Iran: ठरलं! इराणमध्ये सत्तापालट? खोमेणींचा सूर्य मावळणार? सोन्याने भरलेले विमान कोणत्या देशाच्या दिशेने…
Ayatollah Khomeini fears of Coup in Iran: इराणमधून एक मोठी वार्ता समोर येत आहे. अयातुल्ला खोमेणी या धर्मगुरूंची सत्ता अस्ताला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांचे समर्थित सरकार कधीही कोसळू शकते आणि अनेक जण देशातून परागंदा होण्याची भीती व्यक्त होत आहे. ती मोठी अपडेट समोर येत आहे.

fears of Coup in Iran: इराणमधील वातावरण हे गढूळ झालेले आहेत. इराणमध्ये Gen Z ही रस्त्यावर उतरली आहे. सरत्या वर्षाच्या अखेरीस सुरू असलेले विरोध प्रदर्शन नवीन वर्षातही सुरू आहे. त्यातच एक मोठी अपडेट समोर येत आहे. त्यानुसार सर्वोच्च धार्मिक गुरू अयातुल्ला खोमेणी यांची सत्ता उलथवली जाऊ शकते. खोमेणी हे समर्थकांसह इराणमधून धूम ठोकण्याची शक्यता ब्रिटनमधील खासदाराने केला आहे. खासदार आणि माजी सुरक्षा मंत्री टॉम टुगेनहाट यांनी दावा केला आहे की, इराणमध्ये सत्तांतर होऊ शकते. इराणमधून मोठ्या प्रमाणात सोने हे बाहेर पाठवण्यात येत आहे. इतकेच नाही तर दारुगोळा आणि इतर मौल्यवान साहित्य विमानात भरून पाठवलं जातंय असा दावा टॉम टुगेनहाट यांनी केला आहे.
रशियाचे कार्गो विमानं इराणमध्ये
टुगेनहाट यांनी केलेल्या दाव्यानसुार, रशियाचे कार्गो विमानांचा ताफा सातत्यानं इराणमध्ये उतरत आहे आणि तो पुन्हा आकाशात झेपावत आहेत. या विमानांमध्ये मोठ्या प्रमाणावर दारुगोळा, शस्त्र आणि सोनं भरुभरून रशियात पाठवण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर किंमती वस्तू, मौल्यवान दस्तावेज देशाबाहेर पाठवण्यात येत आहे. हे सर्व साहित्य रशियात पाठवण्यात येत असल्याचा त्यांनी दावा केला. त्यामुळे इराणमध्ये खोमेणी यांच्या सत्तेचा अंत होणार असल्याचा दावा त्यांनी केला. इस्लामिक प्रजासत्ताक उलथवण्यात येण्याची सर्व चिन्ह दिसत असल्याचा दावा टुगेनहाट यांनी केला आहे.
इराणमध्ये सरकारविरोधी प्रदर्शानाला वेग
गेल्या काही दिवसात शिया धर्मगुरू अयातुल्ला खोमेनी यांचे सरकार उलथवण्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधाला चांगलीच धार आली आहे. एका ब्रिटिश दैनिकांने केलेले्या दाव्यानुसार, देशातील जनआंदोलन अजून मोठ्या प्रमाणात भडकण्याची शक्यता आहे. देशातील अनेक भागात आंदोलनाचं लोण पसरलं असून खासगी लष्कर आणि सरकारी लष्कराने दिलेल्या गुप्तवार्तेनुसार आता खोमेणी हे देश सोडण्याची तयारी करत आहे. त्यासाठी अगोदरच सर्व मौल्यवान ऐवज ते देशाबाहेर पाठवत आहेत. खोमेनी हे मॉस्कोला पळून जाण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठीची सर्व तयारी झालेली आहे. केवळ एक अखेरचा उपाय म्हणून इस्लामिक क्रांतीचे समर्थक अखेरचा निकराचा लढा देणार आहेत. त्यात जर अपयश आले तर खोमेणी हे रशियात पळून जातील.
दरम्यान इराणच्या राजेशाही कुटुंबातील राजे रजा पहलवी यांनी लोकांना मोठे आवाहन केले आहे. त्यांनी जनतेला आता घरात न थांबण्याचे आणि खोमेनी यांची सत्ता उलथवण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी 8 आणि 9 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता रस्त्यावर उतरून तुमचा विरोध दर्शवा असा असे आवाहन पहलवी यांनी केले आहे. त्यामुळे या सत्तेचा अंत होण्याची वेळ जवळ आल्याचे म्हटले जाते.
