AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण कोणते? टॉप 10 शहरांची यादी आली समोर

Worlds Safest Places : इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगात अशांतता निर्माण झाली आहे. आज आपण जगातील सर्वात सुरक्षित शहरे आणि सुरक्षित देशांची जाणून घेऊयात.

जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण कोणते? टॉप 10 शहरांची यादी आली समोर
Safe CountriesImage Credit source: Google
| Updated on: Mar 04, 2026 | 4:29 PM
Share

इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. अमेरिका आणि इस्रायस इराणवर भीषण हल्ले करत आहे. इराणकडूनही या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. इराणने अनेक आखाती देशांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे अनेक विमानतळेही बंद करण्यात आली आहेत. या युद्धाचा फटका कोट्यवधी लोकांना बसला आहे. त्यामुळे आता इंटरनेटवर जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणे कोणती याबाबत माहिती शोधली जात आहे. आज आपण जगातील सर्वात सुरक्षित शहरे आणि सुरक्षित देशांची माहिती जाणून घेणार आहोत.

अमेरिकन हल्ल्यांना उत्तर देताना इराणने युएईतील अनेक शहरांवर हल्ले केले आहेत. यामुळे जगातील सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत समावेश असलेल्या दुबई आणि अबुधाबी या शहरांची सुरक्षाही धोक्यात आली आहे. या शहरांमध्ये भारतासह जगभरातील अनेक लोक अडकून पडले आहेत. जगातील सर्वात उंच इमारत असणाऱ्या बुर्ज खलिफावरही ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे नागरिकांची धाकधूक वाढली आहे. आज आपण सुरक्षा निर्देशांक 2026 नुसार जगातील सर्वात सुरक्षित शहरांची माहिती जाणून घेऊयात.

जगातील 10 सर्वात सुरक्षित शहरे

  • क्विंगदाओ (क्विंगदाओ), शेडोंग, चीन
  • अबु धाबी, संयुक्त अरब अमिराती
  • दोहा, कतार
  • शारजाह, संयुक्त अरब अमिराती
  • दुबई, संयुक्त अरब अमिराती
  • तैपेई, तैवान
  • मनामा, बहरीन
  • मस्कत, ओमान
  • द हेग (डेन हाग), नेदरलँड्स
  • आइंडहोव्हन, नेदरलँड्स

जगातील 10 सर्वात सुरक्षित देश

  • आइसलँड
  • आयर्लंड
  • न्यूझीलंड
  • ऑस्ट्रिया
  • स्वित्झर्लंड
  • सिंगापूर
  • पोर्तुगाल
  • डेन्मार्क
  • स्लोव्हेनिया
  • फिनलंड

हल्ले अजूनही सुरूच

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इस्रायल संयुक्तपणे इराणवर हल्ले करत आहे. या हल्लांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. खामेनी यांच्यासह त्यांच्या कुंटुंबातील अनेक सदस्यही मारले गेले आहेत. त्याबरोबर सैन्याचे बडे अधिकारी आणि अनेक महत्त्वाच्या नेत्यांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे इराणचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर इराणमधील अनेक इमारतींचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे आता जगभरातील अनेक देशांनी हे युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...