AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : सलमान खानच्या अडचणी वाढल्या! राजश्री पान मसाला जाहिरात प्रकरणी राज्य ग्राहक आयोगाची नोटीस; काय घडलं?

Salman Khan Pan Masala Ad : सलमान खानच्या राजश्री पान मसाला जाहिरातीवरून वाद निर्माण झाला आहे. काय घडलं नेमकं? जाणून घ्या.

Salman Khan : सलमान खानच्या अडचणी वाढल्या! राजश्री पान मसाला जाहिरात प्रकरणी राज्य ग्राहक आयोगाची नोटीस; काय घडलं?
| Updated on: Nov 26, 2026 | 9:47 PM
Share

बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा कायदेशीर प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. राजश्री पान मसाल्याच्या जाहिरातीशी संबंधित प्रकरणात राजस्थान राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाने सलमान खान आणि राजश्री पान मसाला कंपनीला नोटीस बजावली आहे. जाहिरातीमध्ये उत्पादनात केशर आणि वेलचीसारखे महागडे घटक असल्याचा दावा केला जात असल्याने याचिकाकर्त्याने त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे, बाजारात अवघ्या 5 ते 10 रुपयांना मिळणाऱ्या पुडीत चार लाख रुपये किलो दराचं केशर कसं असू शकतं, असा सवाल करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

जोधपूर येथील गजेंद्र कुमार यांनी राजस्थान राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या जोधपूर सर्किट बेंचमध्ये यासंदर्भात पुनरीक्षण याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना आयोगाने सलमान खान आणि राजश्री पान मसाला यांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, सलमान खान राजश्री पान मसाल्याचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून जाहिरातींमध्ये दिसतात. या जाहिरातींमधून उत्पादनात केशर आणि वेलचीसारखे प्रीमियम घटक असल्याचं भासवलं जातं. मात्र, इतक्या कमी किमतीत विकल्या जाणाऱ्या उत्पादनात महागडं केशर वापरणं शक्य आहे का, असा प्रश्न याचिकाकर्त्याने उपस्थित केला आहे.

5 रुपयांच्या पुडीत चार लाखांचं केशर कसं?

याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत बाजारात 5 ते 10 रुपयांना मिळणाऱ्या पान मसाल्याच्या पुडीत प्रतिकिलो सुमारे चार लाख रुपये किमतीचं केशर वापरणं कसं शक्य आहे, असा सवाल केला आहे. जाहिरातींमधील अशा दाव्यांमुळे सामान्य ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते, असा युक्तिवाद करण्यात आला आहे. विशेषतः तरुणांवर अशा जाहिरातींचा प्रभाव पडू शकतो. सलमान खानसारख्या लोकप्रिय अभिनेत्यानं अशा उत्पादनाचं प्रमोशन केल्यामुळे तरुणांना चुकीचा संदेश मिळण्याची शक्यता असल्याचंही याचिकाकर्त्याने म्हटलं आहे. पान मसाल्याच्या सेवनामुळे आरोग्याला होणाऱ्या धोक्यांचाही याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित जाहिरातींवर ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सलमान खानच्या स्वाक्षरीवरही उपस्थित केले प्रश्न

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. आयोगासमोर सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवरील सलमान खानच्या स्वाक्षरीच्या सत्यतेवर याचिकाकर्त्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित कागदपत्रांवरील स्वाक्षऱ्या सलमान खानच्या मूळ स्वाक्षऱ्या नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या स्वाक्षऱ्यांची फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी अर्थात एफएसएलकडून तपासणी करण्यात यावी, तसेच सलमान खान यांची वैयक्तिक उपस्थिती सुनिश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, जोधपूरमधील जिल्हा ग्राहक आयोगाने 16 सप्टेंबर 2026 रोजी दिलेल्या आदेशात ही मागणी मान्य केली नव्हती. या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्याने राज्य ग्राहक आयोगाकडे पुनरीक्षण याचिका दाखल केली. त्यानंतर प्राथमिक सुनावणीत याचिका स्वीकारून आयोगाने सलमान खान आणि संबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. त्यामुळे सलमान खान आणि राजश्री पान मसाला कंपनी या नोटिशीला काय उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला