चीनचा समुद्रात हाहाकार! केला मोठा घात, शेजारी देशांना दणका, थेट युद्धनाैकाच..

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू असतानाच आता तणाव वाढला आहे. चीनने समुद्रात धक्कादायक पाऊल उचलल्याचे बघायला मिळत आहे. ज्याने अजून दुसरे युद्ध पेटण्याचे मोठे संकेत आहेत. चीन आपला दबाव वाढताना दिसत आहे. चीनची दादागिरी वाढल्याचे बघायला मिळतंय.

चीनचा समुद्रात हाहाकार! केला मोठा घात, शेजारी देशांना दणका, थेट युद्धनाैकाच..
China warship
| Updated on: Apr 29, 2026 | 8:57 AM

इराण आणि अमेरिका युद्धात जग वैतागले आहे. ऊर्जेचे मोठे संकट उभे आहे. ते युद्ध संपत नाही तोवरच आता अजून एक धक्कादायक प्रकार पुढे आला. आता चीनने एक धक्कादायक पाऊल उचलले. चीनने घेतलेल्या या निर्णयाने पुन्हा एकदा जगात हाहाकार उडाला. चीनने ताइवानमध्ये दबाव वाढवण्याकरिता मोठा निर्णय घेतला. ताइवान रक्षा मंत्रालयाच्या दाव्यानुसार, चीनची युद्धनाैका पेंघु व्दीपच्या जवळील समुद्र क्षेत्रात दाखल झाली. या घटनेनंतर ताइवानने सुरक्षा वाढवली आहे आणि अलर्टही जारी केला. चीन ताइवानकडे सैन्य ताकद वाढवत आहे. चीनला ताइवानवर दबाव टाकायचा आहे. मात्र, चीनने युद्धनाैका पाठवल्याने तणाव अधिक वाढल्याचे बघायला मिळत आहे. ताइवान रक्षा मंत्रालयाने एक निवेदनही जारी केले. त्यात त्यांनी पेंघु व्दिपच्या दक्षिण पश्चिम समुद्री क्षेत्रात चीनी विध्वंसक आणि फ्रिगेट घुसले आहे. त्यांच्या म्हणण्यांनुसार, ताइवानी सशस्त्र दल चीनी लष्करावर बारीक नजर ठेऊन आहे.

योग्य ती कारवाई त्यांच्याकडून केली जाईल. हेच नाही तर त्यांनी चीनच्या युद्धनाैकेचे काही फोटोही शेअर केले आहेत. ताइवानमध्ये चीनची घुसखोरी वाढल्याचे बघायला मिळत आहे. चीन जवळपास दररोज ताइवानमध्ये युद्धनाैका आणि लढाऊ विमाने पाठवली. ताइवानने केलेल्या दाव्यानंतर, काही दिवसांपूर्वीच चीनच्या रक्षा मंत्रालयाने याला उत्तर दिले होते. चीनने म्हटले होते की, ताइवानच्या आसपास नियमित त्यांच्या सैन्य हालचाली पूर्णपणे योग्य आहेत.

तणावसाठी फक्त आणि फक्त ताइवान सरकार जबाबदार असल्याचेही चीनने म्हटले. मात्र, या घटनेनंतर चीनच्या रक्षा मंत्रालयाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, आता तणाव प्रचंड वाढल्याचे बघायला मिळत आहे. इराण आणि अमेरिका युद्धाने जग वैतागले आहे. परिस्थिती तणावात आहे. असे असताना आता चीन आणि ताइवान यांच्यात तणाव वाढला आहे.

चीनने काही दिवसांपूर्वीच म्हटले की, आम्ही जे करत आहोत ते योग्य आहे. आता चीनला नक्की कोण रोखणार हा मोठा प्रश्न आहे. चीन ताइवानवर अतिक्रमण करत आहे. काही दिवसांपूर्वीच तणाव वाढला होता. आता पुन्हा चीनने आपली युद्धनाैका तैणात केली. इराण आणि अमेरिका युद्धात चीन दोन्ही देशांना शांतता राखण्याचे आव्हान करत आहे. मात्र, चीनवर गंभीर आरोप अमेरिकेने केले. इराणला चीन मदत करत असल्याचे त्यांनी म्हटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us