AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेने झुकवले… या देशाच्या पंतप्रधानांनी मागितली डोनाल्ड ट्रम्प यांची माफी, मोठी खळबळ

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानानंतर मोठी खळबळ उडाली असून एका देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला माफी मागितल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत अमेरिकेतील संबंध तणावात आहेत.

अमेरिकेने झुकवले... या देशाच्या पंतप्रधानांनी मागितली डोनाल्ड ट्रम्प यांची माफी, मोठी खळबळ
US President Donald Trump
| Updated on: Nov 02, 2025 | 7:28 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून टॅरिफच्या माध्यमातून सर्वांना धमकावताना दिसत आहेत. भारतासह ब्राझीलवर त्यांनी मोठा टॅरिफ लावला. टॅरिफच्या मुद्द्यावरून अनेक देशांसोबतचे त्यांचे संबंध खराब झाल्याचे सध्या दिसतंय. कॅनडा आणि अमेरिका यांच्यातीलही संबंध फार काही चांगले राहिले नाहीत. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात एक जाहिरात चालवण्यात आली, ही जाहिरात पाहून डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर थेट 10 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक असा निर्णय घेतला. त्या जाहिरातीनंतर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज झाले होते. ट्रम्प यांच्या निर्णयाने कॅनडाला मोठा फटका बसला.कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी शनिवारी आपली माफी मागितल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

कॅनडातील जाहिरात ओंटारियो कंझर्व्हेटिव्ह नेते डग फोर्ड यांनी केली होती, जे अनेकदा स्वतःला ट्रम्पसारखे नेते म्हणून वर्णन करत होते. त्या जाहिरातीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे जुने विधान जबाबदारीमुळे व्यापार युद्धे आणि आर्थिक विनाश होतो, असे म्हटले होते. या जाहिरातीनंतर डोनाल्ड ट्रम्प इतके जास्त भडकले की, त्यांनी कॅनडावर 10 टक्के टॅरिफ वाढवत सर्व व्यापार चर्चा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला.

कॅनडा यांनी नुकताच सांगितले की, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी माझ्याकडे माफी मागितली आहे. डोनाल्ड ट्रम्प  यांनी म्हटले की, माझ्या विधानाला चुकीच्या पद्धतीने दाखवले जात होते. ज्यावरून असे वाटतं की, टॅरिफच्या विरोधात आहे. पत्रकारांसोबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मार्क कार्नी हे खूप जास्त चांगले आहेत. त्यांनी माझ्याकडे माफी मागितली आहे. ती एक खोटी जाहिरात होती.

रेगनचे खरे शब्द मोडून तोडून दाखवण्यात आली. खरोखरच असे व्हायला नाही पाहिजे, त्यांनी माफी मागितली याचे मला काैतुक आहे. आता कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी माफी मागितल्यानंतर हा विषय संपल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका जाहिरातीमुळे कॅनडा आणि अमेरिकेतील संबंध तणावात असल्याचे मागील काही दिवसांपासून बघायला मिळाला. शेवटी कॅनडाच्या पंतप्रधानांना डोनाल्ड ट्रम्प यांची माफी मागावी लागली.

Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.