हातापायात मुंग्या येतात, वस्तूही पकडता येत नाही, तुम्हाला पेरिफेरल न्यूरोपॅथी तर नाही ना?, डॉक्टरांकडून जाणून घ्या..

डायबिटीजमध्ये काही रुग्णांना नसांमध्ये वेदना होतात. परंतू जर डायबिटीज नाही तरही तुमच्या नसांमध्ये तीव्र वेदना होत असतील तर यांची कारणे जाणणे गरजेचे आहे. या संदर्भात डॉक्टरांचे काय म्हणणे पाहूयात..

हातापायात मुंग्या येतात, वस्तूही पकडता येत नाही, तुम्हाला पेरिफेरल न्यूरोपॅथी तर नाही ना?, डॉक्टरांकडून जाणून घ्या..
peripheral neuropathy
| Updated on: Feb 10, 2026 | 3:57 PM

जर तुमची शुगर कंट्रोलमध्ये आहे. डायबिटीजचा आजार देखील डिटेक्ट झालेला नाही. तरीही नसांमध्ये दुखणे सुरु असेल हातापायाला मुंग्या येत असतील या मागची कारण समजून घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या मते जर अशा प्रकारची समस्या असेल तर याच कारण पेरिफेरल न्यूरोपॅथी असते. काय हा नेमका आजार आणि या संदर्भात डॉक्टरांकडून जाणून घेऊयात…

मॅक्स साकेतच्या न्यूरोसर्जरी विभागाचे असोसिएट डायरेक्टर डॉ. दलजीत सिंह यांनी सांगितले की पेरिफेरल न्यूरोपॅथी या आजारात मेंदूतून आणि स्पायनल कॉर्डमधून बाहेर जाणाऱ्या नसांवर परिणाम होतो. जर कोणतीही गडबड या नसांमध्ये झाली तर व्यक्तीच्या पायात आणि हातात मुंग्या आल्यासारखे होते किंवा सुन्नपणा आणि बधिरपणा जाणवतो. या तक्रारी त्या लोकांमध्ये देखील असतात ज्यांना डायबिटीज नाही किंवा ज्यांची शुगर लेव्हल नियंत्रणात आहे.

पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणजे काय ?

पेरिफेरल न्यूरोपॅथीचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरात व्हिटामिन्स B12 ची कमतरता असणे होय याशिवाय जर स्पाईनचा कोणताही आजार, चुकीच्या पद्धतीने बसणे वा ऑटोइम्यून आजाराने देखील नसांना नुकसान पोहचू शकते. सर्वसाधारणपणे पाहिले गेले आहे की जे लोक डेस्क जॉब करतात आणि रोज व्यायाम करत नाहीत. त्यांना देखील ही समस्या होते.

आधी हा प्रकार साधारण 50 ते 60 वर्षांहून अधिकच्या लोकांमध्ये पाहायला मिळायचा. परंतू आता 40 आणि 30 वयोगटातील लोकांना देखील हा आजार होऊ लागला आहे असे डॉ. दलजीत सांगतात. मात्र, हा आजार काही अचानक होत नाही. हा आजार होण्याच्या आधी शरीरात अनेक प्रकारची लक्षणे पाहायला मिळतात. ज्यांना नजरअंदाज करु नये. खास करुन ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी तर काळजी घ्यायला हवी.

पेरिफेरल न्यूरोपॅथीची लक्षणे काय ?

हाता पायांमध्ये सुन्नपणा जाणवणे

पायांच्या तळव्यात जळजळ होणे

चालताना तोल जाणे

हातापायात कमजोरी

वस्तू पकडताना अडचण

उपाय कसा केला जातो –

आधी पाहूयात या आजाराची कारणे नेमकी काय आहेत. जर तुमच्या शरीरात व्हिटामिन्सची कमी आहे तर यासाठी तुम्हाला औषधे दिली जातात. जर मणक्याच्या संबंधीत त्रास असेल फिजिओथेरपी, एक्सरसाईज, आणि औषधे चालतात. वेदना नियंत्रणासाठी न्यूरोपॅथिक पेनची औषधे दिली जातात. या प्रकारे रुग्णावर उपचार केला जातो.

Follow Us