अमेरिकेत कोरोनाचा स्फोट, एकाच दिवसात 1 लाखापेक्षा जास्त रुग्ण, जगाचं टेन्शन वाढलं

| Updated on: Jul 28, 2021 | 11:34 AM

अमेरिकेत (America) पुन्हा एकदा कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. काल मंगळवारी एकाच दिवसात अमेरिकेत कोरोनाचे 1 लाखापेक्षा जास्त रुग्ण सापडले.

अमेरिकेत कोरोनाचा स्फोट, एकाच दिवसात 1 लाखापेक्षा जास्त रुग्ण, जगाचं टेन्शन वाढलं
CORONA
Follow us on

वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) पुन्हा एकदा कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. काल मंगळवारी एकाच दिवसात अमेरिकेत कोरोनाचे 1 लाखापेक्षा जास्त रुग्ण सापडले. त्यातच डिस्चार्जपेक्षा रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे अमेरिकेसह जगासाठी पुन्हा हा धोका आहे. अमेरिकेत 1,06,084 नवे कोरोना रुग्ण आढळले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात नव्या रुग्णांची संख्या 73 टक्क्यांनी वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत दोन डोस घेतलेल्यांनी मास्क लावण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आता पुन्हा नियमांमध्ये बदल केले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आला आहे.

दरम्यान, अमेरिकेतील फ्लोरिडा 38,321, टेक्सास (8,642), कॅलिफोर्निया (7,731), लुईसियाना (6,818), जॉर्जिया (3,587), यूटाह (2,882), अलबामा (2,667), आणि मिसौरी (2,414) या भागात सर्वाधिक रुग्ण आहेत.

गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णवाढीची सरासरी 62,411 इतकी होती. तर मागील महिन्यातील ही आकडेवारी केवळ 12,648 इतकी होती. मात्र या आठवड्यात एकाच दिवसात 1 लाखापेक्षा जास्त रुग्ण सापडल्याने अमेरिकेचे टेन्शन वाढले आहे.

मास्क वापरण्याचं आवाहन

दरम्यान, अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. कोरोनाचा नवा डेल्टा व्हेरिएंट हा लस घेतलेल्यांमध्येही आढळत आहे. हा नवा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. त्यामुळे मास्क बंधनकारक करण्यात येत आहे. हा व्हायरस अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे.

जो बायडन यांचं आवाहन

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनीही नव्या डेल्टा व्हेरिएंटपासून सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. भलेही लसीकरणामुळे मृतांची संख्या कमी असली, तरी लस घेतलेल्यांनाही लागण होत असल्याने चिंता वाढली आहे. दुसरीकडे लस न घेणाऱ्यांना वेगाने संसर्ग होत आहे. त्यामुळे असे रुग्ण तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागत आहेत. अमेरिकेतील नव्या 80 टक्के रुग्णांमधील संसर्गाचं कारण डेल्टा व्हेरिएंट असल्याचं सांगण्यात येत आहे.

भारतातील रुग्णसंख्या 

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 14 हजारांनी वाढ झाली. सोमवारी नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये दहा हजारांची घट झाल्याने कोरोना ओसरत असल्याचं आशादायक चित्र निर्माण झालं होतं. कालच्या दिवसात (मंगळवारी) 43 हजार 654 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मात्र अॅक्टिव्ह केसेस चार लाखांच्या खालीच आहेत. कालच्या दिवसात 640 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

संबंधित बातम्या  

Corona Cases In India | कोरोना ओसरल्याचं चित्र एका दिवसात विरलं, नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 14 हजारांनी वाढ