मोठी बातमी…पाकिस्तानला मोठा दणका, फ्लायदुबईच्या घटनेशी संबंध नसतानाही थेट अपमान…

फ्लायदुबईच्या घटनेने मोठी खळबळ उडाली. यात काही देणे घेणे नसताना पाकिस्तानला मोठा दणका बसला. थेट मोठा निर्णय घेण्यात आला. इराण आणि इस्त्रायल यांच्या तणावादरम्यानच हा निर्णय घेण्यात आला.

मोठी बातमी…पाकिस्तानला मोठा दणका, फ्लायदुबईच्या घटनेशी संबंध नसतानाही थेट अपमान…
Air France Pakistani
| Updated on: Oct 14, 2026 | 7:12 PM

दुबईहून इस्त्रायलच्या तेल अवीवकडे निघालेल्या फ्लायदुबईच्या विमानात जी घटना घडली, ज्याचा विचारही कोणी केला नाही. मोठी खळबळ जगात उडाली. त्यातच आता इस्रायलने लागू केलेल्या नवीन निर्बंधांचे पालन करत असल्याचे एअर फ्रान्सने स्पष्ट केले. त्यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने अनेक देशांची झोप उडाली. या निर्बंधांनुसार, विशिष्ट राष्ट्रीयत्वाच्या विमान कर्मचाऱ्यांना इस्रायलसाठीची विमानसेवा चालवण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांनी तशी परवानगीच दिली जाणार नाही. या धोरणाचा फटका थेट 31 देशांच्या नागरिकांना बसत असल्याचे रिपोर्टमध्ये दिसतंय. पाकिस्तान, इराण, साैदी अरेबिया, अल्जेरिया यासारख्या बहुल मुस्लीम देशांना या निर्णयाचा फटका बसला आहे. फ्लायदुबईच्या घटनेसोबत कोणताही संबंध नसताना पाकिस्तानचा मोठा अपमान झाल्याचे बघायला मिळतंय.

इतर सर्व विमान कंपन्यांप्रमाणेच एअर फ्रान्सलाही आपल्या प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आपण सेवा देत असलेल्या देशांच्या प्राधिकरणांनी निश्चित केलेल्या प्रवेशविषयक नियमांचे पालक करावे लागणार आहे, हे त्यांच्याकरिता बंधनकारक आहे. एअर फ्रान्सने अल जझीराला दिलेल्या निवेदनात याबाबत भाष्य केले.

Loading...

तेल अवीवच्या विमानसेवेसाठी इस्रायली अधिकाऱ्यांनी हे नवीन नियम लागू केले आहेत. त्याबाबतच्या सूचनाही त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. इस्रायलच्या परिवहन आणि रस्ते सुरक्षा मंत्रालयाने 1 ऑक्टोबर रोजी परदेशी विमान कंपन्यांना त्यांनी स्पष्ट सांगितले की, इस्त्रायलच्या हवाई हद्दीत उड्डाण करणाऱ्या विमानांमधील वैमानिक आणि केबिन क्रू सदस्याचे नागरिकत्व हे ज्या देशांचे इस्त्रायलशी राजनैतिक संबंध नाहीत, त्याचे नागरिक नसावे.

या निर्णयाचा थेट फटका अनेक देशांना बसला आहे. पाकिस्तानचेही वैमानिक आता थेट इस्त्रायलमध्ये जाऊ शकणार नाहीत, तशी परवानगी त्यांना देण्यात आली नाही. फ्लायदुबईच्या विमानात घडलेल्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला. मिळालेली अधिकची माहिती अशी की, या आदेशात 31 देशांचा समावेश आहे. अनेक देश मुस्लिम बहुल आहेत. ओमान आणि इराणचाही यात समावेश आहे. भारतीय पायलटमुळे एक मोठी दुर्घटना होण्यापासून रोखली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us