Afghanistan crisis : आधी राष्ट्रपती संकटात सोडून पळाले, आता भावाचीही अफगाणिस्तानशी गद्दारी!

| Updated on: Aug 21, 2021 | 1:00 PM

हशमत गनी यांनी तालिबानशी हातमिळवणी केल्याचं वृत्त समोर आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, हशमत गनी यांनी तालिबानी नेता खलील-उर-रहमान (Khalil-ur-Rehman) आणि धार्मिक नेता मुफ्ती महमूद जाकीर (Mufti Mahmood Zakir) यांनी तालिबानला समर्थन देण्याची घोषणा केली.

Afghanistan crisis : आधी राष्ट्रपती संकटात सोडून पळाले, आता भावाचीही अफगाणिस्तानशी गद्दारी!
Ashraf Ghani Brother Hashmat Ghani With Taliban
Follow us on

Ashraf Ghani Brother Hashmat Ghani With Taliban : अफगाणिस्तानात तालिबानराज आल्यानंतर देश सोडून पळून गेलेले राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) यांच्या भावाने वेगळाच पवित्रा घेतला आहे. अशरफ गनी यांच्याप्रमाणे त्यांच्या भावानेही अफगाणिस्तानच्या नागरिकांना धोका दिला आहे. कारण हशमत गनी यांनी तालिबानशी हातमिळवणी केल्याचं वृत्त समोर आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, हशमत गनी यांनी तालिबानी नेता खलील-उर-रहमान (Khalil-ur-Rehman) आणि धार्मिक नेता मुफ्ती महमूद जाकीर (Mufti Mahmood Zakir) यांनी तालिबानला समर्थन देण्याची घोषणा केली.

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी हे देश सोडून पळून गेले. सध्या ते कुटुंबासह संयुक्त अरब अमीरात (UAE) इथे एका हॉटेलमध्ये(Ashraf Ghani in UAE) आहेत. काबूल सोडल्यानंतर ते शेजारील देश ताजिकिस्तानमध्ये जात होते. मात्र तिथे त्यांचं विमान लँड करण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे यूएईला जावं लागलं.

रक्तपात होऊ नये म्हणून आपल्यासमोर देश सोडण्याशिवाय पर्याय नव्हता असं अशरफ गनी यांनी सांगितलं होतं. अशरफ गनी हे पैसा घेऊन पळून गेल्याचाही आरोप आहे.

अशरफ गनींवर आरोप

अशरफ गनी हे ज्यावेळी देश सोडून गेले, त्यावेळी त्यांनी आपल्यासोबत चार कार आणि एक हेलिकॉप्टरमध्ये भरुन पैसा नेल्याचा आरोप आहे. मात्र गनी यांनी असं काही केलं नसल्याचं म्हटलं आहे. जिथे चप्पल घालायलाही वेळ नव्हती, तिथे पैसा घेऊन कसा जाऊ, असा सवाल अशरफ गनी यांनी केला होता.

सालेह म्हणाले आता मी राष्ट्रपती

दरम्यान, अशरफ गनी देश सोडून गेल्यानंतर अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह (Amrullah Saleh) यांनी स्वत:ला राष्ट्रपती घोषित केलं होतं. त्यांनी ट्विट करुन आता नियमानुसार राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपतींकडे देशाचा कारभार येतो, त्यामुळे मीच आता अफगाणिस्तानचा राष्ट्रपती आहे असं म्हटलं होतं.

अजून लढाई संपलेली नाही असा इशाराही सालेह यांनी तालिबानला दिला होता. अमरुल्लाह सालेह हे अफगाणिस्तानातील पंजशीर प्रांतातच असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रांतावर तालिबानला कब्जा मिळवता आला नाही.

संबंधित बातम्या  

Afghanistan Photo : पोलादी हातात चिमुकली बाळं, सैन्यांकडून लेकरांसाठी छातीचा कोट, हृदय पिळवटून टाकणारे फोटो