AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाकडी, धातूची की दगडी.. घराबाहेर कोणत्या मटेरियलची नेमप्लेट लावणं शुभ ?

घराच्या नेमप्लेटची निवड वास्तुशास्त्रानुसार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लाकडी , धातूची किंवा मेटलची कोणती नेमप्लेट लावणं योग्य ते समजून घेऊया.

| Updated on: Sep 12, 2026 | 9:50 PM
Share
घराच्या मुख्य दरवाजावर लावलेली नेमप्लेट ही केवळ घराची ओळख सांगणारी गोष्ट नाही. वास्तुशास्त्रातील मान्यतांनुसार, नेमप्लेटचे मटेरियल आणि ती कोणत्या दिशेला लावली आहे, याचाही घरातील ऊर्जेशी संबंध मानला जातो. त्यामुळे नेमप्लेट निवडताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे मानलं जातं. लाकडी, धातूची की दगडी..यापैकी कोणत्या मटेरियलची नेमप्लेट कोणत्या दिशेला लावणे शुभ मानलं जातं, चला जाणून घेऊया

1 / 7
लाकडी नेमप्लेट -  वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, लाकडाचा संबंध विकास, स्थिरता आणि समृद्धीशी जोडला जातो. त्यामुळे लाकडापासून तयार केलेली नेमप्लेट घरासाठी शुभ मानली जाते.नेमप्लेट बनवण्यासाठी सागवान, शिसव, महोगनी आणि आंबा यांसारख्या मजबूत लाकडांचा वापर करता येतो. मात्र, केवळ लाकडासारखा दिसणारा प्लायवूड, MDF किंवा प्लास्टिकचा वापर टाळण्याचा सल्ला दिला जातो. लाकडी नेमप्लेटसाठी पूर्व आणि दक्षिण दिशा अनुकूल मानल्या जातात.

2 / 7
धातूची नेमप्लेट -  धातूपासून बनवलेल्या नेमप्लेटचा संबंध धन, प्रगती आणि नवीन संधींशी जोडला जातो. पितळ, तांबे, स्टील किंवा लोखंड यांसारख्या धातूंपासून आकर्षक नेमप्लेट तयार करता येते.यामध्ये विशेषतः पितळेची नेमप्लेट शुभ मानली जाते.

3 / 7
वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, धातूची नेमप्लेट उत्तर किंवा पश्चिम दिशेला लावणे योग्य मानले जाते. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जात असल्याने, या दिशेला पितळेची नेमप्लेट लावणे धन-समृद्धीसाठी शुभ मानले जाते.

4 / 7
दगडी नेमप्लेट - दगडाचा संबंध पृथ्वी तत्त्वाशी जोडला जातो. त्यामुळे तो मजबुती, स्थिरता आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानला जातो.  संगमरवर, ग्रॅनाइट किंवा इतर नैसर्गिक दगडांपासून बनवलेली नेमप्लेट मुख्य दरवाजावर लावता येते. मान्यतेनुसार, दगडाची नेमप्लेट नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षणाशीही जोडली जाते.

5 / 7
दगडी नेमप्लेटसाठी दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पश्चिम दिशा शुभ मानल्या जातात. विशेषतः दक्षिण-पश्चिम दिशा स्थिरतेशी संबंधित मानली जाते. या दिशेला नेमप्लेट लावल्याने घरातील प्रमुखाची प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.

6 / 7
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय मान्यतांवर तसेच सामान्य माहितीनुसार आधारित आहे. ती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे.  याला कोणताही वैज्ञानिक आधार असल्याचा दावा करण्यात आलेला नाही. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही, याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. )

7 / 7
Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...