भारतानंतर चीनने डोनाल्ड ट्रम्प यांचा खोटेपणा केला उघड, शी जिनपिंग यांनी फेटाळला तो दावा, मोठी खळबळ..

डोनाल्ड ट्रम्प सध्या आशिया दाैऱ्यावर असून काही महत्वाचे करार केले जाणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा नुकताच चीनने फेटाळून लावलाय.

भारतानंतर चीनने डोनाल्ड ट्रम्प यांचा खोटेपणा केला उघड, शी जिनपिंग यांनी फेटाळला तो दावा, मोठी खळबळ..
America and China
| Updated on: Oct 31, 2025 | 8:00 AM

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा बुरखा फाडला. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला एक दावा छोटा असल्याचे त्यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी थायलंड आणि कंबोडियाबद्दल मोठा दावा केला होता. चीनने स्पष्ट म्हटले की, थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील शांतता प्रस्तावामध्ये चीनची भूमिका राहिली आहे. बैठकीत शी जिनपिंग यांनी गाझा युद्धविराम करारात ट्रम्प यांच्या महत्त्वाच्या भूमिकेचे कौतुक केले. मात्र, त्यानंतर शी जिनपिंग यांनी स्पष्ट म्हटले की, थायलंड आणि कंबोडियामधील सीमा वाद सोडवण्यासाठी चीन शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न आहे. चीनने थायलंड आणि कंबोडियासह या प्रदेशातील देशांशी व्यापारासोबतच चांगले संबंध राखली आहेत.

आशिया दौऱ्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी थायलंड आणि कंबोडियाच्या नेत्यांच्या उपस्थितीत मलेशियामध्ये शांतता करार जाहीर केला. थायलंडचे परराष्ट्र मंत्री सिहासक फुआंगकेटकायो यांनी याला शांतता करार म्हणण्यास नकार दिला.  फक्त शांततेकडे जाणारा मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी हा ऐतिसासिक क्षण असल्याचेही म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील वादात चीन हस्तक्षेप करत नाहीये किंवा त्यांची कोणतीही भूमिका राहिली नाहीये.

त्यानंतर आता बैठकीत शी जिनपिंग यांनी म्हटले, दोन्ही देशांमधील वादात चीनची महत्वाची भूमिका राहिली आहे. सी जिनपिंग यांची ट्रम्प यांना चांगलेच तोंडावर पाडल्याचे बघायला मिळतंय. मागील काही दिवसांपासून चीन आणि अमेरिकेतील संबंध तणावात आली आहेत. चीनवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची मोठी घोषणा अमेरिकेने केली. 1 नोव्हेंबर 2025 पासून चीनवर 100 टक्के टॅरिफ लावत असल्याने अमेरिकेने म्हटले.

आता चीनवरील टॅरिफची अंमलबजावणी सुरू करण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. आहे तो टॅरिफ 10 टक्क्यांनी कमी करण्याची निर्णय अमेरिकेने घेतला आहे. त्यामध्ये आता 100 टक्के टॅरिफ चीनवर लागणार का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. चीन हा रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी करणारा देश आहे. चीनने जगभरात दुर्मिळ खनिजांची निर्यात रोखल्याने अमेरिकेचा संताप बघायला मिळाला.