दुबई विमानतळावर ड्रोन हल्ला, तब्बल 19 भारतीयांना अटक, थेट…

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव टोकाला गेला. थेट क्षेपणास्त्रांनी हल्ले केले जात आहेत. यादरम्यानच आता खळबळ उडाली. थेट दुबईच्या विमानतळावर अत्यंत मोठा हल्ला इराणकडून करण्यात आला. त्यानंतर दुबईकडून मोठी पाऊले उचलण्यात आलीत.

दुबई विमानतळावर ड्रोन हल्ला, तब्बल 19 भारतीयांना अटक, थेट...
Dubai Airport
| Updated on: Mar 16, 2026 | 11:04 AM

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकाला एका मागून एक धक्के बसताना दिसत आहेत. अमेरिकेवरील संकटे वाढत आहेत. होर्मुज खाडीत काही देशांना त्यांच्या युद्धनाैका पाठवण्यास अमेरिकेने सांगितले. मात्र, या सर्व देशांनी हात वर करत अमेरिकेने मागितलेल्या मदतीवर माैन धरले. अमेरिका कुठे ना कुठे इराणसोबतच्या युद्धात एकटी पडल्याचे बघायला मिळतंय. उलट इराणच्या बाजूने भक्कमपणे चीन आणि रशिया उभे आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धात चीन आणि रशिया इराणची मदत करत असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर इराणकडून थेट सांगून टाकण्यात आले की, चीन आणि रशिया आपल्याला कशाप्रकारे मदत करत आहेत. इराणच्या बाजूने अनेक देश उभे असताना अमेरिकेच्या मदतीला कोणीही धावून येत नाहीये. होर्मुज मार्ग बंद असल्याने अमेरिकेवर दबाव असून जागतिक बाजारात तेलाच्या किमतीची मोठी वाट लागली. सतत तेलाच्या किमती वाढत आहेत आणि हेच इराणला हवे आहे.

इराणकडून काही वेळापूर्वीच दुबई विमानतळावर घातक ड्रोन हल्ला करण्यात आला. इराणकडून आखाती देशांमध्ये या युद्धादरम्यान मोठे हल्ले केले जात आहेत. आज मोठा हल्ला दुबई विमानतळावर करण्यात आला. मात्र, या ड्रोन हल्ल्यानंतर भारतात मोठी खळबळ उडाली. ड्रोन हल्ल्यानंतर दुबईमध्ये तब्बल 19 भारतीय नागरिकांना अटक केल्याची माहिती मिळत आहे.

सोमवारी दुबई विमानतळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर सोशल मीडियावर फेक व्हिडीओ शेअर करण्याच्या आरोपाखाली 19 भारतीय लोकांसह 35 जणांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. यूएईच्या डब्ल्यूएएमने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या लोकांना लगेचच कोर्टात दाखल केले जाईल. ताज्या यादीनुसार, यामध्ये विविध देशांचे 25 लोक आहेत. ज्यामुळे 17 भारतीय नागरिकांचा समावेश आहे.

युएईचे अटॉर्नी जनरल डॉ. हमाद सैफ अली शम्सी यांनी म्हटले की, ही कारवाई डिजिटल पडताळणीनंतर करण्यात आली. खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. हे लोक वेगवेगळ्या ठिकाणी होते. एआयच्या मदतीने व्हिडीओ तयार केली जात होती आणि सोशल मीडियावर व्हायरल केली जात होती.

दुबईच्या विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर मोठा निर्णय घेत काही वेळाकरिता उड्डाण थांबवण्यात आली. विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. यासोबतच सांगण्यात आले की, प्रवाशांना सूचना आहे की, त्यांनी विमानाच्या उड्डाणाबद्दल संबंध विमान कंपनीसोबत संपर्क करावा.

Follow Us