Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमध्ये तालिबानच नाही, तर ISIS चाही धोका, जगातील बलाढ्य NATO सैन्यानेही गुडघे टेकले?

अफगाणिस्तानमध्ये केवळ तालिबानच नाही, तर जगभरात आपल्या हिंस्र कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आयसीसचाही (ISIS) धोका आहे. हा धोका केवळ सर्वसामान्यांसाठी नसून अगदी जगातील बलाढ्य देशांच्या सैन्याला म्हणजेच नाटोच्या (NATO) सैन्यालाही आहे.

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमध्ये तालिबानच नाही, तर ISIS चाही धोका, जगातील बलाढ्य NATO सैन्यानेही गुडघे टेकले?
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 7:30 AM

काबुल : अफगाणिस्तानमध्ये केवळ तालिबानच नाही, तर जगभरात आपल्या हिंस्र कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आयसीसचाही (ISIS) धोका आहे. हा धोका केवळ सर्वसामान्यांसाठी नसून अगदी जगातील बलाढ्य देशांच्या सैन्याला म्हणजेच नाटोच्या (NATO) सैन्यालाही आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या एका वक्तव्यानंतर हे उघड झालंय. विशेष म्हणजे अफगाणिस्तानमध्ये आयसिसचे सुसाईड बॉम्बर्स फिरत असताना अमेरिका ब्रिटनच्या सैन्याला आयसिसच्या भरवशावर सोडून जाऊ शकत नाही, असंही जॉन्सन यांनी बायडन यांना सुनावलंय.

‘काबुलमध्ये ISIS चे सुसाईड बॉम्बर्स’

बोरिस जॉन्सन म्हणाले, “काबुलवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर 8 दिवसानंतर येथे आयएसआयएसचे सुसाईड बॉम्बर्स फिरत आहेत. त्यामुळे अमेरिका ब्रिटिश सैनिकांना आयसिसच्या आत्मघातकी हल्लेखोरांच्या दयेवर सोडून जाऊ शकत नाही.” जगाचं लक्ष अफगाणिस्तानवर आहे. या कठिण काळात नोटोचं सैन्यच अफगाणिस्तानला वाचवू शकतं असं अनेक जण म्हणत आहे. मात्र, आता नाटोचं सैन्यही अडचणीत सापडल्याचं दिसत आहे. मित्र देशांचं सैन्य अफगाण सोडत असताना त्यांच्या शक्तीवरही प्रश्नचिन्हा उपस्थित केले जाऊ लागलेत. नाटो सैन्याच्या प्रतिष्ठेवरही गालबोट लागलंय. तालिबानने नोटो सैन्यालाही गुडघ्यावर आणलंय का असाही प्रश्न उपस्थित होतोय.

अमेरिकेने आपलं सैन्य माघारी घेण्याची घोषणा केल्यानंतर तालिबानला चांगलंच स्फुरण आलेलं दिसतंय. अमेरिकेने आपलं संपूर्ण सैन्य अफगाणिस्तानमधून काढून घेण्याची घोषणा केलीय. यासाठी त्यांनी डेडलाईनही तयार केलीय. यामुळे अफगाणमध्ये लढणाऱ्या नाटो सैन्यावर विपरित परिणाम झालाय. त्यामुळेच नाटोतील देशांमध्येही अमेरिकेच्या या निर्णयावरुन मतभेद असल्याचं समोर आलंय.

कंधारमध्ये ब्रिटनच्या सैन्याचं सिक्रेट ऑपरेशन

ब्रिटनने आतापर्यंत 6000 सैनिक आणि सामान्य लोकांना सुरक्षित बाहेर काढलंय. या आठवड्यात आणखी 6000 लोकांना वाचवण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी ब्रिटनला कंधारमध्ये एक सिक्रेट ऑपरेशन करावं लागलं आणि येथेच अफगाणिस्तानमधील स्फोटक स्थिती समोर आली. कंधार विमानतळावर तालिबानने कब्जा केलाय. त्यामुळे तेथे अडकलेल्या नाटो सैन्याला वाचवणंही अवघड झालंय. त्यात अमेरिकेने सैन्या माघारी घेण्याचा निर्णय घेतल्यानं नाटो सैन्याचा जीव धोक्यात आलाय.

हेही वाचा :

काबूल विमानतळावर हल्लेखोर आणि अफगाण सुरक्षा दलांमध्ये चकमक, एक सैनिक ठार, तीन जखमी

Films Based on Afghanistan: सिनेमात चित्तारलेलं अफगाणिस्तान कसं आहे?; पाहा फोटो

VIDEO : जगण्याचा आशावाद, आजूबाजूला मृत्यूचं तांडव, पण त्यातही या चिमुरड्यांचं प्रेम प्रत्येकाचं मन जिंकतंय

व्हिडीओ पाहा :

Afghanistan and NATO England facing both Taliban and ISIS terrorist challenge

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.