AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FlyDubai Plane : इस्रायल खूप पुढचा विचार करतो, हायजॅकचा मेसेज येताच ते गप्प बसले नाहीत त्यांनी लगेच..

FlyDubai Plane : हायजॅक किंवा इस्रायली नागरिकांचा जीव धोक्यात असेल तर इस्रायल हा शांत बसणारा देश नाही. काल सुद्धा दुबईच्या आकाशात थरार सुरु असताना इस्रायल गप्प बसला नाही. त्यांनी झटपट कृती सुरु केली. इस्रायलची या परिस्थितीचा सामना करण्यासाठी काय तयारी होती, समजून घ्या.

FlyDubai Plane : इस्रायल खूप पुढचा विचार करतो, हायजॅकचा मेसेज येताच ते गप्प बसले नाहीत त्यांनी लगेच..
FlyDubai
| Updated on: Oct 01, 2026 | 3:46 PM
Share

दुबईहून इस्रायलकडे निघालेल्या फ्लाय दुबईच्या प्रवासी विमानात काल आपातकालीन स्थिती निर्माण झालेली. दोघांपैकी एका वैमानिकाकडून विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न झाला. विमान कित्येक हजार फूट उंचीवर असताना हे सर्व घडत होतं. त्यामुळे इस्रायली यंत्रणेला विमान हायजॅकचा मेसेज गेला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता इस्रायली फायटर जेट्स लगेच आकाशात झेपावली.संभाव्य हायजॅकच्या परिस्थितीचा सामना करण्याची तयारी सुरु झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इस्रायलने लगेच दोन फायटर जेट्स पाठवले. प्लेन हाईजॅकच्या स्थितीचा सामना करण्यासाठी अनेक पर्याय असतात. सर्वप्रथम विमानात काय चाललय हे कळणं गरजेच असतं. म्हणून इस्रायली एअर फोर्सच्या दोन फायटर जेट्सनी लगेच उड्डाण केलं. विमान हायजॅकेच्या स्थितीत फायटर जेट्सचा रोल काय असतो? ते समजून घेऊया.

YTnews च्या रिपोर्ट्नुसार बुधवारी सकाळी 8.31 वाजता विमानातून स्क्वॉक कोड 7700 पाठवण्यात आला. यामुळे संकटाची स्थिती असल्याचा संदेश जातो. त्यानंतर बरोबर सात मिनिटांनी 8.38 वाजता कोड 7500 एक्टिव झाला. हा विमान हायजॅकशी संबंधित कोड आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली एअरफोर्सने लगेच एस्कॉर्ट करण्यासाठी म्हणून दोन फायटर विमानं पाठवली. इस्रायलने अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आधीच तयारी करुन ठेवली आहे. त्याचा नियमितपणे अभ्यासही सुरु असतो. फ्लाय दुबईच्या प्लेनला इस्रायली फायटर जेट्स एस्कॉर्ट करत होते. सकाळी 9:35 वाजता इस्रायली अधिकाऱ्यांना समजलं की, फ्लाइ दुबईचं प्लेन सौदी अरेबियाच इमर्जन्सी लँडिंग करणार आहे. दहामिनिटांनी 9:45 वाजता विमान तबुक विमानतळावर उतरलं.

अशावेळी फायटर जेटचा रोल काय असतो?

अशा स्थितीत फायटर जेटचं पहिलं काम हायजॅक झालेल्या प्लेनवर लक्ष ठेवण्याची आणि एस्कॉर्ट करण्याची जबाबदारी असते. त्याशिवाय हायजॅकर आणि दहशतवाद्यांविरुद्ध प्रत्युत्तराची कारवाई करणं हा सुद्धा उद्देश असतो. जेणेकरुन काही अनुचित घडू नये. रणनितीक ठिकाणांचं नुकसान होऊ नये तसच विमानातील प्रवाशांनचे प्राण कसे वाचवता येतील ही सुद्धा फायटर जेटची जबाबदारी असते.

हायजॅक झालेल्या विमानाला मोठ्या लोकवस्तीच्या भागापासून लांब ठेवणं, महत्वपूर्ण इमारतींवर क्रॅश करण्यापासून रोखणं ही फायटर जेटची जबाबदारी असते. अमेरिकेतील 9/11 सारखी घटना रोखणं हा सुद्धा उद्देश असतो. दहशतवादी ते विमान एखाद्या महत्वाच्या ठिकाणी धडकवणार असतील, तर ते पाडण्याचा सुद्धा ऑप्शन असतो. प्रवासी विमान पाडणं हा शेवटचा पर्याय असतो. पण हा निर्णय वरिष्ठ राजकीय नेतृत्वालाच घ्यावा लागतो.

Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...