पालकांसाठी चांगली बातमी, मुले म्हणतात, मोबाईल नसले तर जास्त आनंद, सर्व्हेतून आश्चर्यकारक माहिती

Mobile | अमेरिकेत एक सर्व्हे झाला आहे. डिजिटल मीडियावर मुलांवर होणार परिणाम त्यातून समोर आणला गेला आहे. त्या सर्व्हेमध्ये चार पैकी तीन किशोरवयीन मुलांनी आपल्याजवळ स्मार्टफोन नसेल तर जास्त आनंद आणि समाधान मिळत असल्याचे सांगितले.

पालकांसाठी चांगली बातमी, मुले म्हणतात, मोबाईल नसले तर जास्त आनंद, सर्व्हेतून आश्चर्यकारक माहिती
mobile
| Updated on: Mar 12, 2024 | 3:36 PM

न्यूयॉर्क | दि. 12 मार्च 2024 : मुलांचे मोबाइलचे व्यसन कसे सोडवावे? अशी चिंता सर्व पालकांना असते. विशेषत: किशोरवयीन (टीनएजर) मुले मोबाइलच्या आहार जात असल्याच्या तक्रारी अनेक पालक करत असतात. परंतु एका पाहणीत पालकांना आनंद वाटणारी आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरमध्ये लहान मुलांवर होणाऱ्या डिजिटल मीडियाच्या प्रभाव या विषयावर सर्व्हे करण्यात आला. त्या सर्व्हेमध्ये चार पैकी तीन किशोरवयीन मुलांनी आपल्याजवळ स्मार्टफोन नसेल तर जास्त आनंद आणि समाधान मिळत असल्याचे सांगितले. स्मार्टफोनपासून लांब राहिल्यानंतर आनंद मिळत असल्याचे हे मुले म्हणतात.

काय आहेत सर्व्हेतील निष्कर्ष

अमेरिकतील 13 ते 17 वयोगटातील 1,453 किशोरवयीन मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा हे प्यू रिसर्च सेंटरकडून सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्याचे निष्कर्ष आता समोर आले आहे. त्या निष्कर्षानुसार 72% किशोरवयीन मुले म्हणतात. त्यांच्याकडे स्मार्टफोन नसताना त्यांना शांतता वाटते. परंतु 44% मुले फोन नसताना चिंताग्रस्त होतात. 40% मुले फोन नसताना अस्वस्थ होतात. 39% मुलांना एकाकी वाटते. छंद आणि आवड जोपासने स्मार्टफोनमुळे सोपे होत असल्याचे 69% किशोरवयीन मुलांचे म्हणणे आहे.

पालक आणि मुलांमध्ये वादसुद्धा

दहापैकी चार पालक आणि किशोरवयीन मुले त्यांच्या फोनवर घालवलेल्या वेळेबद्दल एकमेकांशी नियमितपणे वाद घालत असल्याची तक्रार करतात. जवळजवळ 46% किशोरवयीन म्हणतात की त्यांचे पालक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या फोनमुळे त्यांचे लक्ष विचलित होते.

स्मार्टफोनमुळे फायदा की तोटा

बहुतेक किशोरांना असे वाटते की स्मार्टफोनचे फायदे अधिक आहे. परंतु त्यामुळे नुकसान कमी आहे. सातपैकी दहा किशोरवयीन मुलांचे म्हणणे आहे की, स्मार्टफोन त्यांच्या वयाच्या मुलांसाठी नुकसानीपेक्षा फायदे देणार आहे. परंतु 30% मुले स्मार्टमुळे फायद्यापेक्षा नुकसान जास्त असल्याचे मत व्यक्त करतात.

अमेरिकतील संस्थेने केलेला हा सर्व्हे आता मुलांचे बदलले विश्व समोर आणत आहे. अनेक दिग्गज व्यक्ती आपल्या मुलांना गॅझेटपासून लांब ठेवत असल्याचे सांगतात. त्याला या सर्व्हेच्या माध्यमातून दुजोरा मिळत आहे.