अफगाणिस्तानची पॉप स्टार आर्यना सईदने भारताचे मानले आभार, पाकिस्तानवर आगपाखड

अफगाणिस्तानची पॉप स्टार आर्यना सईदने ANI शी केलेल्या संभाषणात सांगितले की, मी माझ्या देशाच्या या अवस्थेसाठी पाकिस्तानला दोष देते. आम्ही अनेक वर्षे असे व्हिडीओ आणि पुरावे पाहिले आहेत, ज्यात असे दिसून आले आहे की तालिबानला बळकटी देण्यामागे पाकिस्तानचा हात आहे.

अफगाणिस्तानची पॉप स्टार आर्यना सईदने भारताचे मानले आभार, पाकिस्तानवर आगपाखड
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 12:27 PM

काबूलः अफगाणिस्तानात तालिबानचा कब्जा झाल्यापासून संपूर्ण देशात हिंसक घटना सुरू झाल्यात. तिथे राहणाऱ्या महिला आणि मुलांमध्ये खूप भीतीचं वातावरण आहे आणि मोठ्या संख्येने लोकांना लवकरात लवकर अफगाणिस्तान सोडायचे आहे.

तालिबानला बळकटी देण्यामागे पाकिस्तानचा हात

दरम्यान, अफगाणिस्तानची पॉप स्टार आर्यना सईदने ANI शी केलेल्या संभाषणात सांगितले की, मी माझ्या देशाच्या या अवस्थेसाठी पाकिस्तानला दोष देते. आम्ही अनेक वर्षे असे व्हिडीओ आणि पुरावे पाहिले आहेत, ज्यात असे दिसून आले आहे की तालिबानला बळकटी देण्यामागे पाकिस्तानचा हात आहे.

अफगाणिस्तानच्या राजकारणात हस्तक्षेप करणार नाही

आर्यना सईद पुढे म्हणतात की, मी अफगाणिस्तानच्या या परिस्थितीसाठी पाकिस्तानला जबाबदार धरते आणि आशा करतो की, ते आता मागे हटतील आणि अफगाणिस्तानच्या राजकारणात हस्तक्षेप करणार नाहीत. खरं तर अफगाणिस्तानची सुप्रसिद्ध पॉप स्टार आर्यना सईद तालिबान्यांनी काबूल शहर ताब्यात घेतल्यानंतर पळून जाण्यात यशस्वी झाली. सोशल मीडियावर त्याची माहिती देताना तिने सांगितले की, ती गुरुवारी काबूलमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाली. तिच्या अनुयायांना सांगताना तिने लिहिले, “मी सुखरूप आणि जिवंत आहे आणि काही अविस्मरणीय रात्रीनंतर मी दोहा, कतारला पोहोचले आणि इस्तंबूलला माझ्या विमानाची वाट पाहत आहे.”

अल कायदा आणि तालिबानपासून मुक्त करणे आवश्यक

एएनआयशी संभाषणादरम्यान, तिने सांगितले की, महाशक्ती देश तेथे गेलेत आणि ते म्हणाले की तेथे जाण्याचे कारण अल कायदा आणि तालिबानपासून मुक्त करणे आहे. तेथे 20 वर्षे राहिल्यानंतर आणि लाखो डॉलर्स खर्च करून सैनिकांचे प्राण गमावल्यानंतर त्यांनी अचानक अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला, हे धक्कादायक आहे. याशिवाय मदतीचा हात पुढे केल्याबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले.

देशात शरिया कायदा लागू करण्याची घोषणा

विशेष म्हणजे काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने देशात शरिया कायदा लागू करण्याची घोषणा केली. त्यानंतर असे मानले गेले की, मनोरंजन उद्योगात काम करणाऱ्यांना सर्वात जास्त धोका असेल. अफगाणिस्तानात तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर उदारमतवादी आणि आधुनिकतावादी विभागात भीतीचे वातावरण वाढले आहे आणि लोकांना देश सोडून इतरत्र स्थायिक व्हायचे आहे.

संबंधित बातम्या

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमध्ये तालिबानच नाही, तर ISIS चाही धोका, जगातील बलाढ्य NATO सैन्यानेही गुडघे टेकले?

तालिबानचा काळ सुरु, अफगाण लोक नेमकी कशाची खरेदी करतायत? दोन वस्तुंसाठी गर्दी