
जगात उलथापालथ सुरु असताना आता इराण संदर्भात मोठी बातमी आली आहे. इराणजवळ अजूनही अणूबॉम्ब बनवण्यासाठी गरज असलेले युरेनियम उपलब्ध असल्याचे उघड झाले आहे. आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा एजन्सी (IAEA) चे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी सांगितले की इराणजवळ अजूनही ४०० किलोग्रॅम ६० टक्के शुद्ध युरेनियम आहे. जे अणूबॉम्ब तयार करण्यासाठी गरज असल्याच्या युरेनियमच्या आसपास आहे. अलिकडेच अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वान्स यांनी सांगितले होते की ४०० किलोग्रॅम युरेनियम १० अणूबॉम्ब बनवण्यासाठी पुरेसे आहे.
राफेल ग्रोसी यांनी सावध करताना सांगितले की जर राजकीय बोलणी अयशस्वी झाली तर इराणच्या विरोधात पुन्हा बळाचा वापर होण्याची शक्यता आहे. ग्रोसी यांनी हे वक्तव्य जिनेव्हा सॉल्युशन्स नावाच्या नॉन प्रॉफीट मीडिया संस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. ही संस्था जिनेव्हातील आंतरराष्ट्रीय संघटनाच्या बातम्या कव्हर करते.
ते म्हणाले की जर इराणने युरेनियमला याहून अधिक शुद्ध संवर्धित करण्यात यश मिळवले असते तर त्याच्याजवळ १० अणूबॉम्ब बनवण्याएवढे साहित्य असते. परंतू ग्रोसी असेही म्हणाले की या गोष्टीला काहीच पुरावे नाहीत की इराण खरेच अणूबॉम्ब बनवू इच्छीत आहे. इराण वारंवार सांगत आला आहे की त्याला अणूबॉम्ब बनवायचा नाही. तरीही ग्रोसी यांनी जोर देऊन सांगितले की या संदर्भात एजन्सीने अधिक सखोल तपासणी पुन्हा करायला हवी.
ग्रोसी यांनी पुढे सांगितले की इस्फहान, नतांज आणि फोर्दोच्या आण्विक ठिकाणांचे खूप नुकसान झाले आहे. परंतू ट्रम्प यांच्या टोटल डिस्ट्रक्शनच्या दाव्यानंतर इराणचे अणूतंत्रभान नष्ट झालेले नाही. त्यांच्यामते इराण सेंट्रीफ्युज पुन्हा तयार करु शकतात.
जेव्हा त्यांना विचारले गेले की ते का मानतात इराण आण्विक अस्रे तयार करत नाही, तर ते म्हणाले की एजन्सीने इस्रायलच्या हल्ल्याच्या आधी त्या स्थळांची पाहणी केली होती. त्यानंतर आम्ही सॅटेलाईटने पाहणी करत आहोत.आणि अन्य देश देखील आमच्याच निष्कर्षांवर पोहचले आहेत.
अमेरिका आणि युरोपिय संघांनी इराणच्या आण्विक कार्यक्रमाची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी IAEA च्या तात्काळ निरीक्षणाची मागणी केली आहे. सध्या IAEA चा कोणताही निरीक्षण इराणमध्ये उपस्थित नाही. इराणचे म्हणणे आहे की निर्बंध मागे घेतल्यानंतर एजन्सीच्या सोबत झालेला जुना करार आता मान्य नाही. इराण सरकारने अलिकडच्या महिन्यात राफेल ग्रोसी यांच्यावर टीका केली होती.त्यांचे म्हणणे आहे की ग्रोसी यांच्या मागच्या अहवालाने इराणच्या आण्विक शस्रास्र कार्यक्रमासंदर्भात संशय वाढवला आणि देशावर हल्ला करण्याचे निमित्त मिळाले.