US Midterm Election : निवडणूक हरताच ट्रम्प सरकार भारतावर तुटून पडलं, 9 कंपन्यांवर लादले निर्बंध, हे जोडपं अमेरिकेच्या रडावर
US Midterm Election : काल अमेरिकेत मध्यावधी निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीला मोठा झटका बसला आहे. हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिव आणि सीनेटवर डेमोक्रॅट्सनी ताबा मिळवला आहे.

मिडटर्म निवडणुकीत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव झाला आहे. मात्र, त्यानंतरही ट्रम्प यांच्या भारताबद्दलच्या धोरणात बदल होताना दिसत नाहीय. ट्रम्प यांची भारताची कोंडी करण्याची भूमिका कायम आहे. अमेरिकेने एक भारतीय उद्योजक, त्याची पत्नी आणि भारताच्या नऊ कंपन्यांवर प्रतिबंध घातले आहेत. इराणसोबत तेल व्यापार करण्यावर आंतरराष्ट्रीय निर्बंध आहेत. ते निर्बंध डावलून व्यवसाय करण्याचा आरोप आहे. अमेरिकी अर्थ मंत्रालयानुसार, हे संपूर्ण नेटवर्क समुद्री फसवणुकीशी संबंधित आहे. ते इराणला तेल व्यापार सुरु ठेवण्यासाठी मदत करत होते, असा अमेरिकेचा आरोप आहे. अमेरिकी मंत्रालयाने हे एक मोठं गुन्हेगारी नेटवर्क असल्याचं सांगितलं. अमेरिकी अर्थ मंत्रालयाने भारतीय व्यावसायिक सुनील कुमार शर्मा आणि त्यांची पत्नी जसप्रीत प्रीती शाहिदीला या नेटवर्कच कथित संचालक ठरवलं आहे. दोघांनी जहाजांसाठी बनावट समुद्री रजिस्ट्रेशन केलं आणि झेंड्याशी संबंधित प्रमाणपत्र बनवली. जेणेकरुन इराणी तेल घेऊन जाणाऱ्या जहाजांना आंतरराष्ट्रीय प्रतिबंध असतानाही आपलं काम सुरु ठेवता येईल.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकी प्रशासनाने ‘ऑपरेशन इकोनॉमिक आउटकास्ट’ अंतर्गत ही कारवाई केली आहे. इराणची तेल विक्री आणि अन्य आर्थिक माध्यमातून होणारी कमाई रोखणं हा यामागे उद्देश आहे. अमेरिकी अर्थ मंत्रालयानुसार सुनील कुमार शर्मा आणि त्यांची पत्नी चंदीगडमधून हे नेटवर्क ऑपरेट करत होते. दोघांनी अनेक देशांमधील समुद्री प्रशासनिक अधिकाऱ्यांशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेतला व बनावट समुद्री रजिस्ट्री तयार केली.
ही कंपनी काय काम करायची?
AFP च्या रिपोर्टनुसार या नेटवर्क अंतर्गत एक वेबसाइट बनवण्यात आलेली. वेगवेगळ्या देशांच्या जहाजांचं रजिस्ट्रेशन, त्यांना समुद्री झेंडा उपलब्ध करुन देणं, खलाशांना प्रशिक्षण देणं आणि जहाजांचं वर्गीकरण अशा सेवा देण्याचं काम ही कंपनी करत होती. या कथित फसवणुकीची सुरुवात वर्ष 2014 मध्ये झाली. वर्ष 2023 मध्ये शर्मा यांनी सिंगापूरमध्ये ‘एस्वातिनी मॅरीटाइम अफेयर्स एंड इंटरनेशनल शिप रजिस्ट्री पीटीई लिमिटेड’नावाची कंपनी स्थापन केली. अमेरिकी अर्थ मंत्रालयानुसार, एस्वातिनीच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिकरित्या या संघटनेशी आपला संबंध फेटाळून लावला. इराणी तेल वाहू जहाजांना ही कंपनी रजिस्ट्रेशनची सेवा देत होती.