AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना महाराष्ट्रातून पहिलं आव्हान, कोल्हापूर खंडपीठात याचिका

Petition Filed against Chief Election Commissioner Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना महाराष्ट्रातून पहिलं कायदेशीर आव्हान देण्यात आलं आहे. काही निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रियांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना महाराष्ट्रातून पहिलं आव्हान, कोल्हापूर खंडपीठात याचिका
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कोल्हापूर हायकोर्टात याचिकाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 25, 2026 | 9:32 AM
Share

सध्या देशाचा निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त, इतर दोन आयुक्त यांची जोरदार चर्चा सुरू आहे. आयोगातील मतभेद आणि ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात विरोधकांनी रान उठवले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्याचवेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना महाराष्ट्रातून पहिलं कायदेशीर आव्हान देण्यात आलं आहे. काही निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रियांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. काय आहे ही याचिका? काय आहे त्यातील महत्त्वाचे मुद्दे?

कोल्हापूर खंडपीठात याचिका

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या काही निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रियांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. प्रथमेश गोपाल गवाणकर, गौरव सूर्यकांत नाखरेकर, आदेश शशिकांत भाटकर आणि स्मिताली निलेश नार्वेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. असीम सरोदे यांच्यासह वकिलांचे पथक काम पाहत आहे.

याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे काय?

1. निवडणूक आयोगाच्या दोन आयुक्तांनी विविध निर्णय आणि प्रक्रियांबाबत १४ वेळा आक्षेप नोंदविल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

2. मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे, मतदार यादीचा डेटाबेस, ERO कार्यपद्धती आणि ECINet प्रणालीशी संबंधित मुद्दे याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत.

3. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा, २०२३ अंतर्गत निवडणूक आयोगाचे निर्णय सामूहिक पद्धतीने घेतले गेले का? असा कायदेशीर प्रश्नही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.

4. तसेच महाराष्ट्रातील SIR प्रक्रिया थांबवावी, SIR दरम्यान मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे पुनर्स्थापित करावीत

5. कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र न्यायिक समिती स्थापन करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

देशातील निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरून आणि ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावरून विरोधकांनी रान उठवले आहे. दोन सहकारी आयुक्तांनी ज्या तक्रारी केल्याचा दावा द इंडियन एक्सप्रेसने त्यांच्या वृत्तात केला आहे. त्या आधारे विरोधक आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षातील निवडणुका निष्पक्ष झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या निवडणुका रद्द कराव्यात आणि नव्याने निवडणूक घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते करताना दिसत आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात येत आहे. तर सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी येत्या 48 तासात मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा न दिल्यास देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यातच आता आयुक्तांविरोधात कायदेशीर लढा सुरू झाल्याचे कोल्हापूर खंडपीठातील याचिकेवरून समोर येत आहे.

Follow Us
गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
Video : गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
Video: पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ
Mumbai Ganpati Visarjan 2026 | लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ; गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?