AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 हजार वाहने सुरु कोणाचेही इंजिन खराब झाले का ? E20 इंधनाला पैसे घेऊन बदनाम केले, नितीन गडकरींचा आरोप

इथेनॉल, मेथेनॉल फ्यूअलच्या घरगुती उत्पादनाला प्रोत्साहन दिल्याने भारताचे अब्जावधी रुपये आणि परकीय चलनचा भंडार वाचेल आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवर देशाचे अवलंबित्व कमी होईल असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

24  हजार वाहने सुरु कोणाचेही इंजिन खराब झाले का ? E20 इंधनाला पैसे घेऊन बदनाम केले, नितीन गडकरींचा आरोप
nitin gadkari
| Updated on: Oct 27, 2026 | 9:57 PM
Share

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिक्स करण्यावरुन झालेल्या वाद आणि विरोधाला पेड प्रोपेगेंडा म्हणजे पैसे देऊन केलेला निगेटिव्ह प्रचार म्हटले आहे. उद्योग संघटना CII च्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की तीन महिन्या आधी इथेनॉल ब्लेंडिंग संदर्भात खूपच गदारोळ झाला होता. परंतू आता सर्व शांत झाले आहे आणि वाहतूक सर्वसामान्य रुपात सुरु आहे.

नितीन गडकरी यांचे हे वक्तव्य केंद्राने केंद्रीय मोटर व्हेईकल रुल्स १९८९मध्ये सुधारणा करुन फ्लेक्स फ्युएल कारसाठी E100 (जवळपास 100% प्युअर इथेनॉल) ला इंधनाच्या रुपात नोटीफाय करण्याच्या एक दिवसानंतर आले आहे.

२४ हजार वाहने सुरु कोणाचेही इंजिन खराब झाले नाही.

या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी E20 इंधनाच्या विश्वासार्हतेवर केल्या जाणाऱ्या आरोपांना उत्तर दिले आहे. गडकरी म्हणाले की साल २०२२ पासून देशात सुमारे ४ कोटी कार आणि २० कोटी दुचाकी वाहन E20 इंधनावर चालत आहेत. तीन महिन्यांआधी यावरुन खूप हंगामा करण्यात आला होता. आता सर्व शांत झाले आहे. काय या दरम्यान कोणाचे इंजिन खराब झाले किंवा इंजिन बंद पडले.? संपूर्ण विरोध स्पॉन्सर्ड आणि पेड प्रोपगँडा होते.

गडकरी पुढे म्हणाले की इथेनॉल, मेथनॉल, बायो-डीझेल, एलएनजी, सीबीजी, ग्रीन हायड्रोजन आणि एव्हीएशन बायो-फ्यूअलच्या घरगुती उत्पादनाला प्रोत्साहन दिल्याने भारताचे अब्जावधी रुपये आणि परकीय चलनचा भंडार वाचेल आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवर देशाचे अवलंबित्व कमी होईल.

120 kmph च्या स्पीडवर नो-चालानचा निर्देश

हायवे आणि एक्सप्रेसवेवर १२० किमी प्रतितास वेगाने वाहने चालवत असतील तर दंड आकारुन नये असे आदेश नितीन गडकरी यांनी दिले. ते म्हणाले एखादा चालक १२० किमी किंवा त्याहून २० टक्के जास्त ( १४४ किमी ) वाहन चालवत असेल तरी त्याला सोडावे, केवळ त्याहून जास्त वेगाने वाहने चालवल्यास कारवाई करावी असेही गडकरी म्हणाले. राष्ट्रीय महामार्गांवर लेन शिस्त राखण्यासाठी आणि स्वयंचलित चलन प्रक्रिया राबवण्यासाठी एआय-आधारित ‘प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली’ (एटीएमएस) लागू करण्याकरिता उद्योजकांनी सहकार्य करावे अशी मागणी यावेळी नितीन गडकरी यांनी केली.

तुमच्या कारमध्ये चालेल E100 इथेनॉल?

रस्ते वाहतूक मंत्रालयाने जरी मोटार वाहन कायद्यात बदल केला असेल तरी याचा अर्थ हा नाही की तुमच्या साध्या पेट्रोल कारमध्ये E100 इंधन चालेल. E100 (100% इथेनॉल) वा E85 इंधनाचा वार केवळ त्याच फ्लेक्स-फ्युअल वाहनात होईल, ज्यांना वाहन निर्माता कंपन्यांनी खास विशेष रुपाने तयार केलेल्या वाहनात करता येणार आहे. ज्या कार सामान्य पेट्रोल वा E20 अनुरुप आहेत, त्यात E100 चा वापर करता येणार नाही. कारण, इंजिनाच्या पार्ट्स आणि फ्युअल पाईपमध्ये बिघाड होऊ शकतो. भारत सरकारने २०२३ पासून निर्माण होणाऱ्या सर्व नव्या पेट्रोल कारसाठी E20 इंधन कंपॅटिबिलिटीला अनिवार्य केले आहे, जे सध्या देशभरातील पेट्रोल पंपावर उपलब्ध आहे.

Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...