Explained : युक्रेनपासून लिबियापर्यंत हिट ठरलेले तुर्कीचे ड्रोन्स भारतासमोर का फ्लॉप ठरले? आपल्याकडे अशी कुठली सिस्टिम

Explained : भारत-पाकिस्तानच्या चार दिवसाच्या संघर्षात पाकिस्तानच प्रचंड नुकसान झालचं. पण पाकिस्तानमुळे तुर्कीच्या डिफेन्स इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जगभरातील त्यांच्या व्यापाराला फटका बसणार आहे. जे ड्रोन्स युक्रेनपासून लिबियापर्यंत हिट ठरले, ते भारतासमोर का फ्लॉप झाले?

Explained :  युक्रेनपासून लिबियापर्यंत हिट ठरलेले तुर्कीचे ड्रोन्स भारतासमोर का फ्लॉप ठरले? आपल्याकडे अशी कुठली सिस्टिम
Operation Sindoor
| Updated on: May 31, 2025 | 11:44 AM

तुर्कीच्या ‘बायराकतार TB2’ ड्रोनची जगभरात चर्चा आहे. युक्रेनपासून लिबियापर्यंतच्या युद्धात निर्णायक ठरलेलं हे ड्रोन ऑपरेशन सिंदूरच्यावेळी मात्र, भारतासमोर फ्लॉप ठरला. त्यामुळे हे ड्रोन विकसित करणाऱ्या तुर्कीच्या कंपनीची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. 7 ते 10 मे या चार दिवसाच्या लढाईत पाकिस्तानने तुर्कीच्या या ‘बायराकतार TB2’ ड्रोन्सनी भारतावर हल्ले चढवण्याचा प्रयत्न केला. भारताच्या शहरांना, सैन्य तळांना लक्ष्य करण्याच्या इराद्याने हे तुर्कीचे ड्रोन्स डागले. पण भारतीय सैन्य दलांनी तुर्कीची ही ड्रोन्स हवेतच नष्ट केली. तुर्कीच्या डिफेन्स इंडस्ट्रीसाठी हा मोठा धक्का आहे. टर्कीश बनावटीची ही ड्रोन्स त्यांचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप एर्दोगन यांच्यासाठी इस्लामिक व्हिजन आहे. त्यांच्या संरक्षण महत्वकांक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाच शस्त्र आहे. पण भारताने त्यांचा अभिमानच धुळीस मिळवला.

‘बायराकतार TB2’ ड्रोन हे तुर्कीसाठी फक्त शस्त्र नाहीय, तर आफ्रिका, मध्य पूर्व आणि सेंट्रल एशियामध्ये डिप्लोमॅटिक म्हणजे राजनैतिक प्रभाव वाढवण्याच हत्यार आहे. तुर्की या संघर्षात पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला, ते फक्त धर्म या एकमेव मुद्यावर. तुर्कीला इस्लामिक जगतात स्वत:च वर्चस्व बनवायच आहे, त्यासाठी त्यांना पाकिस्तानची गरज आहे. इस्लामिक जगतात वर्चस्वासाठी सौदी अरेबिया, कतार, इराण आणि तुर्की या चार देशांमध्ये स्पर्धा सुरु आहे. त्यात इस्लामिक जगतात पाकिस्तान एकमेव अणवस्त्र संपन्न देश आहे. त्यामुळे तुर्की पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला.

तुर्कीच्या विश्वासहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह

तुर्कीच एकही ड्रोन आपलं उद्दिष्टय साध्य करु शकलं नाही. त्यामुळे युद्धभूमीतील त्यांच्या विश्वासहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलय, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. तुर्कीच्या डिफेन्स इंडस्ट्रीकडून जी मोठमोठी आश्वासन दिली जातात, त्या बद्दल संशय निर्माण झाला आहे. भारताच्या हवाई सुरक्षेला भेदून तुर्कीची टेक्नोलॉजी जगाला दाखवू या इराद्याने पाकिस्तानने तुर्कीकडून शेकडो ड्रोन्स घेतली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. भारतीय सैन्य दलांनी हवेतच ही सर्व ड्रोन्स खाक केली.

पाकिस्तानच यावर काय म्हणणं?

‘बायराकतार TB2’ त्याशिवाय अजून लहान सोनगात्री आणि इयात्री अशी 300 ते 400 तुर्कीशी बनावटीची ड्रोन्स भारताने हवेतच पाडली, असं एका एअर डिफेन्स अधिकाऱ्याने सांगितलं. पाकिस्तानप्रमाणे तुर्कीसाठी सुद्धा ही मानहानीकारक गोष्ट आहे. “फायटर जेट्स आणि आर्टिलरी हल्ल्याला कव्हर म्हणून ही ड्रोन्स वापरण्यात आली. पण भारताच्या L70 सह अन्य सिस्टिमुळे ही ड्रोन्स आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकली नाहीत” असं पाकिस्तानी सूत्रांनी रॉयटर्सला सांगितलं.

ही सिस्टिम भारताची खरी हिरो

तुर्कीची ही ड्रोन्स आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकली नाहीत, याला कारण आहे, भारताची स्वदेशी बनावटीची ‘आकाशतीर’ सिस्टिम. भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेडने (BHEL) ही आकाशतीर सिस्टिम विकसित केली आहे. भारतीय सैन्य आणि एअरफोर्स दोघांची रडार सिस्टिम आकाशतीरमध्ये एकत्रित करण्यात आली आहे. ही सिस्टिम हवाई धोक्याची कल्पना देते, टार्गेटचा माग काढते आणि वेळेत शस्त्राची निवड करते, त्यामुळे पाकिस्तानने स्वॅर्म ड्रोन्स म्हणजे झुंडीने पाठवलेले ड्रोन्स हवेतच नष्ट करण्यात यश आलं.