AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Joint Pain: तरुणांनाही होऊ शकते सांधेदुखीची समस्या, ती कशी टाळावी?

गेल्या अनेक वर्षांपासून सांधेदुखीचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यावर मात करण्याचे मार्ग शोधा. मात्र काही गोष्टींची काळजी घेतली तर ही समस्या टाळता येऊ शकते.

Joint Pain: तरुणांनाही होऊ शकते सांधेदुखीची समस्या, ती कशी टाळावी?
Joint painImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 19, 2023 | 5:36 PM
Share

मुंबई: सांधेदुखी हा सामान्यत: वृद्धापकाळाचा आजार मानला जातो, परंतु गेल्या काही वर्षांत तरुणांमध्येही या समस्या दिसून आल्या आहेत. 30 ते 35 वयोगटातील लोकांनाही सांधेदुखीचा त्रास होतो. अनेकदा लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्येही या समस्या समोर येत आहेत. सहसा आपली खराब जीवनशैली याला कारणीभूत असते कारण आपण बहुतेक वेळ टीव्ही आणि लॅपटॉपसमोर घालवतो, तर मुलेही मैदानात जाण्यापेक्षा ऑनलाइन गेमला जास्त वेळ देत असतात. यामागची कारणे कोणती आहेत आणि ते कसे टाळता येईल हे जाणून घेऊया.

सांधेदुखीची कारणे

  • अनुवांशिक कारणे.
  • दुखापतीमुळे वेदना होणे.
  • स्नायू कमकुवत होणे.
  • ऑटोइम्यून विकार
  • शरीरात कॅल्शियमची कमतरता
  • जास्त वजन

सांधेदुखी कशी ओळखावी?

  • या आजारात शरीराच्या सांध्यामध्ये तीव्र वेदना होतात.
  • हिवाळ्याच्या ऋतूत ही वेदना वाढते.
  • कधी कधी इतकं दुखतं की चालणंही अवघड होऊन बसतं.
  • पायऱ्या चढताना आणि उतरताना सांधेदुखी वाढते.
  • थकवा जाणवतो आणि अंग दुखते.

सांधेदुखी कशी टाळावी?

गेल्या अनेक वर्षांपासून सांधेदुखीचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यावर मात करण्याचे मार्ग शोधा. मात्र काही गोष्टींची काळजी घेतली तर ही समस्या टाळता येऊ शकते.

ही समस्या टाळता येऊ शकते

  • खूप थंड पाण्याने आंघोळ करणे टाळा कारण थंड पाण्यामुळे सांधेदुखी वाढू शकते.
  • जास्त थंड वारा असल्यास घराबाहेर पडू नका आणि खिडकीचे दरवाजे बंद करा.
  • हिवाळ्यात आंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करा, कारण यामुळे सांधेदुखीचा धोका कमी होतो.
  • सूर्यप्रकाशात बाहेर पडा आणि तेलाची मालिश करण्याचा प्रयत्न करा.
  • तुम्हाला हवं असेल तर एखाद्या तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार तुम्ही योगा आणि मेडिटेशनचा आधार घेऊ शकता.
  • आपल्या दैनंदिन आहारात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12-आधारित पदार्थांचा समावेश करा.
  • शरीर उबदार ठेवा, थंड होऊ देऊ नका, अन्यथा वेदना वाढू शकतात.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.