मोठी बातमी! अफगाणिस्तानचं सैन्य पाकिस्तानमध्ये घुसलं, क्वेटा- पेशावरवर दावा, सीमेवर तुफान गोळीबार

मोठी बातमी समोर येत आहे, अफगाणिस्तानचं सैन्य पाकिस्तानमध्ये घुसलं असून, सीमावर्ती भागात जोरदार गोळीबार सुरू आहे.

मोठी बातमी! अफगाणिस्तानचं सैन्य पाकिस्तानमध्ये घुसलं, क्वेटा- पेशावरवर दावा, सीमेवर तुफान गोळीबार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 29, 2025 | 8:21 PM

पाकिस्तानातून मोठी बातमी समोर येत आहे, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला तणाव आता उघड संघर्षात बदलला आहे. अफगाण सैन्यानं पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश केल्याचं वृत्त आहे, समोर आलेल्या माहितीनुसार दोन्ही बाजुंनी जोरदार गोळीबार सुरू आहे, सीमेवर युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अफगाण सैन्यानं चाघी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून पाकिस्तानमध्ये प्रवेश केला आहे. चांघी हा भाग बलुचिस्तानमध्ये असलेल्या डुरंड रेषेजवळ आहे. डुरंड रेषा अफगाणमधील तालिबानने बेकायदेशीर घोषित केलेली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार याच भागातून अफगाण सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसखोरी केली आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीमेवर जोरदार गोळीबार सुरू असून, या घटनेत अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत, मात्र या घटनेला अद्याप पाकिस्तानकडून कुठलाही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाहीये.

क्वेटा- पेशावरवर दावा

अफगाणिस्तानने डुरंड रेषा बेकायदेशीर ठरवली आहे. त्यांनी केवळ सीमाच बेकायदेशीर घोषित केली नाही तर पाकिस्तानच्या क्वेटा आणि पेशावरसारख्या दोन महत्त्वाच्या शहरांवरही दावा केला आहे. पाकिस्तानी सैन्य आमच्या हद्दीत वारंवार घुसखोरी करत असल्याचा आरोपही अफगाणिस्तानकडून करण्यात आला आहे. या आरोपांना उत्तर देताना पाकिस्तानने म्हटलं आहे की, तालिबान आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दोन संघटना मिळून सातत्यानं आमच्या सैन्यांच्या चौक्यांवर हल्ला करत आहेत. यामुळे दोन्ही देशांमध्ये फार मोठी दरी निर्माण होत आहे.

एकीकडे स्वतंत्र्य बलुचिस्तानसाठी बलुच आर्मीचं आंदोलन सुरू आहे, त्यांनी पाकिस्तान सरकारविरोधात बंड केलं आहे, तर दुसरीकडे आता अफगाणी सैन्यानं देखील पाकिस्तानमध्ये घुसखोरी केली आहे. अफगानिस्तानकडून पाकिस्तानच्या क्वेटा आणि पेशावर सारख्या शहरांवर दावा करण्यात आला आहे. एकीकडे बलुचिस्तानमध्ये निर्माण झालेल्या बंडामुळे पाकिस्तान संकटात सापडला आहे, हे बंड पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरलं आहे, तर दुसरीकडे आता अफगाणिस्तानने पाकिस्तानची डोकेदुखी आणखी वाढवली आहे. अफगाणिस्तानचं सैन्य पाकिस्तानमध्ये घुसलं आहे. त्यामुळे पाकिस्तान दुहेरी संकटात सापडलं आहे.