
Health : योगा हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. योगा केल्यामुळे आपले शारीरिक आरोग्य चांगले राहते. सोबतच आपले मानसिक आरोग्य ही उत्तम राहते. योगा हा सर्व वयोगटातील लोक करू शकतात. विशेष म्हणजे लहान मुलांसाठी योगा फायदेशीर आहे. यामुळे लहान मुलांचा फोकस वाढतो आणि त्यांचे मन तीक्ष्ण होते. योगा हा लहान मुलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी खूप आवश्यक आहे.
21 जून रोजी 9वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. तर योगा हा फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील केला जात आहे. योग तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 5वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची मुले योगा करू शकतात.
योगासन सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मुलांशी संवाद साधा. सगळ्यात आधी त्यांना योगाच्या सोप्या पायऱ्या सांगा. कोब्रा पोज, बटरफ्लाय, ट्री पोज या पोजमधून लहान मुलांना योगासनांची ओळख करून दिली जाऊ शकते. त्यासोबतच योगा करताना लक्ष केंद्रित कसे करावे याबाबतही त्यांना सांगावे. त
योगा करण्यापूर्वी मुलांनी श्वासोच्छवासाचे व्यायाम केले पाहिजेत. बन्नी ब्रीद, बेली ब्रीदिंग, फ्लॉवर ब्रीद यासारखे श्वासोच्छवासाचे व्यायाम मुलांनी केले पाहिजेत. त्यासाठी मुलांना दीर्घ श्वास घेण्यास सांगा नंतर हळूहळू श्वास सोडण्यास सांगा. श्वासोच्छवासामुळे मुलांचे लक्ष आणि भावनिक नियमन कौशल्य वाढते.
मुलांचा एक गट बनवा आणि त्यांना योगा करायला शिकवा. त्यामुळे टीम वर्कने कसं काम करता हे त्यांना लक्षात येईल. एकत्र काम केल्याने मुलांमध्ये एकमेकांना मदत करण्याची भावना वाढते. त्यामुळे रिलेशनही चांगले होण्यास मदत होते.