
पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, आता पुन्हा एकदा पाकिस्तान शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं आहे, अचानक जमीन हलू लागल्यानं लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली, लोक घराच्या बाहेर पडले आणि रस्त्यावर पळत सुटले. नेमकं काय घडत आहे, हे काही काळ कोणालाच न कळाल्यानं एकच गोंधळ उडाला. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पाकिस्तान पुन्हा एकदा भूकंपानं हादरलं असून, पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यासह आजू-बाजूच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
स्वात हा जिल्हा पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये येतो, हा जिल्हा भूकंपाने हादरला आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच सर्व नागरिक एकाचवेळी घरातून बाहेर पडल्यानं मोठा गोंधळ उडाला, 4.5 रिस्टल स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू हा हिंदू कुश पर्वत रांगेमध्ये आहे. हिंदू कुश पर्वत रांगेत असलेला टेक्टॉनिक प्लेटांच्या हालचालीमुळे हा भूकंप झाल्याची माहिती पाकिस्तानच्या भूगर्भशास्त्र तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.
हिंदू कुश पर्वत रागेंमध्ये केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाची नोंद पृथ्वीच्या 220 किलोमीटर खोल अंतरावर झालेल्यानं या भूकंपाचा म्हणावा तेवढा परिणाम हा वर दिसून आलेला नाहीये. मात्र तरी देखील मोठा झटका जाणवला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अजून तरी या भूकंपामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याची नोंद नाहीये.
या पूर्वीही जाणवले आहेत धक्के
दरम्यान पाकिस्तानला भूकंप काही नवा नाहीये, याच वर्षाच्या सुरुवातीला देखील पाकिस्तानमध्ये भूकपांचे काही छोटे-मोठे धक्के जाणवले होते. त्यातच आता पुन्हा एकदा पाकिस्तान भूकंपाने हादलं आहे. अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्यानं लोकांचा एकच गोंधळ उडाला. पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 4.5 रिस्टल स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता आहे. या भूकंपामध्ये आतापर्यंत कुठलीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याची नोंद नाहीये, मात्र लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.