USA : युद्ध सुरु असतानाच अमेरिकेला धक्का, दूतावासावर मिसाईल हल्ला, ज्वाळा, धुराचे लोट आणि…

इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकन दूतावासावर मोठा हल्ला झाला आहे. या दूतावासावर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. एक क्षेपणास्त्र दूतावासाच्या आवारातील हेलिपॅडवर पडला. या हल्ल्याच्या संपूर्ण परिसर हादरला. , सगळीकडे खळबळ माजली.

USA : युद्ध सुरु असतानाच अमेरिकेला धक्का, दूतावासावर मिसाईल हल्ला, ज्वाळा, धुराचे लोट आणि...
अमेरिकेच्या दूतावासावर मोठा हल्ला
Image Credit source: social media
| Updated on: Mar 14, 2026 | 11:11 AM

आखाती देशांमध्ये पेटलेल्या युद्धामुळे बराच विध्वंस झाला आहे. इराणवर अमेरिका-इस्रायल तुटून पडलेत, दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू आहेत. अमरिकेलाही त्यात फटका बसला आहे, मात्र  आता याचदरम्यान आता अमेरिकेला मोठा दणका बसला आहे. कारण बगदादमध्ये अमेरिकन दूतावासावर मिसाईल हल्ला झाला असून, हे लिपॅडलाच टार्गेट करण्यात आलं आहे. या मिसाईल हल्ल्यानंतर चहूबाजूंनी आगीच्या ज्वाळा उठल्या आणि धुराने संपूर्ण परिसर माखून गेला. वाढत्या तणावादरम्यान आणि अलिकडच्या काळात आलेल्या धमक्यांदरम्यानच हा हल्ला झाला आहे.

इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील “ग्रीन झोन” या सर्वात सुरक्षित क्षेत्र मानल्या जाणाऱ्या अमेरिकन दूतावासावर मोठा हल्ला झाला आहे. इराकी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दूतावासाच्या आवारातील हेलिपॅडला लक्ष्य करून मिसाईल डागण्यात आलं. या हल्ल्यानंतर लगेचच दूतावासाच्या आवारातून प्रचंड धूर निघाला, या हल्ल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घबराट पसरली. अमेरिकन दूतावासातील रडार सिस्टमला आत्मघाती ड्रोनने लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्यामध्ये अमेरिकन दूतावासाच्या आवारातून धुराचे लोट उठताना स्पष्ट दिसत आहेत. मात्र दूतावासावरील या हल्ल्यात कोणतेही नुकसान अथवा जीवतहानी झाल्याची पुष्टी अमेरिकेने अद्याप केलेली नाही. हल्ल्यानंतर सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.

अलिकडेच’इराकी इस्लामिक रेझिस्टन्स’ ने अमेरिकन लष्करी आणि गुप्तचर कर्मचाऱ्यांवर मोठे बक्षीस जाहीर केले होते आणि अमेरिकन विमान पाडल्याचा दावा केला होता, त्याच दरम्यान आता हा हल्ला झाला आहे. त्यामुळे हा हल्ला अशाच मालिकेचा भाग असू शकतो असे मानले जात आहे. अमेरिकन दूतावासावर करण्यात आलेला हा हल्ला म्हणजे वॉशिंग्टनला दिलेलं थेट आव्हान, अशा दृष्टीने पाहिला जात आहे.

बगदादमधील अमेरिकन दूतावास हे सर्वात सुरक्षित राजनैतिक परिसरांपैकी एक मानले जाते, मात्र तरीही हेलिपॅडवर मिसाईल डागल्याने हे मोठे सुरक्षा उल्लंघन मानलं जातंय. एकीकडे इराणशी युद्ध सुरू असतानाच बगदादमध्ये झालेल्या या हल्ल्यामुळे अमेरिकेचं टेन्शन आणखीनच वाढलं आहे. त्यांच्यासाठी हा मोठा सेटबॅक मानला जात आहे.

 

Follow Us