भारतातही बिकिनी एअरलाईन्स, फक्त 9 रुपयांपासून तिकीट

जगात बिकिनी एअरलाईन नावाने प्रसिद्ध असलेली वियतनामची एअरलाईन वियतजेट यावर्षी भारतातही डिसेंबरपर्यंत आपली सेवा सुरु करत आहे. ही सेवा नवी दिल्ली ते हनोई आणि हो ची मिन्ह शहर येथून सुरु केली जाणार आहे.

भारतातही बिकिनी एअरलाईन्स, फक्त 9 रुपयांपासून तिकीट

मुंबई : जगात बिकिनी एअरलाईन नावाने प्रसिद्ध असलेली वियतनामची एअरलाईन वियतजेट यावर्षी भारतातही डिसेंबरपर्यंत आपली सेवा सुरु करत आहे. ही सेवा नवी दिल्ली ते हनोई आणि हो ची मिन्ह शहर येथून सुरु केली जाणार आहे. 2011 मध्ये ही एअरलाईन चर्चेत आली होती, कारण यांच्या एका जाहिरातीमध्ये विमानातील सर्व क्रू मेंबर बिकिनीमध्ये होते. तेव्हा पासून बिकिनी एअरलाईन म्हणून यांना प्रसिद्धी मिळाली.

बिकिनी एअरलाईन सेवा भारतातही सुरु होणार असल्याने अनेक जणांनी यासाठी पसंती दर्शवली आहे. एअरलाईन 20 ते 22 ऑगस्ट वियतजेट तिकिटासाठी स्पेशल प्रमोशन करणार आहे. या प्रमोशन दरम्यान सुपर सेव्हिंग तिकिटही ऑफर केली जाणार आहे. या तिकीटाची किंमत फक्त 9 रुपयांपासून सुरु होणार आहे.

नवी दिल्ली ते हो ची मिन्ह सिटी मार्गावर 6 डिसेंबरपासून प्रत्येक आठवड्याला चार विमानांचे उड्डाण केले जाईल. तर 7 डिसेंबरला हनोई ते नवी दिल्ली मार्गावर प्रत्येक आठवड्याला तीन विमानांचे उड्डाण केले जाणार आहे. हो ची मिन्ह मार्गावर सोमवार, बुधवार, शक्रवार तसेच रविवारी उड्डाण सेवा सुरु राहतील आणि हनोई मार्गावर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी विमानांची उड्डाणं सुरु राहतील.

विशेष म्हणजे इंडिगोने यापूर्वीच हो ची मिन्ह सिटी ते कोलकातासाठी 3 ऑक्टोबरपासून उड्डाण सुरु करणार असल्याची घोषणा केली होती.

वियतजेट दररोज 400 विमानांचे उड्डाण करते आणि आतापर्यंत कंपनीने 8 कोटी प्रवाशांनी त्यांच्या विमानातून प्रवास केला आहे. कंपनी देश तसेच परदेशात 129 मार्गावर उड्डाण करते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *