर मंदिर खुले राहणार आहे. तीन दिवस हा उत्सव सुरू राहणार आहे.
-
नागपूरच्या MIDC परिसरातील कंपनीत आग
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी MIDC परिसरात कंपनीत आग लागल्याची घटना घडली आहे. पाईप आणि कोळसा ठेवलेल्या ठिकाणी आग लागल्याची माहिती हाती आली आहे. या आगीत जीवीतहानी झालेले नाही. आता आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आज सकाळच्या सुमारास आग लागली. आता बुटीबोरी पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
-
बदलापुरात सशस्त्र चोरट्यांकडून घरफोडी
बदलापुरात सशस्त्र चोरट्यांकडून घरफोडी. हातात कोयता घेतलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद. खरवईच्या राज तुलसी सिटीमधील घटना
-
इंजीनिअरिंग सीईटी संदर्भात धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल
इंजीनिअरिंग सीईटी संदर्भात धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल. विशिष्ट परीक्षा केंद्र उपलब्ध करून, चांगले मार्क मिळवून देण्याचा ऑडिओ क्लिप मध्ये केला जातोय दावा.यापूर्वीही विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळवून दिले असल्याचा ऑडिओ क्लिपमध्ये दावा. 13लाखामध्ये चांगले मार्क मिळवून देत, सीओईपी, व्हीजेटीआय सारख्या नामांकित कॉलेजमध्ये, प्रवेश मिळून देणार असल्याचा केला जातोय दावा.
-
महाराष्ट्राचा नंबर सगळ्यात खाली त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार – संजय राऊत
“आज महाराष्ट्राचा नंबर सगळ्यात खाली त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. जंतर-मंतरची आमची मुलं आहेत, त्यांनी मोदींच्या व्हिडिओवर, भाषणावर हास्य-जत्रा सुरु केली. आमचे मुख्यमंत्री बोलतात कोट्यवधी लोकांनी पाहिला. इतक्या मिलियन लोकांनी शिव्या घातल्या ते पण पहा. जंतर-मंतरवरच्या डिजिटल मास्टर मुलांकडून शिकलं पाहिजे. या देशाने खरी डिजिटल इंडिया तिथे पाहिली. भाजपच्या आयटी सेलला टाळं लावावं लागलं” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
-
नीटचा पेपर फोडणारे भाजपचेच लोक – संजय राऊत
शेकडो मुलींचा विनयभंग झाला हा आदेश कोणी दिला? या देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेत येऊन निवदेन करावं. बाकी सगळ्या गोष्टींवर निवेदन करतात. पक्ष फडोण्याच्या जबाबदाऱ्या घेतात. जंतर-मंतरवरील लाठीचार्जची जबाबदारी कोणी घ्यावी, या बाबत गृहमंत्र्यांनी निवेदन करावं. पीएम मोदींनी माफी मागावी. पेपरफुटला हे राज्याचे मुख्यमंत्री मान्य करणार नाहीत. पेपरफुटीचे लाभार्थी हे त्यांच्याच पक्षाचे आहेत. नीटचा पेपर फोडणारे भाजपचेच लोक आहेत. मुख्यमंत्र्यांनी मान्य करावं पेपर फुटला असं संजय राऊत म्हणाले.
-
एनडीए मध्ये पक्ष वाढेल पण कमी होणार नाही – मंत्री जयकुमार गोरे
एनडीए म्हणून आम्ही एकसंध आहोत.माझ्या माहितीप्रमाणे एनडीए मध्ये एखादा दुसरा पक्ष वाढतोय पण कमी होण्याची शक्यता नाही. आपलं चॅनेल बातम्या चालवत आहे. आणखी काही अॅडिशन होणार आहे डिलिशन नाही असं मंत्री जयकुमार गोरे म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उत्तम कामे करतायत. राज्यातील निवडणुकामध्ये मिळालेले यश ही त्यांच्या कामाची पोच पावती आहे असं जयकुमार गोरे म्हणाले.
-
जालना जिल्ह्याला पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी; विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
मुंबईच्या कुलाबा येथील हवामान केंद्राकडून जालना जिल्ह्याला पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून 31 जुलै पर्यंत जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली,शिवाय ताशी 50 किलोमीटर वेगाने सोसायट्याचा वारा देखील वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांसह शेतकऱ्यांना खबरदारी घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन देखील केलंय.दरम्यान पाऊस सुरू असताना मोबाईलचा वापर विद्युत उपकरणांचा वापर टाळावा आणि विजा चमकत असेल तर सुरक्षित स्थळी थांबावं असं आवाहन देखील करण्यात आले.
-
सासरच्या छळाला कंटाळून 27 वर्षीय विवाहित महिलेची आत्महत्या,अंबड तालुक्यातल्या डोमेगाव येथील घटना
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील डोमेगाव गावात सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका 27 वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली, नीता शरद लहामगे असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून सासरच्या मंडळींनी माहेरून दोन लाख रुपये आणण्याचा दबाव आणि घर कामाच्या कारणावरून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे आरोप आहेत. दरम्यान या सगळ्या घटने प्रकरणी मृत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात पती सासू दीर आणि जाऊ अशा 4 जनाविरुद्ध आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय.
-
जालना शहरातल्या नवीन मोंढा परिसरात गोदाम फोडून सोयाबीनची चोरी करणारी टोळी जेरबंद
जालना शहरातल्या नवीन मोंढा परिसरात गोदाम फोडून सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीला चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून जवळपास एक लाख 14 हजार रुपये किमतीचा 21 क्विंटल 50 किलो सोयाबीन जप्त करण्यात आलाय शिवाय चोरीचा माल विकत घेणाऱ्या 2 व्यापाऱ्यांना देखील पोलिसांनी यामध्ये आरोपी केलय. दरम्यान पोलिसांनी या तिघांना अटक केला असून त्यांना चार दिवसांची देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, या प्रकरणात अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून या रॅकेटची साखळी नेमकी कुठपर्यंत आहे याचा देखील कसून तपास पोलीस आता करत आहे.
-
60 वर्षाच्या नराधमाकडून 10 आणि 5 वर्षाच्या दोन सख्या बहिणीवर वारंवार लैगिक अत्याचार
पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका 60 वर्षाच्या नराधमा कडून 10 आणि 5 वर्षाच्या दोन सख्या बहिणीवर वारंवार लैगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुली पैकी एका मुलीच्या पोटात वारंवार दुखू लागल्या नंतर तिच्या कुटुंबियांना ही धक्कादायक घटना कळाली आहे. या प्रकरणात पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी आणि संतप्त नागरिकांनी नराधमा विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी काल रात्री वाकड पोलीस स्टेशनमध्ये मोठी गर्दी केली होती. त्यानंतर वाकड पोलिसांनी नराधमाला ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक शहर आणि परिसरात काल रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली. पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचा विसर्गही कमी केला. गंगापूर धरणातून सध्या 4 हजार 947 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दारणा धरणातून 2,600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने गोदावरी आणि दारणा नदीवरील पूर ओसरला आहे. तर शेळगाव मध्यम प्रकल्पात 58.53 टक्के जलसाठा शिल्लक असून गतवर्षाच्या तुलनेत 37% ने पाणी पातळीत वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील शेळगाव मध्यम प्रकल्प यावल चोपडा अनेक भागात सिंचन उपयोगी महत्त्वाचा आहे. तर बँकेचे व्यवहार करताना सावध राहा, सेवानिवृत्त ओळखपत्रच्या आमिषाने डोंबिवलीतील निवृत्त नौदल अधिकाऱ्याची फसवणूक झाली आहे. ओटीपी घेत 5.98 लाखांवर डल्ला मारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. डोंबिवलीतील नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या 61 वर्षीय महिलेची ऑनलाईन फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. तर बोरीवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. त्यांनी वाईन शॉपजवळ विकल्या जाणाऱ्या बंदी असलेल्या सिगारेट आणि अमली पदार्थांचा पर्दाफाश केला. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.
Published On - Jul 28,2026 8:50 AM
