AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vladimir Putin India Tour : भारतात येण्याआधी व्लादिमीर पुतिन यांना मिळाली मोठी GOOD NEWS, अमेरिकेची चांगलीच जिरवणार

Vladimir Putin India Tour : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा हा दौरा संरक्षण करारांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पण त्याआधी पुतिन यांना एक मोठी गुड न्यूज मिळाली आहे. रणनितीक दृष्टीने त्याचा भरपूर फायदा आहे. अमेरिकेसाठी हा झटका आहे.

Vladimir Putin India Tour : भारतात येण्याआधी व्लादिमीर पुतिन यांना मिळाली मोठी GOOD NEWS, अमेरिकेची चांगलीच जिरवणार
Russian president vladimir putin
| Updated on: Dec 02, 2025 | 4:19 PM
Share

भारत दौऱ्यावर येण्याआधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मोठी गुडन्यूज मिळाली आहे. सूदानने आफ्रिका आणि लाल सागराजवळ रशियाला बेस बनवण्याची ऑफर दिली आहे. आपला सैन्य तळ बनवण्यासाठी रशिया या बेसचा वापर करु शकतो. संपूर्ण सुदानमध्ये गृहयुद्ध सुरु असताना त्यांनी हा निर्णय घेतला आहे. वॉल स्ट्रीट जनरलच्या एका रिपोर्ट्नुसार, सूदान सरकारने एक बेस आफ्रिका आणि एक बेस लाल सागरजवळ ऑफर केला आहे. रशिया बऱ्याच काळापासून या बेससाठी प्रयत्नशील होता.

रिपोर्ट्नुसार सूदान सरकारने रशियाला लाल सागराजवळ पासपोर्ट आणि खाणकामसाठी काही ठिकाणं देण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व बेस 25 वर्षांसाठी रशियाला देण्यात येतील. त्या बदल्यात सूदानला रशियाकडून शस्त्रास्त्र आणि गोपनीय माहिती मिळेल. सूदानमध्ये गृहयुद्ध सुरु आहे. सूदान रॅपिड फोर्सचे फायटर सर्वसामान्य लोकांची हत्या करत आहेत.

रशियाचा फायदा काय?

अमेरिकी वर्तमानपत्रानुसार, रशियाने सूदानचा हा प्रस्ताव स्वीकारला तर पुतिन यांचं सैन्य नौदल तळ बनवू शकतं. या ठिकाणी 4 युद्धनौका आणि 300 सैनिकांच्या तैनातीची व्यवस्था आहे.

निर्णय अमेरिकेसाठी झटका

आफ्रिकेत रशियाचा हा पहिला बेस बनू शकतो. म्हणजे सूदानच्या माध्यमातून रशियाला आफ्रिकेमध्ये एन्ट्री मिळेल. अमेरिकेने आफ्रिकेत रशियाला रोखण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावली होती. अलीकडेच ट्रम्प यांनी सूदानच्या गृहयुद्धात हस्तक्षेप करणार असल्याचं म्हटलं होतं. पण सूदान सरकारचा नवीन निर्णय अमेरिकेसाठी झटका आहे.

या बंदराचं महत्व काय?

लाल सागराजवळ रशियाला बंदर मिळालं आहे. हे बंदर बरोबर सौदी अरेबियाच्या समोर आहे. सौदी अरेबियात अनेक ठिकाणी अमेरिकी तळ आहेत. 2250 किलोमीटर लांबीचा लाल सागर व्यापारिक दृष्टीने महत्वाचा मानला जातो. जगभरातील तेल व्यापाराचा 12 टक्के भाग या लाल सागराच्या माध्यमातून येतो.

लाल सागरावर कंट्रोल

लाल सागरावर कंट्रोल ठेवण्यासाठी रशिया आणि इराणकडे आतापर्यंत येमेनचे हुती बंडखोर होते. पण आता सूदानच्या निर्णयामुळे रशियाला स्वत:चा नौदल बेस बनवता येईल.

मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.