AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-Israel US War : हिरोशिमावर टाकलेल्या अणूबॉम्ब पेक्षा पण 20 पट जास्त..युद्ध सुरु असताना अमेरिकेची जगाला हडबडवणारी खळबळजनक कृती

Iran-Israel US War : हिरोशिमा आणि नागासकी या दोन शहरांची नाव कधीच कोणी विसरु शकत नाही. कारण दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेने या दोन्ही शहरांवर विनाशकारी अणूबॉम्ब टाकला होता. अणूबॉम्ब मानव जातीसाठी किती भयानक आहे, हे त्यातून समोर आलेलं. आता मध्य पूर्वेत युद्ध सुरु असताना अमेरिकेच्या एका कृतीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

Iran-Israel US War : हिरोशिमावर टाकलेल्या अणूबॉम्ब पेक्षा पण 20 पट जास्त..युद्ध सुरु असताना अमेरिकेची जगाला हडबडवणारी खळबळजनक कृती
Missile Test Image Credit source: AFP
| Updated on: Mar 05, 2026 | 11:34 AM
Share

मध्यू पूर्वेत युद्ध सुरु असताना मंगळवारी रात्री अमेरिकेने कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर डूम्सडे बॅलेस्टिक मिसाइलची चाचणी केली. न्यूयॉर्क पोस्टनुसार, सांता बारबरा जवळ वडेनबर्ग स्पेस फोर्स बेस वरुन रात्री 11 वाजता ‘मिनटमॅन III बॅलेस्टिक मिसाइल’ लॉन्च करण्यात आलं. हिरोशिमावर टाकलेल्या अणूबॉम्बपेक्षा पण 20 पट जास्त ताकदवान अणवस्त्र घेऊन जाण्यास डूम्सडे सक्षम आहे. यूएस स्पेस फोर्सनुसार जीटी 254 म्हणून ओळखलं जाणारं हे रॉकेट पश्चिम-मध्य प्रशांत महासागरात मार्शल बेटाजवळ आपल्या टार्गेटवर जाऊन कोसळलं. फोर्स ग्लोबल स्ट्राइक कमांडनुसार, मिसाइलची प्रभावशीलता, तत्परता आणि अचूकता जाणून घेण्यासाठी ते डागण्यात आलं होतं. 576 व्या फ्लाइट टेस्ट स्क्वाड्रनचे कमांडर लेफ्टिनेंट कर्नल कॅरी व्रे यांनी एका प्रेस रिलीजमध्ये म्हटलय की,’या टेस्टमुळे मिसाइल सिस्टिमच्या वेगवेगळे घटकांच्या क्षमतेचा आढावा घेता आला’

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिकेने पुकारलेल्या युद्धाचा आजचा सहावा दिवस आहे. इस्रायल-अमेरिकेने हवाई हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांचा खात्मा केला. इराणने मध्य पूर्वेतील देशांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे सध्या मिडिल ईस्टमध्ये भिती, गोंधळाचं वातावरण आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणकडून इस्रायल आणि मिडिल ईस्टमधील अमेरिकन तळांवर हल्ले सुरु आहेत. हिज्बुल्लाह एक्टिव झाल्यानंतर इस्रायलने लेबनानची राजधानी बेरुतवर हवाई हल्ल्याचा सपाटा लावला आहे. इराणवरील हल्ल्याची धार अजून वाढवण्याची शपथ ट्रम्प यांनी घेतली आहे.

अमेरिकेकडे अशी किती मिसाईल्स?

मंगळवारची चाचणी नियमित होती. ‘मिनटमॅन III मिसाइल’ अमेरिकेच्या अणवस्त्र त्रिकोणाचा एक भाग आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांनी अणवस्त्र चाचण्या पुन्हा सुरु करण्याचं आवाहन केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात मिनटमॅन III मिसाइल लॉन्च करण्यात आलं. मिनटमॅन III अमेरिकेची सर्वात जुनी ICBM मिसाइल आहे. 1970 च्या दशकापासून या मिसाइलचा वापर होतोय. जमिनीवर लॉन्च होणारं हे मिसाइल 13,000 किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध घेऊ शकतं. यात न्यूक्लियर वॉरहेड फिट करता येतं. म्हणजे अणवस्त्र हल्ल्याची क्षमता आहे. यावेळी फक्त रॉकेट टेस्ट झाली. त्यासाठी कुठल शस्त्र वापरलं नाही.

अमेरिकेकडे अशी जवळपास 400 मिसाइल्स आहेत. रशिया आणि चीन विरोधात संरक्षणाचा विचार करुन ही मिसाइल बनवण्यात आली आहेत. एका मिनिटात हे मिसाइल हल्ल्यासाठी तयार असतं, म्हणून याला ‘मिनटमॅन’बोलतात.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...