कोणी भित्रे असतील, तर बाहेर पडा; इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची वादळी सभा, सभागृहात नेमकं काय घडलं?

इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची वादळी सभा पार पडली. यावेळी त्यांनी राजदूतांवच टीका केली. तर विरोधकांवर जोरदार टीका केली.

कोणी भित्रे असतील, तर बाहेर पडा; इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची वादळी सभा, सभागृहात नेमकं काय घडलं?
netyanahu
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 25, 2026 | 8:28 AM

इस्त्रायलचे पतंप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची गुरुवारी झालेली संयुक्त राष्ट्र महासभा ही वादळी झाली. या सभेतून राजदूतांवर जोरदार हल्लाबोल केला. सभागृहात भाषणाआधी बाहेर जाणाऱ्या राजदूतांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी भित्रे म्हणत टीका केली. त्यानंतर पुन्हा आणखी कोणी भित्रा असेल, तर त्यांनी हॉलच्या बाहेर जावे’, असे त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर नेतन्याहू यांच्या समर्थकांनी नारेबाजी देखील केली.

नेत्यानाहू यांचा ब्रिटन आणि फ्रान्सरर टीका 

नेतान्याहू यांनी भाषणा गाजामध्ये इस्त्रायलने केलेल्या कारवाईचं समर्थन केलं. इस्रायलने मोठी घटना होण्यापासून थांबवली. यावेळी त्यांनी महापौर जोहरान ममदानी यांच्यावरही जोरदार टीका केली. नेतान्याहू यांनी म्हटलं की, ममदानी हे मला यूएनमध्ये येण्यापासून रोखत होते. मला शांत बसायला सांगत होते. परंतु सत्य लपवणारा नाही’. तर नेतान्याहू यांनी ममदानी यांच्यावर हमासचं समर्थन केल्याचाही आरोप केला. परंतु ममदानी यांनी अनेकदा आरोप फेटाळून लावले आहे. ममदानी यांनी नेतान्याहू यांचं विधान निराधार असल्याची टीका केली होती. नेतान्याहूंनी ब्रिटन आणि फ्रान्स (Fracnce) देशांवर टीका केली. इस्त्रालयविरोधी दबावापुढे झुकल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आंदोलक पोलिसांच्या ताब्यात 

नेतान्याहू यांनी इराण (iran), गाझा, इतर इस्त्रायलीच्या आघाड्यांचा दावा केला. दुसरीकडे त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक केलं. इस्त्रायला याआधी इतका मोठा मित्र देश लाभला नसल्याचे सांगितले. त्यांनी सभागृहात जवळपास 40 मिनिटे भाषण केलं. दुसरीकडे नेतान्याहू यांच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या बाहेर आंदोलन झाली. या आंदोलकांनी इस्त्रायलला होणाऱ्या शस्त्रपुरवठ्याला विरोध केला. तर गाझाच्या बाजूने घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी तातडीने आंदोलकांना ताब्यात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. त्यांना ताब्यात घेऊत पोलीस स्टेशनमध्ये आणले. नेतान्याहू यांचा दौरा छोटा होता. त्यामुळे नेतात्याहू यांना अधिक फिरता आले नाही. ते भाषणानंतर इस्त्रालयला जाणार होते.  त्यांनी केलेल्या टीकेला विरोधी राष्ट्र काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us