टेकऑफ करताना विमानाचा टायर फुटला, किंचाळणाऱ्या-आरडाओरड, सामान कोसळले… भयावह VIDEO
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका विमानाचा टेकऑफ दरम्यान टायर फुटल्याचे दिसत आहे. त्यामुळे विमानातील भयावह व्हिडीओ समोर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी विमान अपघात होत असल्याचे कानावर येत आहे. त्यामुळे अनेकजण विमान प्रवास करताना घाबरतात. असाच एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रवाशांनी भरलेले विमान दिसत आहे. हे सर्व प्रवासी किंचाळताना, आरडो-ओरड करताना दिसत आहे. तसेच त्यांचे सामान खाली पडत असल्याचे दिसत आहे. आता नेमकं काय झालं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
इराणमध्ये एक मोठा विमान अपघात टळला आहे. पण जे दृश्य समोर आले त्यामुळे हे व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात थरकाप निर्माण झाला. खरे तर इराणमध्ये या विमानाला उड्डाण भरल्यानंतर थोड्याच वेळात आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या लँडिंग गिअरचा एक टायर फुटून बाहेर पडला होता. जेव्हा विमान परत विमानतळावर उतरले तेव्हा केबिनच्या छताचा काही भाग खाली कोसळला. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये छताचा भाग प्रवाशांवर पडताना दिसला. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही आणि सर्व लोकांना सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढण्यात आले.
An Iranian Sepehran Airlines Boeing 737 was forced to return to Mashhad Airport after a tire reportedly burst shortly after takeoff and the aircraft suffered engine damage.
The flight had been heading to Kermanshah.
Video from inside the plane showed tense passengers. pic.twitter.com/5yR8l6t3cH
— Clash Report (@clashreport) September 15, 2026
बोइंग ७३७ चे विमान, अपघात फक्त काही अंतरावर होता
ही घटना मंगळवारी घडली. सेपेहरान एअरलाइन्सचे बोइंग ७३७ विमान इराणच्या मश्हदहून करमानशाहला जात होते. उड्डाण भरल्यानंतर थोड्याच वेळात विमानात तांत्रिक अडचण आली. त्यानंतर पायलटने आपत्कालीन स्थिती जाहीर केली आणि विमान परत मश्हदला आणले. ब्राझीलच्या न्यूज आउटलेट यूओएलने इराणच्या रझावी खोरासान प्रांताच्या सरकारच्या हवाल्याने ही माहिती दिली.
इराणी न्यूज एजन्सी आखरीन खबर यांनी जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये दिसते की विमान उतरताना केबिनच्या छताचा आतील भाग प्रवाशांवर पडत आहे. सोबत प्रवाशांवर त्यांचे सामानही पडत होते. छत पडण्यामुळे विमानाच्या आतील काही भाग उघडा झालेलाही दिसला. संपूर्ण विमान डोलत होते आणि त्यासोबत प्रवासी किंचाळत होते. यूओएलच्या मते, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. विमान लँड केल्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
काय घडले होते?
ब्राझीलच्या आणखी एका न्यूज आउटलेट आर७ ने सांगितले की प्राथमिक माहितीनुसार टेकऑफ दरम्यान विमानाचा एक टायर फुटला असावा. मात्र, याची अधिकृत पुष्टी झाली नव्हती. अहवालात असेही म्हटले होते की त्या वेळी विमानात तांत्रिक समस्या शेवटी कोणत्या कारणाने आली हे स्पष्ट नव्हते. यूओएलच्या मते, सेपेहरान एअरलाइन्सचे प्रवक्ते हसन जाफरी यांनी इराणच्या सरकारी न्यूज एजन्सी फार्सच्या हवाल्याने सांगितले की सर्व प्रवासी सुरक्षितपणे विमानातून उतरले. त्यानंतर प्रवाशांना करमानशाहला जाणाऱ्या दुसऱ्या उड्डाणात पाठवण्यात आले.