जगभरात ChatGPT डाऊन, लॉगिन आणि Ghibli येतेय बनविण्यात अडचण

जगभरात लोकप्रिय झालेले चॅटजीपीटी सेवा डाऊन झाली आहे. अनेक युजर्सना आता लॉगिन करताना आणि घिबली फोटो बनवण्यात अडचणी येत आहेत. अखेर सॅम आल्टमॅनच्या चॅट जीपीटीचे हाल एवढे का खराब झाले असा सवाल केला जात आहे. कशी काय ही सेवा बंद पडली ते पाहूयात...

जगभरात ChatGPT डाऊन, लॉगिन आणि Ghibli येतेय बनविण्यात अडचण
| Updated on: Jun 10, 2025 | 5:37 PM

जगभरात ChatGPT डाऊन झाले आहे. चॅटजीटीपीचा वापर करणाऱ्यांना युजर्सना कित्येक तास अडचणींचा सामना करावा लागत आहे. युजर्स लॉगिन आणि Ghibli बनविण्यात अनंत अडचणी येत आहेत. १२ टक्के लोकांना या एपवर काम करताना स्लो डाऊनचा सामना करावा लागत आहे.अनेक लोकांनी सोशल मीडियात तक्रार केली आहे  की त्यांना घिबली फोटो बनविण्यात अडचणी येत आहेत.

डाऊन डिटेक्टरच्या रिपोर्टनुसार ८४ टक्के युजर्सना चॅटजीपीटी चालवताना अडचणी येत आहेत. तर १२ टक्के युजर्सना एपवर काम करताना अडचणी येत आहेत. अनेक लोकांनी तक्रारी केल्या आहेत की ते प्लेटफॉर्मवर घिबली इमेज जनरेट करु शकत नाहीत. ChatGPT, Sora आणि OpenAI चा टेक्स्ट टू व्हिडीओ जनरेशन प्लॅटफॉर्म सर्व्हर डाऊन झाला आहे. यूजर्सना या तिन्हीकडून सर्व्हीसेस साईन अप करताना अडचणी येत आहेत.

यूजर्सना करावा लागतोय अडचणींचा सामना

अनेक जण चॅट जीपीटीच्या एपवर कोणताही प्रश्न विचारत आहेत तेव्हा त्यास चॅटजीपीटी रिप्लायमध्ये एरर , नो रिस्पॉन्स , वा केवळ लोड होत आहे असा संदेश येत आहे. याशिवाय अनेक युजर्सना इमेज जनरेट्स करण्यात प्रॉब्लेम येत आहे. चॅटजीपीटी वारंवार एकच मॅसेज करत आहे की तुमचे नेटवर्क स्लो आहे किंवा तुम्ही नेटवर्क एरियात नाहीत. अशा अनेक तक्रारी डाऊन डिटेक्टरवर युजर्सनी रिपोर्ट केल्या आहेत.

चॅट जीपीटीचा रिप्लाय ?

सध्या चॅट जीपीटीने या प्रकरणात कोणतीही अधिकृत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. परंतू या अडचणीला दुरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तुम्ही सर्वजण काही वेळातच पुन्हा चॅट जीपीटीचा पुन्हा पुर्वी प्रमाणेच वापर करु शकणार आहे.