
जगावर आणखी एका युद्धाचे संकट ओढवले आहे. जगातील महत्त्वाच्या देशांपैकी एक असलेल्या चीन आणि जपानमधील तणाव गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. जपानचे नवे पंतप्रधान साने ताकाची यांनी म्हटले की, जर चीनने तैवानवर हल्ला केला तर जपान स्वतःचे रक्षण करण्यासाठी सैन्य पाठवणार आहे. जपानच्या या विधानामुळे चीनने संताप व्यक्त केला आहे. चीनने जपानला इशारा देताना म्हटले की, जर जपानने हस्तक्षेप केला तर त्याचा पराभव होईल. दोन्ही देशांच्या ताकदीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
चीनकडे जगातील तिसरे सर्वात मजबूत सैन्य आहे. यातील 20 लाख सैनिक सक्रीय आहेत. चीनच्या नौदलात 700 पेक्षा अधिक लढाऊ जहाजे आणि तीन विमानवाहू जहाजे आहेत. तसेच चीनच्या हवाई दलात 3000 पेक्षा जास्त लढाऊ विमाने आहेत. चीनकडे लांब पल्ल्याची हल्ल्याची क्षमता असलेली हजारो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. तसेच चीन नवीन तंत्रज्ञानाची शस्त्रे वेगाने विकसित करत आहे.
जपान सर्वात जास्त ताकद असलेल्या सैंन्याच्या यादीत जगात आठव्या क्रमांकावर आहे. जपानचे सक्रिय सैन्य फक्त अडीच लाख आहे. जपानच्या नौदलात अतिशय आधुनिक अशी 150 पेक्षा जास्त जहाजे आहेत, यातील काही जहाजे हेलिकॉप्टर वाहक जहाचे आहेत. जपानच्या हवाई दलात 1500 विमाने आहेत, ज्यात अमेरिकन F-35 या आधुनिक लढाऊ विमानांचा समावेश आहे. जपानचे सैन्य खुप प्रशिक्षित आहे.
चीन आणि जपानमध्ये युद्ध झाले तर चीनची ताकद जास्त आहे. फक्त चीन विरुद्ध जपान हे युद्ध झाल्यास चीन सहज जिंकू शकतो. कारण चीनकडे अधिक सैन्य आणि क्षेपणास्त्रे आहेत. चीन जपानवर दूरवरून क्षेपणास्त्रे करू शकतो. मात्र अमेरिकन सैन्य जपानच्या मदतीला धावू शकते. कारण दोन्ही देशांमध्ये तसा करार आहे. अमेरिकेकडे सर्वात जास्त आणि ताकदवान सैन्य आहे. यात 11 विमानवाहू जहाजे, हजारो अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे जपान चीनवर विजय मिळवू शकतो.