AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: मी लेचापेचा नाही… मनोज जरांगे यांनी रामदासभाईंचं चँलेज स्वीकारलं, थेट लायकीच…

Manoj Jarange on Ramdas Kadam: बीड जिल्ह्यातील नगद नारायणगडावरील दसरा भाषणानंतर शिंदे सेना विरुद्ध मनोज जरांगे पाटील असं खळं तयार झालंय. आता या खळ्यात कोणं तुडवल्या जातंय आणि कोण धान्याच्या दाण्यासारखं चमकून बाहेर पडणारा हे समोर येईलच.

Manoj Jarange: मी लेचापेचा नाही... मनोज जरांगे यांनी रामदासभाईंचं चँलेज स्वीकारलं, थेट लायकीच...
मनोज जरांगे यांनी रामदासभाईंचं चँलेज स्वीकारलं
| Updated on: Oct 21, 2026 | 12:40 PM
Share

अशोक काळकुटे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : बीड जिल्ह्यातील नगद नारायणगडावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अखेर डिवचलंच. या नाराजीचं कारणंही त्यांनी भरसभेत सांगितलं. आपल्या नावावर 500 कोटी रुपये कोणी घेतले असा सवाल त्यांनी विचारला. त्यानंतर शिंदे सेनेचे शिलेदार जरांगे पाटील यांच्यावर तुटून पडले. रामदास कदम यांनी तर त्यांच्यावर ना ना आरोप केले. रामदासभाईंचे हे आवाहन जरांगे पाटलांनी स्वीकारले आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यानंतर राज्यात राजकीय शिमगा सुरू झाल्याचे चित्र आहे.

मी लेचापेचा नाही

शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांना मनोज जरांगे पाटील यांनी थेट इशारा दिला. माझं काही वाकडं करू शकत नाहीत, मला उद्ध्वस्त करणं सोपं नाही. एवढे आम्ही लेचेपेचे नाहीत, असा खणखणीत इशारा जरांगे यांनी दिला. औकात काय आहे काय नाही हे उद्या सांगतो. आम्ही औकात कोणाची वाढवली सांगतो. मी एवढंच विचारतोय पाचशे करोड रूपये मला दिले की नाही ते सांगा. हो म्हणा किंवा नाही म्हणा. औकात काय असते ते दिसणार आहे, असे जरांगे म्हणाले.

कदम एवढं बेचैन झाल्यासारखं बोलतील असं वाटलं नव्हतं. मला काही वाटत नाही, माझ्यावर काही परिणाम होत नाही. त्यांचा आरडण्या ओरडण्याचा. एकनाथ शिंदे म्हणाले तेव्हाच रामदास कदम बोलले. बाप दाखवा नाहीतर श्राध्द घाला म्हणतायत म्हणजे मला दिले नाहीत. उद्या मराठे विचारतील कोण लाचार, मग लाव चौकशी. तुम्ही नरडे दाबायला लागलात का ? प्रमाणपत्र रद्द करून. मी भीत नाही चौकशीला आणि यापूर्वीच चौकश्या लावल्यात, खोट्या केसेस आणि आमच्यावर बोलायला लावणं, असा हाबाडाच जरांगे पाटील यांनी दिला.

दोन उपमुख्यमंत्र्यांचं नाव

इतके उतावळे, बेचैन होऊ नका, उद्या आलात आणि मोडलात. आम्ही एवढे कच्चे चेले नाहीत. शिंदे साहेबांनी सांगितल्याशिवाय ते कुजबुज करतायत का ? उद्या अकराच्या नंतर तुम्ही शोधा आणि उत्तरं द्या. त्यात दोन उपमुख्यमंत्र्यांचे पण नाव आहेत. त्यामध्ये खूप भयानक आहे, हिंदी बोलत आहेत मराठी बोलत आहेत. उद्या कळेल. इतक्या लांब हात कसा घातला असं वाटेल. प्रमाणपत्र रद्द केल्याचे पाप झाकण्यासाठी नवीन टोळ्या तयार केल्या.. या सगळ्यांच्या मागे तेच आहेत. उद्या आणखी एक सांगतो. त्याच्यात तर ते पायच धरणार नाहीत. माझा बोलवता धनी बिनी काही नाही बाबा. मी कोणाच्या मनावर बोलत नाही, असे सांगायला जरांगे पाटील विसरले नाहीत.

पंकजाताईंचे स्वागत, धनंजय मुंडेंवर नो कमेंट्स

अंतरवालीत रस्ते, पाणी आणि सर्व विकास होणार असेल तर पंकजा मुंडे यांचं स्वागत आहे. पण सर्वांना सोबत घेऊन केले पाहिजे नाहीतर कोणालातरी त्रास होऊ नये. धनंजय मुंडे यांच्यावर मी काही बोलत नाही, ते मला काहीही बोलले नाहीत, असे जरांगे म्हणाले.

Follow Us
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा