शी जिनपिंग भारतात काय काय घेऊन आले? चीनवरून अगोदरच भारतीय रस्त्यांवर..

यंदा भारताने ब्रिक्स परिषदेचे आयोजन केले. यादरम्यान पुतिन कालच भारतात दाखल झाले. आज चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग भारतात दाखल झाले. त्यांच्या सुरक्षेची खास व्यवस्था करण्यात आली. आता मोठी माहिती पुढे येतंय.

शी जिनपिंग भारतात काय काय घेऊन आले? चीनवरून अगोदरच भारतीय रस्त्यांवर..
Xi Jinping
| Updated on: Sep 12, 2026 | 2:23 PM

नवी दिल्लीत ब्रिक्स परिषदेचे आयोजन करण्यात आले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन कालच भारतात दाखल झाले. आज चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात आले. जिनपिंगचे विमान पालम विमानतळावर उतरले. तब्बल सात वर्षानंतर जिनपिंग भारतात दाखल झाले. या परिषदेकडे जगाच्या नजरा आहेत. जगातील अनेक देशांचे प्रमुख भारतात दाखल झाले. आता जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात भेट होईल. दोघांमध्ये व्दिपक्षीय वार्ता होईल. जिनपिंग यांच्या भारत दाैऱ्याची तयारी केल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यांची एक टीम अगोदरच दिल्लीत दाखल झाली. सुरक्षेची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आहे. जिनपिंग यापूर्वी 2019 ला भारत दाैऱ्यावर आले होते. त्यानतंर भारत आणि चीन यांच्यात सीमेच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला.

आता कुठे संबंध सुधारताना दिसत आहेत. जिनपिंग येताना बरेच काही सोबत घेऊन आले आहेत. आपल्या सुरक्षेसाठी खास गाड्याही ते सोबत घेऊन आले आहेत. Hongqi N701 आर्मर्ड लिमोजिनन ही कार जिनपिंग घेऊन आले. ही नुसती लग्झरी कार नाही तर खास सुरक्षित ही कार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्मर, बुलेटप्रूफ ग्लास आणि बुलेटप्रूट टायर फिचर आहेत.

म्हणजे दिल्लीतील रस्त्यांवर फिरणारी शी जिनपिंग यांची कार अशी तशी नसून मोठी सुरक्षित कार असणार आहे. जिनपिंग हे भारतात Air China च्या Boeing 747-8 दाखल झाले. हे असे तसे विमान नसून खास चीनच्या अध्यक्षांसाठी तयार करण्यात आले. जिनपिंग हे एकटे भारतात आले नसून त्यांची पूर्ण टीम आली. सायंकाळी मोदी आणि जिनपिंग यांच्यात बैठक होणार आहे.

भारत आणि चीनचे संबंध चांगलेच सुधारताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून तणावात असलेले संबंध आता सुधारली आहेत. भारतावर अमेरिकेने मोठा टॅरिफ लावला होता, त्यावेळी भारताच्या मदतीला धावून चीन आला होता. अमेरिकेविरोधात भूमिका घेताना चीन दिसला. जिनपिंग यांच्या दाैऱ्याची खास व्यवस्था भारताकडून करण्यात आली. कडक सुरक्षा बघायला मिळतंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us