AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्प यांची डेडलाईन संपण्याआधीच इराणवर हल्ले, अनेक शहरात ब्लॅकआऊट, रेल्वे सेवा उद्धवस्थ

अमेरिकेने ट्रम्प यांची डेडलाईन संपण्याआधीच इराणवर हल्ले सुरु केले आहेत. इराणच्या काशानमध्ये रेल्वे पुलावर आणि खार्ग बेटांवर हल्ले झाले आहेत. खार्ग आयलँडमध्ये इराणचे मुख्य तेल निर्यात केंद्र आहे.

ट्रम्प यांची डेडलाईन संपण्याआधीच इराणवर हल्ले, अनेक शहरात ब्लॅकआऊट, रेल्वे सेवा उद्धवस्थ
A bridge in the city of Karaj, Iran
| Updated on: Apr 07, 2026 | 8:32 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता इराणवर आम्ही हल्ले करु अशी धमकी दिली होती. मात्र ही डेडलाईन संपण्याआधीच अमेरिका आणि इस्राईल यांनी इराणच्या पायाभूत सुविधांना नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. मध्य इराणच्या काशानजवळ याह्याबाद रेल्वे पुलावर केलेल्या हल्ल्यात दोन लोक ठार आणि तीन लोक जखमी झाले आहेत. तसेच तेहराणच्या दक्षिणेत कोम शहराच्या जवळ उत्तर पश्चिम इराणच्या तब्रीज-जंजन हायवेवर हल्ला केला. कजविन शहरातील रेल्वे नेटवर्कला नुकसान पोहचले आहे. ट्रम्प यांनी इराणला वाटाघाटीसाठी मंगळवारी रात्री ८ वाजताची ( बुधवार सकाळी ५.३० वाजता ) वेळ दिली होती. मात्र, त्याच्या आधीच ट्रम्प यांनी हल्ले वेगवान केले आहेत.

अमेरिका आणि इस्राईलच्या हल्ल्याने इराणच्या अनेक शहरात ब्लँक आऊट झाला आहे. इकडे, अमेरिकेने इराणच्या खार्ग बेटावर देखील हल्ले केले आहेत. इराणच्या फार्स न्यूज एजन्सीच्या मते इराणच्या दुसऱ्या सर्वात मोठे शहर असलेल्या मशहदमधील ट्रेन सेवा रोखण्यात आली आहे. मशहदच्या गर्व्हनरने सांगितले की पुढील सुचना मिळेपर्यंत ट्रेन सेवा बंद करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना रस्ते मार्गाने वाहतूकीचा पर्याय देण्यात आला आहे. इस्राईलने मंगळवारी इराणी नागरिकांना देशभरात ट्रेन आणि रेल्वे मार्गापासून दूर रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. इस्राईलने म्हटले होते यामुळे इराणी नागरिकांना जीव गमवावे लागतील.

इराणच्या खार्ग आयलँडवर US चा हल्ला

अमेरिकन मीडिया एक्सियोसने खार्ग बेटांवरील हल्ल्याला दुजोरा दिला आहे. बुशेहर आणि बंदर गनावेहरच्या लोकांना दुपारी सुमारे १२.३० वाजता फारसची खाडी आणि खार्ग आयलँडच्या दिशेने मोठ्या धमाक्यांचा आवाज ऐकायला आला. स्फोट खूप मोठा होता आणि याचा आवाज किनारपट्टीच्या भागातही स्पष्ठ ऐकू आला. मात्र, आतापर्यंत हल्ल्याचे नेमके ठिकाण आणि नुकसानीची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही.

येथे पोस्ट पाहा –

इराणकडून आखाती प्रदेशाबाहेर हल्ल्यांची धमकी

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (आयआरजीसी) इशारा दिला आहे की, अमेरिकेविरोधातील त्यांच्या कारवाया आता या प्रदेशाबाहेरही पसरू शकतात. आयआरजीसीने म्हटले आहे की, त्यांचा संयम आता संपला आहे. “आम्ही अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या पायाभूत सुविधांनाही लक्ष्य करू शकतो, ज्यामुळे त्यांना अनेक वर्षे इंधन आणि गॅस मिळण्यात अडचणी येतील,” असे इराणने म्हटले आहे. शेजारी देशांशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे संयम राखणे शक्य झाले असले तरी, आता तसे होणार नाही. इराणने इशारा दिला आहे की, जर अमेरिकेने लक्ष्मणरेषा ओलांडली,तर ते या प्रदेशाबाहेरही हल्ले करतील.

येथे पोस्ट पाहा –

Follow Us
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....