AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाने झटक्यात टाकले मागे, भारतासोबत रशियाची मोठी भागिदारी, टेन्शन वाढल, तब्बल 12 टक्क्यांनी…

रशियाच्या तेलावरून मोठं राजकारण रंगताना दिसतंय. रशियाच्या अर्थव्यवस्थेला झटका देण्यासाठी अमेरिका रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर टॅरिफ लावताना दिसतंय. मात्र, यादरम्यान रशियाने अमेरिकेला मोठा झटका दिलाय.

रशियाने झटक्यात टाकले मागे, भारतासोबत रशियाची मोठी भागिदारी, टेन्शन वाढल, तब्बल 12 टक्क्यांनी...
Russia sunflower oil
| Updated on: Nov 01, 2025 | 2:01 PM
Share

अमेरिका सध्या रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यासाठी अनेक देशांवर दबाव टाकत आहे. अमेरिकेने दोन प्रमुख रशियन तेल कंपन्यांवर बंदी घातली आहे. एकेकाळी रशियाचा दुसरा सर्वात मोठा तेल निर्यातदार असलेल्या भारताच्या मागे अमेरिका हात धुवू लागलीये. रशिया युक्रेन युद्ध बंद करायच असेल तर रशियाकडून तेल खरेदी जगातील देशांनी बंद करावी, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. भारताबद्दल धक्कादायक दावा करताना अमेरिकेने म्हटले की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने युक्रेन रशिया युद्ध सुरू आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करून त्यावर रिफायनरी करून जगभरात विकून नफेखोरी करतोय. भारतावर तब्बल 50 टक्के लावण्याचा धक्कादायक निर्णय अमेरिकेने घेतला.

कच्च्या तेलाच्या बाबतीत रशियाने सूर्यफूल तेलाच्या बाबतीत एक नवीन विक्रम प्रस्थापित केलाय. गेल्या चार वर्षांत रशियाकडून भारताच्या सूर्यफूल तेलाच्या आयातीत बारा पट वाढ झालीये. रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून  युक्रेनियन सूर्यफूल तेल बहुतेक युरोपमध्ये गेले आहे. हेच नाही तर यामुळे रशिया आता भारतासाठी एक विश्वासार्ह पुरवठादार बनला आहे. अमेरिकेच्या दबावामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याचे सांगितले जाते.

रिपोर्टनुसार, रशिया आणि भारतातील उद्योग प्रतिनिधींनी अलीकडेच पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्यासाठी भेट घेतली. यामुळे भविष्यात एक वेगळे समीकरण बघायला मिळेल. 2021 मध्ये भारताच्या एकूण सूर्यफूल तेल आयातीत रशियाचा वाटा 10 टक्के होता, भारताने 2024 च्या वर्षात रशियाकडून 2.09 दशलक्ष टन सूर्यफूल तेल आयात केली, जी खूप जास्त आहे. विशेष म्हणजे ही संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतंय.

भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता भारतावर विविध प्रकारे दबाव टाकण्याचे काम अमेरिकेकडून केले जात आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद करावी, अशी मागणी अमेरिकेची आहे. मात्र, अमेरिकेच्या दबावानंतर भारताने तेल खरेदी सुरूच ठेवलीये. चीन हा रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणारा नंबर 1 चा देश आहे. मात्र, चीनबाबत वेगळी भूमिका अमेरिकेची आहे.

पार्थ पवार 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणार? 7 दिवस मुदतवाढ अन्...
पार्थ पवार 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणार? 7 दिवस मुदतवाढ अन्....
बाळासाहेबांना ठाकरे बंधूंकडून अभिवादन...उद्यापासून जागा वाटप!
बाळासाहेबांना ठाकरे बंधूंकडून अभिवादन...उद्यापासून जागा वाटप!.
आजारी राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर... भावाच्या हातात हात अन्...
आजारी राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर... भावाच्या हातात हात अन्....
अमित ठाकरेंवर पहिला गुन्हा; म्हणाले, मला अभिमान अन् आनंद...प्रकरण काय?
अमित ठाकरेंवर पहिला गुन्हा; म्हणाले, मला अभिमान अन् आनंद...प्रकरण काय?.
अर्ज भरण्याची मुदत संपली, शेवटच्या दिवशी मोठी गर्दी, कुठं काय स्थिती?
अर्ज भरण्याची मुदत संपली, शेवटच्या दिवशी मोठी गर्दी, कुठं काय स्थिती?.
...तेव्हा दमानिया कुठे गेल्या होत्या? सुषमा अंधारेंचा थेट सवाल
...तेव्हा दमानिया कुठे गेल्या होत्या? सुषमा अंधारेंचा थेट सवाल.
पुतळ्याचं अनावरण 4 महिने अनावरण का रखडलं? अमित ठाकरेंचा थेट सवाल
पुतळ्याचं अनावरण 4 महिने अनावरण का रखडलं? अमित ठाकरेंचा थेट सवाल.
मोठी बातमी! आता बिबट्याचीही नसबंदी, बिबट्यांची दहशत अन् वावर कमी होणार
मोठी बातमी! आता बिबट्याचीही नसबंदी, बिबट्यांची दहशत अन् वावर कमी होणार.
बिबट्याने उडवली झोप, एकाला पकडलं, दुसऱ्याचा उच्छाद; थेट पडला विहिरीत
बिबट्याने उडवली झोप, एकाला पकडलं, दुसऱ्याचा उच्छाद; थेट पडला विहिरीत.
नीच... जरांगेंचा अजितदादांसह फडणवीसांवर गंभीर आरोप अन् मुंडेंवर निशाणा
नीच... जरांगेंचा अजितदादांसह फडणवीसांवर गंभीर आरोप अन् मुंडेंवर निशाणा.