AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! इराणचा पलटवार, थेट अमेरिकेच्या तळांवर हल्ले, ट्रम्प चिंतेत

War Update : अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणवर हल्ले केले आहेत. आता इराणनेही पलटवार केला असून इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर भीषण हल्ले केले आहेत.

सर्वात मोठी बातमी! इराणचा पलटवार, थेट अमेरिकेच्या तळांवर हल्ले, ट्रम्प चिंतेत
War UpdateImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 28, 2026 | 3:03 PM
Share

इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. अमेरिकेनेही या युद्धात सहभाग घेतला असून या दोन्ही देशांनी इराणच्या अनेक भागांमध्ये हल्ले केले आहेत. इराणची राजधानी तेहरान आणि जोमहौरी परिसरावर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहे. इराणची अणुऊर्जा सुविधा आणि राष्ट्रपती निवासावरही हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आता इराणनेही पलटवार केला असून इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर भीषण हल्ले केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इराणचा पलटवार

इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले आहे. इराणने अमेरिकेच्या बहरीन, कुवैत, जॉर्डन, कतार आणि युएईतील लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. बहरीनमध्ये सायरन वाजू लागले आहेत. अमेरिकन नौदलाच्या पाचव्या फ्लीटच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आहेत. इराणने या लष्करी तळांवर एकाच वेळी अनेक क्षेपणास्त्रे डागली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजूंनी हल्ल्यांना सुरुवात झाली आहे. अमेरिकेसह इराणने इस्रायलच्या 4 शहरांवर हल्ले केल्याचीही माहिती समोर आली आहे. इराणने इस्रायलवर तब्बल 105 क्षेपणास्त्रे डागली आहेत.

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. इस्रायलने इराणवर केलेल्या या हल्ल्याला इम्प्रेसिव्ह स्ट्राईक असे म्हटले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, इस्रायल आणि अमेरिकेने इराणमधील तेहरान, इस्फहान, कोम, खोर्रमाबाद यासह इतरही काही शहरांत हल्ले केले आहेत. तेहरानमधील विद्यापीठ रोड, सर्वोच्च न्यायालय, न्याय मंत्रालय या महत्त्वाच्या परिसरातही हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामैनी यांचे निवासस्थान निशाण्यावर होते. मात्र हा हल्ला होण्यापूर्वी खामेनी यांनी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते.

इराणचे हवाई क्षेत्र बंद

इराणवर झालेल्या हल्यांनंतर इराणने आपले संपूर्ण हवाई क्षेत्र बंद केले आहे. तसेच पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलच्या अनेक शहरांवर हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे इस्रायलमध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कतारमधील अमेरिकन दूतावासानेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...