Chanakya Niti : नातेवाईकांच्या घरी जाताय? मग या चुका टाळाच, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की प्रत्येकाला आपल्या प्रियजनांना भेटण्याची ओढ असते. परंतु आपण जेव्हा आपल्या नातेवाईकांना भेटतो, तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही माणसाला आदर्श जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतात. चाणक्य आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हणतात. प्रत्येकाला आपल्या प्रियजनांना भेटण्याची ओढ असतो. आपण महिन्यातून, वर्षातून कधी न कधी आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे त्यांना भेटण्यासाठी जातच असतो. त्यांच्या सुख दु:खात सहभागी होत असतो. परंतु हे सर्व करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. काही अलिखित संकेत असतात, या संकेतांचं पालन झालं तरच तुमचं नातं दीर्घकाळ टिकतं, अन्यथा नात्यामध्ये कटुता येण्यास वेळ लागत नाही. काही लोक नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर नकळत काही चुका करतात, या चुका टाळल्या पाहिजे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
कल्पना न देता घरी जाणं टाळा – चाणक्य म्हणतात तुम्ही कुठल्याही नातेवाईकांच्या घरी जाणार असाल, तो नातेवाईक तुमच्या कितीही जवळचा असला तरी देखील त्याला कल्पना न देता थेट त्याच्या घरी जाणं टाळा. कारण प्रत्येक जण हा आपल्या कामात व्यस्त असतो, एखाद्याचं आधीच काही तरी नियोजन ठरलेलं असेल त्यामुळे तुमच्या अचानक येण्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कुठेही जाणार असाल तर आधी त्या व्यक्तीला तुम्ही येणार असल्याची कल्पना द्या, म्हणजे त्या व्यक्तीला नियोजन करणं सोपं होतं.
मोकळ्या हाताने जाऊ नका – चाणक्य म्हणतात तुम्ही तुमच्या कोणत्याही नातेवाईकांच्या घरी जाणार असाल तर कधीही मोकळ्या हाताने जाऊ नका, तुम्ही ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी जाणार आहात, त्या व्यक्तीला काही न काही तरी भेटवस्तू घेऊन जा, त्यामुळे तुमच्याबद्दल त्या व्यक्तीच्या मनात असलेला आदर आणखी वाढतो, नातेसंबंध मजबूत होतात.
सल्ला देणं टाळा – चाणक्य म्हणतात तुम्ही जर एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाणार असाल आणि अशा नातेवाईकाच्या आयुष्यात काही समस्या चालू असतील तर त्याला सल्ला देणं टाळा, संबंधित विषयावर गप्प राहण्यातच भलाई आहे. जोपर्यंत समोरचा व्यक्ती तुम्हाला तुमचा सल्ला मागणार नाही, तोपर्यंत त्याला सल्ला देण्याच्या भानगडीमध्ये पडू नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
