AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धात अमेरिकेचा सर्वात मोठा आदेश! सगळ्या अधिकाऱ्यांना तातडीचा संदेश; पाकिस्तानातून थेट….

अमेरिका-इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जगात खळबळ उडालेली आहे. पाकिस्तानात तर मोठा हिंसाचार सुरू झाला आहे. असे असतानाच आता अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे.

युद्धात अमेरिकेचा सर्वात मोठा आदेश! सगळ्या अधिकाऱ्यांना तातडीचा संदेश; पाकिस्तानातून थेट....
donald trump and shehbaz sharifImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 04, 2026 | 4:58 PM
Share

Iran Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे पश्चिम आशियात तणावाची स्थिती आहे. अमेरिकेची मित्र राष्ट्रं असलेल्या काही देशांवर इराणने हल्ले केल्यामुळे ही परिस्थिती जास्तच गंभीर झाली आहे. हे युद्ध लवकर संपण्याची आशा नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर तर या युद्धाचा भडका उडाला आहे. इराणने आता आक्रमक पवित्रा धारण केला आहे. खामेनेई यांच्या मृत्यूचे पडसाद जगभरात उमटत आहेत. पाकिस्तानही पेटला आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच अमेरिकेने पाकिस्तानसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय निर्णय घेतला?

खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात सध्यात तणावाची स्थिती आहे. पाकिस्तानात अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे. काही ठिकाणी तर जाळपोळही करण्यात आली. आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यामुळे अनेकांचा मृत्यूही झाला आहे. आंदोलक थेट अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासावर चालून गेल्याने तेथील परिस्थिती जास्तच नाजूक झाली आहे. या सर्व स्थितीचा अंदाज घेऊन अमेरिकन सरकारने पाकिस्तानातील कराची आणि लाहोर येथील अमेरिकन दूतावासात अतिरिक्त कर्मचाऱ्यांनी पाकिस्तान देश सोडण्याचा आदेश दिला आहे.

नेमका आदेश काय आहे?

अमेरिकेने कराची आणि लाहोर येथील वाणिज्य दूतावासात काम करणाऱ्या आपल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांना पाकिस्तान सोडण्याचा आदेश दिला आहे. कर्मचाऱ्यांनी कुटुंबासह पाकिस्तान सोडावा, असे अमेरिकेने म्हटले आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानी नागरिक अमेरिकन वाणिज्य दूतावासापुढे जमा झाले होते. नंतर हा जमाव अनियंत्रित झाला होता. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी गोळ्या झाडल्या हो्त्या. यात 10 जणांचा मृत्यू झाला होता तर 60 जण जखमी झाले होते. काही आंदोलकांनी अमेरिकन वाणिज्य दूतावासात घुसण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान युद्धाआधी अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या संबंधांमध्ये सुधारणा झाली होती. दोन्ही देश व्यापार सहकार्य करण्यासाठी सकारात्मत होते. परंतु आता सध्याची युधजन्य स्थिती लक्षात घेऊन अमेरिकेने आपल्या वाणिज्य दूतावासातील अधिकाऱ्यांना परत बोलावले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...