Operation Sindhur: ऑपरेशन सिंदूरमध्ये हाफिज सईद, मसूद अझहर, सलाहुद्दीन यांचे तळ उद्ध्वस्त;आता भारताचं टार्गेट ‘हा’ अड्डा

ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या भयानक दहशतवादी संघटनांचे अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त केले. आता लाहोर, कराची आणि रावळपिंडीसारखी पाकिस्तानी शहरेही भारताचे लक्ष्य बनली आहेत.त्यात आता अजून एकाचा अड्डा भारती सैन्याच्या निशाणावर असल्याचं म्हटलं जात आहे.

Operation Sindhur: ऑपरेशन सिंदूरमध्ये हाफिज सईद, मसूद अझहर, सलाहुद्दीन यांचे तळ उद्ध्वस्त;आता भारताचं टार्गेट हा अड्डा
Asim Munir general headquarters in Rawalpindi is a target for India
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 08, 2025 | 7:15 PM

भारताने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की ते दहशतवादाविरुद्ध कोणत्याही थराला जाऊ शकतात. काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं, जे आता पाकिस्तानमध्ये ‘गेम चेंजर अॅक्शन’ म्हणून पाहिले जात आहे. या लष्करी कारवाईत भारताने लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या भयानक दहशतवादी संघटनांचे अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त केले. आता लाहोर, कराची आणि रावळपिंडीसारखी पाकिस्तानी शहरेही भारताचे लक्ष्य बनली आहेत.

भारताकडून पाकिस्तानच्या तब्बल 12 शहरांवर बॉम्बस्फोटांचे हल्ले

ऑपरेशन सिंदूर नंतर, पाकिस्तानने 7 मे च्या रात्री भारतातील 15 शहरांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जम्मू, पठाणकोट, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना, भुज आणि फलोदी यासारख्या शहरांना लक्ष्य करण्यात आलं, परंतु भारताने प्रथमच त्यांच्या अत्याधुनिक एस-400 हवाई संरक्षण प्रणालीचा वापर केला आणि सर्व क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली. पाकिस्तानच्या या हल्ल्याला जोरदार उत्तर देत 8 मे रोजी सकाळपासूनच भारताने पाकिस्तानात बॉम्बस्फोटांची मालिका सुरुच केली. पाकिस्तानच्या तब्बल 12 शहरांवर बॉम्बस्फोटांचे हल्ले केले.

हाफिज, अझहर आणि सलाहुद्दीनचे अड्डे उद्ध्वस्त

भारताच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने तीन मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचे मोठे तळच उद्धवस्त केले. त्यात हाफिज सईद (लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख), मौलाना मसूद अझहर (जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख) आणि सय्यद सलाहुद्दीन (हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख). भारताच्या हल्ल्यात, या दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे, शस्त्रास्त्रे डेपो आणि ऑपरेशनल मुख्यालये लक्ष्य करून नष्ट करण्यात आली आहेत. या तळांवर मोठ्या प्रमाणात रॉकेट लाँचर, एके-47 रायफल, ड्रोन उपकरणे आणि पाकिस्तानी सैन्याने पुरवलेले रसद होते.

भारताच्या निशाण्यावर आणखी एक अड्डा

पण आता भारताच्या निशाण्यावर आणखी एक अड्डा असल्याचं म्हटंल जात आहे. हा ते ठिकाण म्हणजे असीम मुनीरचं प्रशासकीय केंद्र. पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय, म्हणजेच रावळपिंडी येथील जनरल मुख्यालय (GHQ), म्हणजेच लष्करप्रमुख जनरल असीम मुनीरचे प्रशासकीय केंद्र, देखील भारताच्या निशाण्यावर असल्याचं म्हटलं जात आहे. कारण ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरुच असल्याचं म्हटलं जात आहे.

भारत  या दहशतवाद्याच्या ‘जीएचक्यू’वर हल्ला करणार?

भारताच्या जोरदार प्रत्युत्तरात , आता उपस्थित होणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे भारत आता रावळपिंडीच्या जीएचक्यूला लक्ष्य करेल का? भारत सरकारने अद्याप याबद्दल औपचारिक घोषणा केलेली नाही, परंतु संरक्षण सूत्रांच्या मते, जर पाकिस्तानकडून आणखी एक चिथावणीखोर कारवाई झाली तर पुढचा हल्ला पाकिस्तानी लष्कराच्या कमांड मुख्यालयावर किंवा आयएसआयच्या केंद्रावर होऊ शकतो. विश्लेषकांचा असा विश्वास आहे की जोपर्यंत पाकिस्तानचे सैन्य आणि आयएसआय दहशतवाद्यांना धोरणात्मक आणि तांत्रिक मदत देत राहतील, तोपर्यंत भारताची भूमिका आक्रमक राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.

ऑपरेशन सिंदूरने दहशतवाद्यांचा कणा मोडला

22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकं मारले गेले, त्यापैकी बहुतेक हिंदू यात्रेकरू आणि स्थानिक नागरिक होते. या हल्ल्यानंतर, दहशतवाद्यांना याचं जोरदार प्रत्युत्तर भारताने दिलं आहे. भारताच्या या जोरदार हल्ल्यामुळे पाकिस्तान मात्र पुरता हादरला आहे एवढं नक्की. भारताचे ऑपरेशन सिंदूर हे केवळ दहशतवाद्यांना इशारा नाही तर,पाकिस्तानी लष्कराला ‘प्रत्येक कृतीला योग्य उत्तर दिले जाईल’ हा संदेशही आहे.