अमेरिकेची धमकी येताच इराणचा सर्वात मोठा हल्ला, थेट दुबाईवर… उडाली मोठी खळबळ!

Video: सध्या सोशल मीडियावर इराणने दुबईवर हल्ला केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये इराणने केलेला हल्ला दिसत आहे.

अमेरिकेची धमकी येताच इराणचा सर्वात मोठा हल्ला, थेट दुबाईवर... उडाली मोठी खळबळ!
Dubai attack
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 07, 2026 | 4:03 PM

गेल्या आठ दिवसांपासून मिड इस्टमध्ये खळबळ माजली आहे. इस्त्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणवर हल्ला केला. त्यानंतर इराणने देखील दोन्ही देशांना चोख उत्तर दिले आहे. इराणने आखाती देशांमधील अमेरिकेची लष्करी तळे उद्ध्वस्त केली आहे. त्यानंतर आज अमेरिकेने इराणला मोठ्या हल्ल्याची धमकी दिली होती. त्यानंतर लगेचच इराणने मोठा डाव आखला. इराणने संशयित ड्रोन हल्ला करून दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (DXB) रनवेवर धडक मारली. हा ड्रोन तेहरानमधून डागण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

प्रत्यक्षदर्शी आणि सोशल मीडियावरील व्हिडीओनुसार, विमानतळावर जोरदार स्फोट झाला आणि त्यानंतर हवेत प्रचंड धूर पसरला. गेल्या आठवड्यातही इराणच्या हल्ल्यात दुबई विमानतळाच्या एका टर्मिनलला नुकसान पोहोचले होते आणि चार कर्मचारी जखमी झाले होते. ही घटना इराणच्या आखाती देशांवरील सतत हल्ल्यांच्या मालिकेचा भाग आहे.

विमानतळावरील कामकाज ठप्प, एमिरेट्स उड्डाणे रद्द

या हल्ल्यानंतर दुबई सरकारने विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती थांबवली आहेत. प्रवासी, कर्मचारी आणि क्रू सदस्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. एमिरेट्स एअरलाइन्सने दुबईला येणारी आणि जाणारी सर्व उड्डाणे पुढील सूचनेपर्यंत रद्द केली आहेत. २८ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान बुकिंग असलेल्या प्रवाशांना रिफंड किंवा तारीख बदलण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. फ्लाइट रडारच्या माहितीनुसार, इतर विमानांना ६० ते ९० मिनिटांचा विलंब होत आहे.

नंतर दुबई इंटरनॅशनल (DXB) आणि अल मक्तूम (DWC) विमानतळांवरून काही उड्डाणे अंशतः सुरू करण्यात आली. मात्र, एअरलाइन्सकडून प्रवासाची स्पष्ट पुष्टी मिळेपर्यंत प्रवाशांनी विमानतळावर येऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

जेबेल अली बंदरावर आग

दुबई मीडिया ऑफिसने सुरुवातीला विमानतळावरील घटनेचे वृत्त फेटाळले होते. त्यांनी सांगितले की, आकाशातून काही अवशेष पडल्यामुळे किरकोळ घटना घडली असून, कोणालाही इजा झालेली नाही. मात्र, नंतर माहिती देण्यात आली की, हवाई संरक्षण यंत्रणांनी रोखलेल्या ड्रोन किंवा क्षेपणास्त्राचे अवशेष जेबेल अली बंदरातील एका धक्क्यावर (berth) पडल्याने तेथे आग लागली. ही आग नियंत्रणात आणण्यात आली असून, बंदरातील कामकाज सामान्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ही घटना अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या वाढत्या तीव्रतेमुळे आखाती देशांवर होणाऱ्या परिणामांचे स्पष्ट उदाहरण आहे. परिस्थिती अस्थिर असल्याने प्रवाशांनी विमानतळ आणि हवाई प्रवासाबाबत सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us