सुपरकार रेसर रेनी ग्रेसीचा ट्रॅक चेंज, थेट पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल

ऑस्ट्रेलियाची माजी सुपरकार ड्रायव्हर आणि रेसर रेनी ग्रेसी हीने रेसिंग सोडून पॉर्न इंडस्ट्रीत काम करण्याचा निर्णय घेतला आहे (Australian supercar racing driver renee gracie decide to becomes pornstart).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:43 PM, 9 Jun 2020
सुपरकार रेसर रेनी ग्रेसीचा ट्रॅक चेंज, थेट पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाची माजी सुपरकार ड्रायव्हर आणि रेसर रेनी ग्रेसी हीने रेसिंग सोडून पॉर्न इंडस्ट्रीत काम करण्याचा निर्णय घेतला आहे (Australian supercar racing driver renee gracie decide to becomes pornstart). गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे आपण हे पाऊल उचलल्याचं स्पष्टीकरण रेनी ग्रेसीने दिलं आहे.

25 वर्षीय रेनी ग्रेसी ही ऑस्ट्रेलियातील पहिली फुल-टाईम महिला सुपरकार ड्रायव्हर आहे. तिने 2013 साली पॉर्श करेरा कप ऑस्ट्रेलिया चॅम्पियनशिप स्पर्धेतून मोटरस्पोर्ट्स करिअरला सुरु केली होती. तिच्या चांगल्या कामगिरीमुळे ती अल्पावधित जगभरात प्रसिद्ध झाली. मात्र, त्यानंतर ती मोटरस्पोर्ट्समध्ये चांगलं प्रदर्शन देऊ शकली नाही. त्यामुळे तिच्याऐवजी दुसऱ्या ड्रायव्हरची नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा : मंदीत संधी, पार्लेची चांदी, लॉकडाऊनमध्ये पार्ले बिस्कीटची विक्रमी विक्री, 82 वर्षांचा रेकॉर्ड मोडला

रेनी ग्रेसी गेल्या काही दिवसांपासून प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. ती सध्या सोशल मीडियावर स्वत:चा फोटो अपलोड करुन पैसे मिळवत आहे. मात्र, तेवढ्या पैशांवर ती आपल्या कुटुंबाला आर्थिक सहकार्य देऊ शकत नव्हती. त्यामुळे तिने पॉर्न इंडस्ट्रीत जाण्याचा निर्णय घेतला (Australian supercar racing driver renee gracie decide to becomes pornstart).

‘डेली टेलिग्राम’ने दिलेल्या माहितीनुसार ग्रेसीने पॉर्न इंडस्ट्रीत पर्दापण केल्यानंतर पहिल्याच आठवड्यात तिला 25 हजार डॉलर म्हणजेच 18.8 लाख रुपयांची कमाई होऊ शकते. याशिवाय महिन्याभरात तिची कमाई 64 हजार 750 डॉलर होण्याची शक्यता आहे.

“मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, मला इतके पैसे मिळतील. मी माझे स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ विकते. त्याबदल्यात लोक मला टिप देतात”, असं रेनी ग्रेसी म्हणाली.

“तुम्हाला विश्वास बसो किंवा न बसो, मात्र माझ्या वडिलांना याबाबत माहिती आहे. त्यांचा मला पूर्ण पाठिंबादेखील आहे. खरंतर माझ्या वडिलांना माझा अभिमानही वाटत आहे की, मी आता चांगले पैसे कमवत आहे. पण, मी काय करतेय, याचा विचार तुम्ही जास्त करु नका. मी किती यश मिळवलं ते बघा”, असं रेनी ग्रेसी गेल्या आठवड्यात एका मुलाखतीत म्हणाली होती.

“मी रेसिंगमध्ये चांगली कामगिरी करु शकली नाही. त्यामुळे मी रेसिंग सोडलं. आता तो विषय संपला आहे. लोकांना वाटतं की, मी याअगोदर जे काम केलंय त्याचा विचार करुन आता मी जे करत आहे ते करु शकत नाही. मात्र, तसं नाही. मी रेनी आहे. मला माझं स्वत:चं असं एक आयुष्य आहे. माझ्याजवळ अजूनही काम आहे. माझ्या आयुष्यात अजूनही फारसं काही बदलेलं नाही”, असं रेनी ग्रेसी म्हणाली.

हेही वाचा : गुड न्यूज! पुढील 24 तासात राज्यात मान्सून दाखल होणार