AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर होस्टेसला अंतर्वस्त्र घालणे अनिवार्य, पाकिस्तान एअर लाईनचा तुगलकी फर्मान

जगाच्या पाठीवर पाकिस्तान असा देश आहे जो कायमच त्याच्या निर्णयांमुळे स्वतःचा बावळटपणा सिद्ध करत असतो.

एअर होस्टेसला अंतर्वस्त्र घालणे अनिवार्य, पाकिस्तान एअर लाईनचा तुगलकी फर्मान
पाकिस्तान हवाई सुंदरी Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 30, 2022 | 4:53 PM
Share

मुंबई,  पाकिस्तानचा बावळटपणा कायमच जगात चर्चेचा विषय असतो. यावेळी पाकिस्तानी एअरलाइन्सने (Pakistan Airline) असा तुघलकी फर्मान जारी केला आहे, ज्यामुळे जगभरात त्याची खिल्ली उडविली जात आहे. पाकिस्तानची राष्ट्रीय एअरलाइन, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) ने एअर होस्टेससह सर्व क्रू मेंबर्सना अनिवार्यपणे अंतर्वस्त्र (Undergarment Rule) घालण्यास सांगितले आहे.

पाकिस्तानी चॅनल जिओ टीव्हीनुसार, राष्ट्रीय विमान कंपनी PIA ने आपल्या क्रू मेंबर्सना अंडरगारमेंट परिधान करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. एअर होस्टेस आणि क्रू मेंबर्सच्या ड्रेसिंग न केल्यामुळे पीआयएची प्रतिमा मलीन होत असल्याचा दावा पीआयएने केला आहे. एअरलाइन्सच्या आदेशात असे म्हटले आहे की, जर साधे कपडे असतील तर एअर होस्टेसने अंतर्वस्त्र परिधान करणे अनिवार्य आहे.

का काढला असा नियम?

पीआयए एअरलाइन्सचे महाव्यवस्थापक अमीर बशीर यांनी जारी केलेल्या आदेशात असे निदर्शनास आले आहे की, पीआयएच्या एअर होस्टेस इतर शहरांमध्ये प्रवास करतात किंवा हॉटेलमध्ये राहतात तसेच  वेगवेगळ्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांनी योग्य कपडे घालत नसल्याचे समोर आले आहे. अंतर्वस्त्र परिधान न केल्यामुळे केवळ वैयक्तिक प्रतिमाच नाही तर विमान कंपन्यांची प्रतिमाही डागाळत असल्याने ते म्हणाले.

अंतर्वस्त्र न घातल्यास होणार कारवाई

अमीर बशीरने केबिन क्रूला स्पष्टपणे सांगितले की, जर साधे कपडे असतील तर एअर होस्टेसने अंतर्वस्त्र घालणे आवश्यक आहे. विमान कंपनीने जारी केलेल्या तुघलकी फर्मानामध्ये असे म्हटले आहे की, पुरुष आणि स्त्रियांनी परिधान केलेले कपडे आपल्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय नीतिनियमांनुसार असले पाहिजेत.  या संदर्भात अधिकाऱ्यांना केबिन क्रूवर सदैव नजर ठेवण्याचे आणि नियमांचे पालन होत नसल्यास अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमाचे उल्लंघन झाल्यास कारवाई देखील होणार आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा