AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेहवागच्या लहान पोराची कमाल, थेट 7 विकेट घेतल्या, आर्यवीरच्या कॅप्टन्सीत मोठी कामगिरी!

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सेहवाग कुटुंबातील पुढची पिढी क्रिकेटमध्ये आपली छाप पाडत आहे. मोठा मुलगा आर्यवीर याच्याकडे दिल्लीच्या अंडर-19 संघाची कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर धाकटा मुलगा वेदांत याने पंजाबविरुद्ध अशी कामगिरी केली की त्याची चर्चा सुरू झाली आहे.

सेहवागच्या लहान पोराची कमाल, थेट 7 विकेट घेतल्या, आर्यवीरच्या कॅप्टन्सीत मोठी कामगिरी!
Vedant Sehwag 7 WicketsImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 26, 2026 | 10:12 PM
Share

भारतीय क्रिकेटमध्ये एकेकाळी आपल्या तुफानी फलंदाजीने गोलंदाजांची झोप उडवणारा वीरेंद्र सहवाग आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवत त्याच्या दोन्ही मुलांनी देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानात आपली वेगळी ओळख निर्माण करायला सुरुवात केली आहे. कूच बिहार ट्रॉफीच्या सामन्यात मोठा भाऊ आर्यवीर सहवाग दिल्ली अंडर-19 संघाचं नेतृत्व करत असताना, धाकट्या वेदांत सहवागने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर तब्बल 7 विकेट्स घेत पंजाबला रोखलं आहे.

वेदांतच्या फिरकीपुढे पंजाब गारद

रोपड येथील गव्हर्नमेंट कॉलेज क्रिकेट मैदानावर पंजाब आणि दिल्ली अंडर-19 संघांमध्ये कूच बिहार ट्रॉफीचा सामना सुरू आहे. या सामन्यात 16 वर्षीय वेदांत सहवागने आपल्या ऑफ स्पिन गोलंदाजीने पंजाबच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक केली. वेदांतने 22.3 षटकांत 5 निर्धाव षटके टाकत 88 धावा देऊन 7 विकेट्स घेतल्या. त्याच्या या प्रभावी माऱ्यामुळे पंजाबचा पहिला डाव 238 धावांवर आटोपला. पंजाबच्या आघाडीच्या फळीतील तीन फलंदाजांना त्याने तंबूत धाडलं. विशेष म्हणजे, अंडर-19 आशिया कप विजेत्या भारतीय संघाचा सदस्य आणि पंजाबचा कर्णधार अर्जुन राजपूत याचीही महत्त्वाची विकेट वेदांतनेच मिळवली.

आर्यवीरची संयमी खेळी; आयपीएल लिलावासाठीही नोंदणी

एकीकडे वेदांत गोलंदाजीत चमक दाखवत असताना दुसरीकडे 19 वर्षीय आर्यवीर संघाची धुरा सांभाळत आहे. पंजाबविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने ९४ चेंडूंत ३१ धावांची संयमी खेळी केली. सुरुवातीलाच विकेट पडल्यानंतर त्याने द्वीप गल्होत्राच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी रचत डाव सावरला.

आर्यवीरने याआधीही आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली आहे. अंडर-19 आशिया कपमध्ये त्याने 5 डावांत 90.25 च्या सरासरीने 361 धावा केल्या होत्या. ज्यात यूएईविरुद्धच्या 160 धावांच्या खेळीचा समावेश होता आणि त्याला मालिकावीराचा किताबही मिळाला होता. याशिवाय विनू मांकड ट्रॉफीमध्ये चंदीगडविरुद्ध  173 धावा आणि 2024 च्या कूच बिहार ट्रॉफीमध्ये मेघालयविरुद्ध 297 धावांची मोठी खेळी त्याने केली आहे. आता आर्यवीरचं नाव आयपीएल 2027 च्या लिलावासाठी नोंदणी केलेल्या 1220 खेळाडूंच्या यादीतही समाविष्ट आहे. 16 डिसेंबरला गोव्यात होणाऱ्या या लिलावाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकंदरीतच, एकाच सामन्यात भाऊ कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत असताना धाकट्याने विकेट्सची कमाई केल्याने सहवाग कुटुंबातील नव्या पिढीची मैदानावरील घोडदौड लक्षवेधी ठरत आहे.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला